विजय गोखले (डॉक्टर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
डॉ. विजय गोखले

डॉक्टर विजय गोखले (Dr. Vijay Gokhale) हे सनबीम इन्फो, पाय सोल्यूशन्स आणि स्टर्लिंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे तांत्रिक निर्देशक आहेत. त्यांच्याकडे आयुर्वेदातली बी.ए.एम.एस. ही पदवी आहे. त्याशिवाय त्यांनी ज्योतिषशास्त्र या विषयाचा अभ्यास केला आहे व नाटक (दिग्दर्शन, अभिनय) या क्षेत्रात काम केले आहे. पुण्यात आधी वैद्यकीय क्लासेस घेतले जात नसत. पुण्यात वैद्यकीय क्लासेसची संकल्पना डॉ. विजय गोखले यांनी रुजू केली. आणि नंतर संगणक क्षेत्रात काम चालू केले.[१] २००३ साली त्यांनी विंडोज आज्ञावली (इंग्लिश: Windows Programming) शिकवायला सुरुवात केली.[२]

नाट्य क्षेत्र[संपादन]

१९८७ साली त्यांचा प्रवेश नाट्यक्षेत्रात झाला, तेव्हा ते कॉलेजमध्ये होते. कॉलेजकडून नाटके बसवत असतानाच त्यांनी दिग्दर्शनाला सुरवात केली. नाटकातील अभिनयाची त्यांची कारकीर्द सफल होण्यास डॉ. मोहन आगाशे यांचा हातभार लागला. १९९६ साली सोहम करंडक नाट्य स्पर्धेमध्ये त्यांनी प्रतिबिंब या त्यांच्या नाट्यसंस्थेद्वारे “THE DEATH OF CONQUEROR” ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेमध्ये जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर याचे २० एप्रिल इ.स. १९४५ ते ३० एप्रिल इ.स. १९४५ या त्याच्या आयुष्यातील बंकरमधल्या शेवटच्या दहा दिवसांचे, म्हणजेच त्याच्या इव्हा ब्राऊनशी झालेल्या विवाहापासून ते दोघांच्या आत्महत्येपर्यंतचे सादरीकरण होते. सदर एकांकिकेला बक्षीस मिळाल्यानंतर त्यांच्या रंगभूमीवरील हौशी नाट्यकलेला त्यांनी अर्धविराम दिला. [३]

Dr. Vijay D. Gokhale

संगणक क्षेत्र[संपादन]

१९९७ साली त्यांचा संगणकाशी प्रथम परिचय झाला. [२] २१ वर्षापासून ते संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.[४] 'विरॅमिक्स' नावाची ऑपरेटिंग सिस्टिम ते बनवत आहेत. त्यांनी 'ॲपल' चा 'फायनल कट स्टुडिओ' हा पाच परीक्षा असलेला कोर्स विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला आहे. असे करणारे ते भारतातीलच नव्हे तर भारतीय उपखंडातील एकमेव व्यक्ती आहेत. 'फायनल कट स्टुडिओ' हे चित्रपटांच्या संपादनासाठी वापरले जाणारे सर्वोत्कृष्ट सॉफ्टवेअर मानले जाते.[५] या सॉफ्टवेअरची पहिली परीक्षा उत्तीर्ण होणारे फक्त ३१ भारतीय आहेत. आणि दुसरी परीक्षा उत्तीर्ण होणारे डॉ. विजय गोखले हे एकमेव भारतीय आहेत..[६] या सॉफ्टवेअरला मनोरंजन व्यवसायात खूप वाव आहे.

डॉ. विजय गोखले

संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ २२ फेब्रुवारी २०११, पुणे परिचय - सौ.वसुधा कर्दळे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : डॉ.विजय गोखले (२७ सप्टेंबर २०१२ ला जसे बघितले तसे)
  2. a b विजय गोखले यांच्या विद्यार्थ्याने तयार केलेले ( इतर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी ) संकेतस्थळ गोखले सर ह.भ.प. डॉ. गोखले सर : एक बहुआयामी व्यक्तिमत्व
  3. ^ ह.भ.प. डॉ. गोखले सर : एक बहुआयामी व्यक्तिमत्व-भाग २: कलासक्त
  4. ^ स्टर्लिंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड संकेतस्थळ
  5. ^ २२ फेब्रुवारी २०११, पुणे परिचय - सौ.वसुधा कर्दळे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : डॉ.विजय गोखले (२७ सप्टेंबर २०१२ ला जसे बघितले तसे)
  6. ^ शुक्रवार, १३ मार्च २००९, नितीन ब्रम्हे, पुणे मिरर Apple of the film editor’s eye (२७ सप्टेंबर २०१२ ला जसे बघितले तसे)


संदर्भ यादी[संपादन]

1. http://astromedicomp.org/Images/other/02-PuneSakal-04042009.jpg
2. http://astromedicomp.org/Images/other/01-PuneMirror-13032009.jpg
3. http://astromedicomp.org/Images/other/03-SataraPudhari-28122009.jpg
4. http://astromedicomp.org/Images/other/04-PuneParichay-25022011.jpg
5. http://astromedicomp.org/Images/other/05-PuneLife365-09022013.jpg