"धम्मपाल रत्‍नाकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ.प्रा.धम्मपाल भूपाल रत्नाकर (जन्म :१५-३-१९६६;मृत्यू : कोल्हापूर १...
खूणपताका: विशेषणे टाळा
(काही फरक नाही)

२०:२३, १९ जून २०१२ ची आवृत्ती

डॉ.प्रा.धम्मपाल भूपाल रत्नाकर (जन्म :१५-३-१९६६;मृत्यू : कोल्हापूर १७-६-२०१२) हे एक मराठी लेखक व कवी होते. ते कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयात मराठीचे शाखाप्रमुख आणि महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाहक होते.

विद्यार्थिदशेपासूनच प्रशिक विद्यार्थी संघटनेद्वारे डॉ. रत्नाकर आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते. त्या संघटनेचे ते अध्यक्ष होते. डॉ. रत्नाकर हे वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. यळगूड (ता. कागल) येथून अतिशय कष्टमय जीवन जगत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी हॉटेलमध्ये काम केले होते.

मायमराठीतल्या आईच्या अशा कवितांचा संग्रह प्रशांत मोरे यांनी ’माय हिंडते रानोमाळी’ या नावाने प्रसिद्ध केला आहे. सव्वाशे कवी-कवयित्रींच्या या १२९ कविता माऊलीबरोबरच काळया आईचीही सय जागवतात. ५ मे २००७ रोजी गडकरी रंगायतनमध्ये त्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्या पुस्तकातल्या एका कवितेत प्रा. रत्नाकरांनी आईचे विराट रूप दाखवताना लिहिले आहे,

मूल बनून खेळले की; तीही खेळते

सैतान बनून छळले की; तीही छळते.

डॉ. धम्मपाल रत्नाकर यांचे "हॉटेल माझा देश', "सैतानाच्या खांबावर' आणि "लक्‍तरांची गझल' हे काव्यसंग्रह गाजले. "दलित साहित्याच्या नामांतराचा वाद' आणि "विसावा' या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे. विस्कट या नावाची त्यांची एक कादंबरी आहे. त्यांनी आंबेडकर चळवळीतील कवी नामदेव ढसाळ यांच्या साहित्याचा अभ्यास या विषयावर संशोधन केले आहे. आंबेडकर चळवळीतील एक समीक्षक ग्रंथ त्यांनी लिहिला आहे.

पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने इचलकरंजीसह कोल्हापूर परिसराला गेल्या महिनाभरापासून काविळीचा विळखा पडला आहे. "हिपॅटायटीस ई' प्रकारच्या या काविळीने १७-६-२०१२ पर्यंत इचलकरंजी नगरपालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यांसह १३ जणांचा बळी घेतला होता. त्या साथीत कदमवाडी(कोल्हापूर) येथे राहणाऱ्या धम्मपाल रत्‍नाकरांचा बळी घेतला.

पुरस्कार

त्यांना उत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाचा दोन वेळा पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय महाराष्ट्र फाउंडेशन आणि साहित्य क्षेत्रातील अन्य मानाचे पुरस्कारही मिळाले होते.