विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विद्यापिठ या पानावरून पुनर्निर्देशित)

विद्यापीठ ही उच्च शिक्षण व संशोधनासाठीची संस्था असते. विद्यार्थ्यांना विविध विषयातील पदवी प्रदान करण्याचे अधिकार विद्यापीठाकडे असतात.

कुलपती हे पद विद्दयापीठ कार्यकारिणीतले सर्वोच्च पद असून कुलगुरू हा विद्यापीठाचा कार्यकारी प्रमुख असतो.

भारतामध्ये कोणत्याही राज्याचा राज्यपाल हा त्या राज्यातील सगळ्या विद्यापीठांचा आसनाधिष्ठीत कुलपती असतो.

विद्यापीठा कडून उच्च शिक्षणा साठी प्रदान केल्या जाणाऱ्या मुख्य पदव्या:

  • विद्यालंकार (Doctor of Literature or Doctor Of Letters)
  • विद्यावाचस्पती (Ph. D.)
  • विद्यानिष्णात (M. Phil.)
  • विद्यापारंगत (Master Of Arts)
  • विद्याप्रविण (Bachelor Of Arts)

भारतातले नालंदा (बिहार) हे जगातल्या अतिप्राचीन विद्यापीठांपैकी एक आहे.

मुक्त विद्यापीठ[संपादन]

विद्यार्थ्यांना सोईनुसार पदवी शिक्षण घेण्याची सुविधा असलेले विद्यापीठ. अशी अनेक विद्यापीठे भारतात आहेत. उदा.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील पदव्यांची खैरात[संपादन]

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाच्या कृषिविस्तार पीएच.डी. व एम.एस्‌‍सी. या नामसदृश पदव्यांची अनधिकृत खैरात वाटण्याचा अट्टहास यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषिविद्या शाखेकडून सुरू असून, यूजीसीचे कृषी शिक्षणक्रमाबाबत निकष डावलून तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची मान्यता नसताना दिलेल्या नामसदृश कृषिविस्तार पीएच.डी, एम.एस्‌सीच्या पदव्यांतून विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक होत आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने कृषिशिक्षण व शिक्षक नेमणुकीचे नियम करण्याचे अधिकार कृषी अनुसंधान परिषदेला दिले आहे. त्यानुसार कृषी विद्यापीठातील शिक्षणक्रम राबविले जातात. मुक्त विद्यापीठाने मात्र कृषिविस्तार पीएच.डी, एम.एस्‌सी. शिक्षणक्रम सुरू करण्याचा घाट घालताना चक्क अशैक्षणिक पदावरील मांअसे, गाईड व शिक्षक म्हणून नेमली आहेत. कृषी अनुसंधान परिषदेच्या मान्यतेशिवाय मुक्त विद्यापीठातून पास होणारे विद्यार्थी कोणत्याही शैक्षणिक पदावर डायरेक्ट काम करू शकणार नाहीत, असे मुक्त विद्यापीठानेच आपल्या वेबसाईटवर नमूद केलेले आहे असे असनांनाही मुक्त विद्यापीठातून कृषिविस्तार विषयात पीएच.डी. पदवी घेतलेल्या एकाला आता त्याच विषयासाठी शिक्षक व गाईड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कह्रे तर तो यूजीसीच्या नियमानुसार अशैक्षणिक पदावर आहे. त्यांनी मुक्त विद्यापीठातून प्राप्त केलेल्या कृषिविस्तार पदवीला विद्यापीठ अनुदान आयोग व कृषी अनुसंधान परिषद या दोन्ही शिखर संस्थांची मान्यता नाही. मुक्त विद्यापीठाने २००९ नंतरच्या सर्व पीएच.डी. पदवी यूजीसीने अमान्य ठरविल्या आहेत.

मुक्त विद्यापीठातील कृषी विद्याशाखेचे संचालक हे मायक्रोबायोलॉजी विषयातील एम.एस्‌सी. व पीएच.डी. आहेत. ते कृषिविस्तार न शिकताच कृषिविस्तार विषयात विद्यार्थ्यांना गाईड करणार आहेत. या बाबी यूजीसी आणि कृषी अनुसंधान परिषदेच्या नियमात बसत नाहीत. हा प्रकार म्हणजे पीएच.डी. इतिहासाच्या प्राध्यापकाने पीएच.डी. फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना संशोधन शिकवण्यासारखा आहे.

स्वायत्त विद्यापीठ[संपादन]

स्वतःची घटना, अभ्यासक्रम व नियमावली असणार्‍या, तसेच राज्य वा केंद्र सरकारच्या अधिकार कक्षेबाहेरील विद्यापीठांना स्वायत्त विद्यापीठ म्हटले जाते. उदा. मेक्सिको चे "National Autonomous University" तसेच महाराष्ट्रातील "भारती विद्यापीठ". महाराष्ट्रात याशिवाय अनेक स्वायत्त विद्यापीठे आहेत..