विद्यालंकार घारपुरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

विद्यालंकार घारपुरे (जन्म : चेंबूर-मुंबई, २६ सप्टेंबर १९६०) हे दापोलीत राहणारे एक समाज कार्यकर्ते व मराठी लेखक आहेत.

घारपुरे यांची आजी शिक्षिका होती व नातवाचे सुरुवातीचे शिक्षण आपल्याच शाळेत व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यानुसार, विद्यालंकार यांचे प्राथमिक शिक्षण वडगाव (बारामती) येथे झाले. पुढे पाचवी ते बी.कॉम.पदवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण पुण्यात झाले.पुढे १९८०मध्ये त्यांना स्टेट बँकेच्या गोवा शाखेत नोकरी मिळाली. गोव्यात राहत असताना १९८१ साली त्यांनी पहिली ‘आठवण’ ही कथा लिहिली. ती १९८४ साली महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झाली. त्यांची बदली पुढे खेड व लव्हेल येथे झाली. त्यावेळीही अगदी फुटकळ स्वरूपात त्यांचे लेखन चालू होते.विद्यालंकार घारपुरे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अखेरपर्यंत अखेरपर्यंत (कथासंग्रह)
  • अंगणवनातील कथा
  • छोटा डॉन (बालसाहित्य, कवितासंग्रह)
  • बदल (बाल कादंबरी)
  • बबडूच्या गोष्टी (बालसाहित्य)
  • बेटू आणि इतर कथा (बालसाहित्य)
  • लिंबू-टिंबू (बालसाहित्य, कवितासंग्रह)

विद्यालंकार घारपुरे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

  • चालना मासिकाकडून प्रबोधनात्मक साहित्य लेखनासाठी पुरस्कार.
  • ‘बदल’ या बालकादंबरीला इचलकरंजीच्या आपटे वाचनालयाकडून २०१५ साली ‘बालसाहित्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार’.
  • शांताबाई सहस्रबुद्धेंकडून लेखन व सामाजिक सेवेसाठी पुरस्कार.