"वामन सुदामा निंबाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. वामन सुदामा निंबाळकर हे मराठवाडा आणि विदर्भातले एक मराठी ल...
खूणपताका: असभ्यता ?
(काही फरक नाही)

२२:००, ११ जून २०१२ ची आवृत्ती

प्रा. वामन सुदामा निंबाळकर हे मराठवाडा आणि विदर्भातले एक मराठी लेखक, विचारवंत आणि कवी होते. त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील लांजूड या गावी १३ मार्च १९४३ रोजी झाला होता. त्यांचे शिक्षण औरंगाबाद येथे झाले. इतिहास, हिंदी आणि डॉ. आंबेडकर विचारधारा या विषयात त्यांनी एम.ए. केले होते. ’मराठी कवितेत डॉ. आंबेडकर हा त्यांचा पीएच.डी.साठी सुरू असलेला प्रबंध होता, तो त्यांना अखेरपर्यंत पूर्ण करता आला नाही. हृदयविकाराने त्यांचे ३ डिसेंबर २०१० रोजी, वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले.

  • मृत्यूपूर्वी तेरा वर्षे प्रा.वामन निंबाळकर नागपूर विद्यापीठाच्या डॉ.आंबेडकर विचारधारा विभागात अंशकालीन प्राध्यापक होते.
  • नागपुरात कवी निंबाळकर यांनी 1991 पासून डॉ. आंबेडकर स्मृति व्याख्यानमाला सुरू केली होती.
  • निंबाळकरांनी औरंगाबादेत दलित पॅन्थरच्या स्थापनेनंतर नामांतर आंदोलन, मागासवर्गीयांसाठी शिष्यवृत्ती आंदोलन, मागास जाती-जमातील भटके आणि अल्पसंख्याकांना पडीत जमीनवाटप इत्यादी कार्यक्रम राबवले होते.
  • वामन निंबाळकर महाराष्ट्र गव्हर्नमेंट ट्रेड नर्सेस असोसिएशनचे १९७८ पासून सल्लागार होते.
  • त्यांनी प्रबोधन प्रकाशनाद्वारे 'आजचे प्रबोधन' नावाचे साप्ताहिक सुरू केल होते. याशिवाय भीमसंदेश, अस्मितादर्श, सुमचित, प्रबोधन, लोकायत, परिचारिका या नियतकालिकांच्या प्रकाशनांत

त्यांचा सहभाग होता.

  • प्रबोधन प्रकाशनतर्फे त्यांनी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या "वाटचाल', आणि कवी यशवंत मनोहर यांच्या "उत्थनगुंफा'चे प्रकाशन निंबाळकरांनी केले होते.
  • वामन निंबाळकर हे ...साली विदर्भ साहित्यसंघातर्फे घेण्यात येणाऱ्या विदर्भ साहित्यसंमेलनाचे, आणि, चंद्रपूर येथे .....रोजी पार पडलेल्या दहाव्या अ. भा. दलित साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.
  • अखिल भारतीय(?) दलित साहित्य महामंडळाचही ते अध्यक्ष होते.
  • "सामाजिक क्रांतीची दिशा' या नावाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी प्राचार्य "युगयात्रा'कार प्रा. म. भी. चिटणीस यांचे समग्र वाङ्मय वामन निंबाळकरांनी प्रकाशित केले होते.

वामन निंबाळकर यांची ग्रंथसंपदा

  • अस्मितादर्शची नऊ वर्षे
  • आई (काव्यसंग्रह)
  • गावकुसाबाहेरची कविता (काव्यसंग्रह)
  • दलित साहित्य - एक वाङ्‌मयीन चळवळ
  • दलित साहित्य - स्वरूप व भूमिका
  • बौद्धांच्या सवलती व पंतप्रधानाचे वक्तव्य
  • मराठवाडा विद्यापीठाला डॉ. आंबेडकर यांचेच नाव का?
  • महाकवी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • महायुद्ध (काव्यसंग्रह)
  • राज्यघटनेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान
  • वाहत्या जखमांचा प्रदेश (काव्यसंग्रह)
  • साठोत्तरी मराठी कवितेत आंबेडकरदर्शन
  • सामाजिक क्रांतीची दिशा (प्रा. म. भि. चिटणीस यांचे समग्र वाङ्‌मय)

संपादित पुस्तके

  • अखिल भारतीय दलित साहित्यसंमेलन (अध्यक्षीय भाषण)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा
  • दलित लिटरेचर - नेचर ॲन्ड रोल
  • दलितांचे विद्रोही वाङ्‌मय
  • सामाजिक लोकशाहीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर








.