विलेम डॅफो
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
| स्थानिक भाषेतील नाव | Willem Dafoe |
| जन्म-नाव | William James Dafoe |
| दिलेले नाव | विल्यम |
| आडनाव | Dafoe |
| जन्म तारीख | २२ जुलै 1955 |
| जन्मस्थान | ऍपलटन |
| वडील | William Alfred Dafoe |
| भावंडे | Donald Dafoe |
| वैवाहिक जोडीदार | Giada Colagrande, Elizabeth A. LeCompte |
| सहचर | Elizabeth A. LeCompte |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | इंग्लिश भाषा |
| शिक्षण घेतलेली संस्था | University of Wisconsin–Milwaukee, Appleton East High School |
| निवासस्थान | ऍपलटन, न्यू यॉर्क शहर |
| कार्य कालावधी (प्रारंभ) | 1979 |
| Filmography | Willem Dafoe filmography |
| सदस्यता | Theatre X, The Wooster Group |
| नामांकने प्राप्त | Academy Award for Best Supporting Actor, Academy Award for Best Supporting Actor, Academy Award for Best Supporting Actor, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार |
| यादी आहे | list of awards and nominations received by Willem Dafoe |
विलियम जेम्स डॅफो तथा विलेम डॅफो (२२ जुलै, १९५५:ॲपल्टन, विस्कॉन्सिन, अमेरिका - ) हा एक अमेरिकन अभिनेते आहेत. मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपट आणि प्रायोगिक दर्जाच्या कलात्मक चित्रपटांमधील त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ते जगभर ओळखले जातात. त्यांच्या अनोख्या चेहऱ्यावरील हावभाव आणि अष्टपैलू अभिनयामुळे त्यांनी जागतिक चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. डॅफो यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी चार वेळा ऑस्कर पुरस्कार (ॲकॅडमी अवॉर्ड्स) नामांकन मिळाले आहे, तसेच त्यांना व्होल्पी कप पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत.[१]</ref>
हॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी डॅफोने पूर्णपणे प्रायोगिक रंगभूमीवर काम केले. त्यांचा जन्म विस्कॉन्सिनमधील ॲपल्टन येथे झाला.[२]</ref> युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मिलवॉकी येथे नाटकाचे शिक्षण घेत असताना, त्यांनी पारंपारिक पद्धती सोडून प्रायोगिक क्षेत्रात रस दाखवला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्याने शिक्षण सोडून विस्कॉन्सिनमधील एका प्रायोगिक नाट्यगृहात प्रवेश केला. त्यानंतर १९७६ मध्ये तो न्यू यॉर्क शहराला गेला. तिथे त्याने दिग्दर्शिका एलिझाबेथ लेकॉम्पटे हिच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी इतर कलाकारांच्या साथीने द वूस्टर ग्रुप या अत्यंत प्रभावशाली आणि क्रांतिकारी मानल्या गेलेल्या प्रायोगिक नाट्यसंस्थेची स्थापना केली.[३]</ref> हॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळाल्यानंतरही, २००० च्या दशकापर्यंत डॅफो या नाट्यसंस्थेच्या अनेक नाटकांमध्ये नियमितपणे रंगमंचावर काम करत होता.
डॅफोने आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९८० मध्ये मायकेल चिमिनोच्या हेवन्स गेट चित्रपटातून केली, परंतु संपादनादरम्यान त्याची बहुतांश दृश्ये चित्रपटातून वगळण्यात आली. त्यानंतर त्याने १९८२ मध्ये द लव्हलेस या चित्रपटात मुख्य भूमिका केली. डॅफोच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातील ऑलिव्हर स्टोन दिग्दर्शित प्लाटून (१९८६) हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला. यात त्याने एका तत्त्वनिष्ठ लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे पहिले ऑस्कर नामांकन मिळाले.[४]</ref> त्यानंतर त्याने मार्टिन स्कॉर्सेसीच्या द लास्ट टेम्पटेशन ऑफ क्राइस्ट (१९८८) मध्ये येशू ख्रिस्ताची अत्यंत गुंतागुंतीची भूमिका केली.
