विमेन रायटिंग इन इंडिया (पुस्तक श्रुंखला)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विमेन रायटिंग इन इंडिया'[१]' ही पुस्तकांची श्रुंखला असून दोन खंडांमध्ये प्रकाशित झालेले आहे. दोन्हीही खंड ‘द फेमिनिस्ट प्रेस’ द्वारे प्रकाशित झाले व सुजी थारो व के. ललिता यांनी संपादित केलेले आहे.

खंडांबद्दल[संपादन]

श्रुंखलेतील पहिल्या खंडात ख्रिस्त पूर्व ६०० वर्षापासून ते २०व्या शतकातील पूर्वार्धापर्यंतचे स्त्रियांच्या लिखाणाचे संकलन आहे तर दुसऱ्या खंडात २०व्या शतकातील स्त्रियांचे लिखाण संकलित आहेत. दोन्ही खंडांना एकत्र केल्यास ही श्रुंखला एक महत्वपूर्ण साधन ठरते कारण विषयांचे व मुद्द्यांचे वैविध्य तसेच साहित्य, स्त्रीवाद, सांस्कृतिक इतिहास व आधुनिक भारताच्या जडण-घडणीसंदर्भात ऐतिहासिक समज यामध्ये मिळते.

योगदान[संपादन]

श्रुंखलेतील दुसऱ्या खंडाला अनिता देसाई सारखे लेखक व कॅरोल एशर व सी.एम.नेईम सारख्या विद्वानांकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली.

सन्दर्भ सुची[संपादन]

  1. ^ ISBN 1558610278, 9781558610279