विल्हेम कायटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फील्ड मार्शल विल्हेम कायटेल (२२ सप्टेंबर, १८८२:हेल्मशेरोड, जर्मनी - १६ ऑक्टोबर, १९४६:न्युरेम्बर्ग:जर्मनी) हा नाझी जर्मनीचा उच्च सेनापती होता. ओबेरकमांडो डेर वेह्रमाख्ट या पदावर असलेला कायटेल ॲडॉल्फ हिटलरच्या कह्यात असणाऱ्या सेनापतींमध्ये एक होता.

दुसरे महायुद्ध संपल्यावर दोस्त राष्ट्रांनी कायटेलवर माणुसकीविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांबद्दल खटला चालवला. त्यात दोषी ठरल्यावर कायटेलला मृत्युदंड देण्यात आला.