विडा (आरती प्रकार)
Jump to navigation
Jump to search
विडा हा हिंदू धर्मातील एक आरतीचा प्रकार आहे.
आयुर्वेदामध्ये विडा खाण्याला महत्त्व आहे. अनेक मंदिरांमध्ये शेजारतीपूर्वी देवाला विडा देण्याची पद्धत असते. त्यावेळी हा आरतीप्रकार म्हटला जातो.
श्री दत्तात्रेयांची आरती (विडा)[संपादन]
विडा घेई नरहरिराया । धरूनी मानवाची काया ||
यतिवेष घेउनीयां | वससी दीनांसी ताराया ॥ धृ. ॥
ज्ञान हें पूगीफळ । भक्त नागावल्लींदळ ॥
वैराग्य चूर्ण विमळ । लवंगा सत्क्रिया सकळ ॥ विडा. ॥ १ ॥
प्रेम रंगीत कात । वेला अष्टभावसहीत ॥
जायफळ क्रोधरहीत । पत्री सर्व भूतहीत ॥ विडा. ॥ २ ॥
खोबरें हेचि क्षमा । फोडुनि द्वैताच्या बदामा ।
मनोजय वर्ख हेमा । कापूर हे शांतिनामा ॥ विडा. ॥ ३ ॥
कस्तुरी निरहंकार । न मिळती हे उपचार ॥
भीमापौत्र यास्तव फार । सत्त्वर देई वारंवार ॥ विडा. ॥ ४ ॥