विमल गाडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


Unbalanced scales.svg
या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.


नावः विमल भगवान गाडेकर. जन्मदिनांकः- 2-2-1951 जन्मगावः- लोणार, जि.बुलढाणा परिचय- विमल गाडेकर यांचा जन्म 2-2-1951 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या गावात झाला. आईचे नाव अनुसया सुरडकर. वडिलांचे नाव नारायण सुरडकर. पतीचे नाव भगवान गणूजी गाडेकर. शिक्षण एम. ए. समाजशास्त्र. एम. ए. आंबेडकर विचारधारा, बि.एड. चंद्रपूर येथिल जनता महाविद्यालयात समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त. विदर्भातील दर्जेदार लेखकांमध्ये गणना. कथा, कविता, ललित, नाटक यांचे लिखाण. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे गरिब मुलांसाठी इंग्रजी माध्यमातील शाळा सुरु केली. फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना. महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सामाजिक उत्थानासाठी समाजातील सर्व स्तरातील महिलांना एकत्रित करून संयुक्त महिला मंच या सामाजिक संस्थेची स्थापना. सन 2017 मध्ये या संस्थेची पंचविस वर्षे पुर्ण झाली. भुषविलेली पदेः- • सामाजिक सुरक्षा समिती सदस्य. • जिल्हा विधिकरण प्राधिकरण सदस्य. • राज्य सदस्य-सोशल वेलफेअर बोर्ड, महाराष्ट्र शासन • डिस्ट्रीक्ट कमिश्नर स्काऊट आणि गाईड • जिल्ह्या नियोजन समिती सदस्य. प्राप्त पुरस्कारः • सामाजिक कार्यासाठीचा सन 1991 चा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार • चद्रपूर भूषण पुरस्कार • चंद्रपूरची हिरकणी पुरस्कार

प्रकाषित साहित्यः • ऋतुबंध- काव्यसंग्रह • गुलमोहर-प्रातिनिधिक काव्यसंग्रह • दरवेळी- काव्यसंग्रह • मुद्रिका- कथा संग्रह • बांगडी बिल्लोर-स्तंभलेखन • भिंती आड- स्तंभलेखन