विठ्ठल नारायण पुरव
विठ्ठल नारायण पुरव हे एक स्वातंत्र्य सैनिक होते.
| विठ्ठल नारायण पुरव | |
|---|---|
| जन्म: | मार्च २५, १९०१ चेंबूर, मुंबई , महाराष्ट्र, भारत |
| मृत्यू: | ऑगस्ट १२, १९५४ मुंबई,महाराष्ट्र |
| चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
| पुरस्कार: | तुर्भे-चेंबूरचे शिल्पकार |
| धर्म: | हिंदू |
| प्रभाव: | महात्मा गांधी, लोकमान्य टिळक |
| वडील: | नारायण पुरव |
बालपण व शिक्षण
[संपादन]विठ्ठल नारायण पुरव ह्यांचा जन्म दिनांक २५ मार्च १९०१ रोजी मुंबई येथील चेंबूर येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव नारायण पुरव होते. त्यांनी मँट्रिकला असतानाच महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीत भाग घेण्यासाठी पुढील शिक्षण सोडले.ते बॉम्बे बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे मध्ये अकाऊटस् खात्यामध्ये चागल्या पदावर नोकरीला होते.
स्वातंत्र्यलढा
[संपादन]महात्मा गांधी यांच्या सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी इसवी सन १९३०मध्ये आपली रेल्वे खात्यातील चांगली नोकरी सोडली.गांधीजींनी पुकारलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या सर्व आंदोलनात तसेच लढ्यात त्यांनी भाग घेतला.
तुरुंगवास
[संपादन]ते तुर्भे आणि चेंबूर परिसरात काँग्रेसचे नेते म्हणून प्रसिद्ध झाले.त्यांना त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे खालीलप्रमाणे तुरुंगवास भोगावा लागला.
- इसवी सन १९३०.
- इसवी सन १९३२.
- इसवी सन १९४२.
सामाजिक कार्य
[संपादन]इसवी सन १९३५ ते इसवी सन १९३८ ह्या काळात त्यांनी मुंबई उपनगर जिल्हालोकल बोर्ड व स्कूल बोर्ड वर उपाध्यक्ष व अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते इसवी सन १९५१-१९५२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत तुर्भे विभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी तेव्हा वर्क्स कमिटी च्या माध्यमातून लोकांची भरपूर कामे केली. पुढे त्यांना चेंबूर,कुर्ला,तुर्भे,ठाणे, आणि मुंबई उपनगर जिल्हा येथील समित्यांवर नेमले. इसवी सन १९५२ मध्ये त्यांना मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संयुक्त सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. इसवी सन १९२१ मध्ये एक ऑगस्ट रोजी त्यांनी लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ चेंबूर येथे लोकमान्य टिळक वाचनालय स्थापन केले. आजही ते वाचनालय १०३ व्या वर्षी कार्यरत आहे.त्यांनी खालील संस्था स्थापन करण्यात मदत केली.
इतर सामाजिक कार्य
[संपादन]- त्यांनी इसवी सन १९५१ साली बर्मा शेल रिफायनरीज्मुळे प्रकल्पग्रस्त झालेल्या भूमीपुत्रांना योग्य मोबदला आणि रोजगार हमी उपलब्ध करून दिली.हरिजन सेवक संघ व डिप्रेस्ड क्लास मिशन ह्या संस्थाचे पदाधिकारी असताना त्यांनी गांधीजीचा अस्पृश्य उद्धार कार्यक्रम चागल्या रीतीने राबविला.
- भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु फाळणी झाल्यामुळे अनेक निर्वासित लोक भारतात आले.पुरव यांनी चेंबूर येथे आलेल्या निर्वासितांच्या समस्या संवेदनशीलता व प्रशासकीय कौशल्य वापरून पीस अँड प्रोटेक्शन ह्या संस्थेच्या अध्यक्ष नात्याने पार पाडल्या.
- विनायक पुरव हे क्षात्रैक्य समाजाचे विश्वस्त होते.त्यांनी ज्ञातीबांधवांसाठी चांगले कार्य केले.
- बी.बी.सी.आय. रेल्वे मध्ये रेल्वे असोसिएशनचे पदाधिकारी असताना त्यांनी कामगारांच्या हितासाठी काम केले.
- कुर्ला गिरणी कामगारांच्या संघाचे अध्यक्ष असताना त्यांनी गिरणी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.
- इंडियन मर्चंटस् चेंबरमध्ये ते अकाऊंटंट ह्या पदावरून चीफ अकाऊंटंट पदावर फार कमी अवधीत पोहोचले.
पुरस्कार
[संपादन]त्यांच्या देशासाठी आणि देशबांधवासाठी केलेल्या निस्पृह सेवेबद्दल त्यांना तुर्भे-चेंबूरचे शिल्पकार म्हणून गौरविण्यात आले. ह्या स्वातंत्र्य सैनिकाची पुण्यस्मृती आजही जनतेच्या मनात आहे.
शीव तुर्भे रस्ता
[संपादन]विनायक पुरव ह्यांनी आपल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत देशासाठी व देशातील लोकांच्या हितासाठी केलेल्या सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील निस्पृह कार्याची आठवण राहावी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने जुन्या मुंबईच्या सीमेपासून वाशी येथील खाडीच्या पलीकडे तुर्भे येथे जाणाऱ्या रस्त्याला इसवी सन १९६९ साली विठ्ठल नारायण पुरव मार्ग म्हणून नाव दिलेले आहे.
मृत्यू
[संपादन]दिनांक १२ ऑगस्ट १९५४ रोजी वयाच्या ५४ व्या वर्षी अल्पशा आजाराने विठ्ठल पुरव यांचे निधन झाले.[१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ↑ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, मंगळवार,३ डिसेंबर २०२४ लेख-प्रविण कदम-मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक