विद्यादेवी भंडारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विद्यादेवी भंडारी (2017)

विद्यादेवी भंडारी (जन्म : १९ जून, इ.स. १९६१) या नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा आहेत. या नेपाळच्या दुसऱ्या अध्यक्ष असून पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. १९७९ मध्ये ‘वाम’ आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आहेत. याआधी त्या नेपाळच्या संरक्षण मंत्री होत्या. त्यांचे वडील भोजपूर येथे एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे आजोबा सामाजिक कार्यात अग्रेसर होते. कम्युनिस्ट नेते मदनकुमार भंडारी हे त्यांचे पती होते. इ.स. १९९३ साली त्यांच्या पतीचे निधन झाले. १९९४ आणि १९९९ या दोन्ही वेळी त्यांनी संसदीय निवडणुकीत विजय मिळविला.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ लोकसत्ता टीम. विद्यादेवी भंडारी. लोकसत्ता. 24-03-2018 रोजी पाहिले. त्यांच्या परिवारातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांच्याकडे पाहूनच त्यांच्या गावातील इतरांनी मुलींना शाळेत पाठविण्यास सुरुवात केली होती. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)