डॅफोने गंभीर भूमिकांशिवाय व्यावसायिक चित्रपटांतही यश मिळवले. सॅम रायमी यांच्या स्पायडर-मॅन (२००२) चित्रपटात त्याने ग्रीन गॉब्लिनचे काम केले होते. हीच भूमिका त्यांनs २०२१ मधील स्पायडर-मॅन: नो वे होम या चित्रपटात पुन्हा साकारली.[५]</ref> या व्यावसायिक यशासोबतच त्यानs शॅडो ऑफ द व्हॅम्पायर (२०००), द फ्लोरिडा प्रोजेक्ट (२०१७) आणि ॲट इटर्निटीज गेट (२०१८) मधील फिंसेंत फान घोच्या भूमिकेसाठी ऑस्कर नामांकने मिळवून आपल्या अभिनय क्षमतेची प्रचिती दिली.
एलिझाबेथ लेकॉम्पटे यांच्यासोबत दीर्घकाळ राहिल्यानंतर डॅफोने २००५ मध्ये इटालियन चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री जियादा कोलाग्रांदेशी लग्न केले. डॅफोने आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील अनेक धाडसी दिग्दर्शकांसोबत वारंवार काम केले आहे. प्रदीर्घ काळापासून अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत राहिल्याबद्दल आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हॉलीवूड वॉक ऑफ फेमवर त्यांच्या नावाचा तारा कोरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे[६]</ref>.
निवडक चित्रपट
[संपादन]| वर्ष | चित्रपटाचे नाव | भूमिका | वर्गवारी / वैशिष्ट्य | संदर्भ |
|---|---|---|---|---|
| १९८० | हेव्हन्स गेट | विली | पहिला चित्रपट (सुरुवात) | [७] |
| १९८२ | द लव्हलेस | वन्स | मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट | [८] |
| १९८६ | प्लॅटून | सार्जंट एलियास | पहिले ऑस्कर नामांकन आणि व्यावसायिक यश | [९] |
| १९८८ | द लास्ट टेम्पटेशन ऑफ ख्रिस्ट | येशू ख्रिस्त | समीक्षकांनी वाखाणलेली मुख्य भूमिका | [१०] |
| २००० | शॅडो ऑफ द व्हॅम्पायर | मॅक्स श्रेक | ऑस्कर नामांकन आणि सॅटेलाइट पुरस्कार विजेता | [११] |
| २००२ | स्पायडर-मॅन | नॉर्मन ऑसबॉर्न / ग्रीन गॉब्लिन | ब्लॉकबस्टर व्यावसायिक यश (खलनायक) | [१२] |
| २०१७ | द फ्लोरिडा प्रोजेक्ट | बॉबी हिक्स | अनेक समीक्षक पुरस्कार आणि ऑस्कर नामांकन | [१३] |
| २०१८ | ॲट इटर्निटीज गेट | व्हिन्सेंट व्हॅन गॉग | व्होल्पी कप विजेता आणि ऑस्कर नामांकन | [१४] |
| २०२१ | स्पायडर-मॅन: नो वे होम | नॉर्मन ऑसबॉर्न / ग्रीन गॉब्लिन | कारकिर्दीतील सर्वात मोठा व्यावसायिक यशस्वी चित्रपट | [१५] |
| २०२४ | बीटलज्युस बीटलज्युस | वूल्फ जॅक्सन | अलीकडील मोठा व्यावसायिक यशस्वी चित्रपट | [१६] |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Willem Dafoe Biography". Encyclopædia Britannica. ११ जून २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Willem Dafoe Profile". Biography.com. ११ जून २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "The Wooster Group History". The Wooster Group. ११ जून २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "The 59th Academy Awards". Academy of Motion Picture Arts and Sciences. ११ जून २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Spider-Man: No Way Home Box Office". Box Office Mojo. ११ जून २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Willem Dafoe - Hollywood Walk of Fame". Hollywood Chamber of Commerce. ११ जून २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Willem Dafoe Biography" (इंग्रजी भाषेत). Britannica.
- ↑ "The Loveless" (इंग्रजी भाषेत). IMDb.
- ↑ "The 59th Academy Awards" (इंग्रजी भाषेत). Oscars.
- ↑ "Willem Dafoe Walk of Fame" (इंग्रजी भाषेत). Walk of Fame.
- ↑ "The 73rd Academy Awards" (इंग्रजी भाषेत). Oscars.
- ↑ "Spider-Man Box Office" (इंग्रजी भाषेत). Box Office Mojo.
- ↑ "The 90th Academy Awards" (इंग्रजी भाषेत). Oscars.
- ↑ "Venice Film Festival Winners" (इंग्रजी भाषेत). La Biennale.
- ↑ "Spider-Man: No Way Home" (इंग्रजी भाषेत). Box Office Mojo.
- ↑ "Beetlejuice Beetlejuice Box Office" (इंग्रजी भाषेत). Box Office Mojo.