विजया डब्बे
विजया डब्बे | |
---|---|
चित्र:Vijaya Dabbe.jpeg | |
जन्म नाव | विजया |
जन्म |
१ जून १९५१ डब्बे, बेलूर, कर्नाटक, भारत |
मृत्यू |
२३ फेब्रुवारी, २०१८ (वय ६६) म्हैसूर, कर्नाटक, भारत |
भाषा | कन्नड भाषा |
साहित्य प्रकार |
|
विषय |
|
चळवळ | कर्नाटकातील स्त्रीवादी चळवळ |
वडील | कृष्णमूर्ती |
आई | सीतालक्ष्मी |
विजया डब्बे (१ जून १९५१ - २३ फेब्रुवारी २०१८) या कन्नड भाषेतील भारतीय लेखिका, स्त्रीवादी, विद्वान आणि समीक्षक होत्या.[१] बऱ्याचदा आधुनिक कन्नड भाषेतील पहिल्या स्त्रीवादी लेखिका म्हणून ओळखल्या जातात. विजया डब्बे या कर्नाटकातील स्त्रीवादी चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती होत्या.[२][३][४]
वैयक्तिक जीवन
[संपादन]विजया यांचा जन्म १ जून १९५१ रोजी बेलूर तालुक्यातील डब्बे गावात कृष्णमूर्ती आणि सीतालक्ष्मी यांच्या पोटी झाला.[५] त्यांचे शालेय शिक्षण कलासापुरा आणि जवागल येथे पूर्ण केले. नंतर उच्च शिक्षणासाठी हसन आणि म्हैसूर येथे गेल्या. त्यांनी म्हैसूर विद्यापीठात कन्नड विद्याशाखा सदस्य म्हणून काम केले.[५]
कारकीर्द
[संपादन]- लेखक म्हणून
विजया डब्बे यांची पहिली प्रसिद्ध साहित्यकृती होती 'इरुत्थावे' ( अर्थ: ते अस्तित्वात आहेत). कवितांचा संग्रह, १९७५ मध्ये प्रकाशित झाला. 'नीरू लोहडा चिंता' ( अर्थ: पाणी आणि धातुंच्या चिंता' (१९८५) आणि 'नारी दारी दिगंथा' वगैरे . त्यांची बहुतेक कामे स्त्रीकेंद्री आहेत.
- स्त्रीवादी चळवळ
विजया डब्बे या १९७८ मध्ये स्थापन झालेल्या ‛समथा वेदिकेच्या' संस्थापकांपैकी एक होत्या. हा एक महिला लेखिका आणि कार्यकर्त्यांचा एक गट आहे. तो लैंगिक समानता, महिलांवरील कौटुंबिक अत्याचार, हुंडा, बालविवाह, इतर जातींबद्दल जागरुकता पसरवण्याचे काम करत आहे. नैराश्यग्रस्त वर्गासाठी, विशेषतः महिलांवर आधारित भेदभाव आणि सामाजिक अन्याय झालेल्या लोकांसाठी काम करतो. संपूर्ण कर्नाटकात त्यांच्या कविता, लेख, कार्यशाळा, साहित्य संमेलने आणि सामाजिक कार्यांद्वारे या उपक्रमांचे नेतृत्व करण्यात डब्बे हा आघाडीचा चेहरा होता. [६]
मृत्यू
[संपादन]विजया डब्बे ६ जानेवारी १९९९ रोजी एका रस्त्यावरील अपघातात सापडल्यानंतर त्या निष्क्रिय झाल्या.[६] २३ फेब्रुवारी २०१८ रोजी म्हैसूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.[७][८]
संदर्भ
[संपादन]- ^ "Writer Vijaya Dabbe passes away". Times of India. 24 Feb 2018. 22 Oct 2020 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "ಹಿರಿಯ ಸಾಹಿತಿ ವಿಜಯಾ ದಬ್ಬೆ ನಿಧನ" [Senior writer Vijaya Dabbe no more]. Vijayakarnataka (Kannada भाषेत). 23 Feb 2018. 22 Oct 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Kannada writer Vijaya Dabbe dies after cardiac arrest". The New Indian Express. 24 Feb 2018. 23 Oct 2020 रोजी पाहिले.
- ^ "ಮಹಿಳಾ ಚಳುವಳಿಗೆ ಗಟ್ಟಿ ನೆಲೆ ಒದಗಿಸಿದ ದಬ್ಬೆ" [Dabbe, who cemented strong base for women movement]. Prajavani (Kannada भाषेत). 26 Mar 2018. 23 Oct 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ a b G. N. Ranganatha Rao (4 Mar 2018). "ಸ್ತ್ರೀವಾದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ವಿಜಯಾ 'ದಬ್ಬೆ'" [Vijaya 'Dabbe' of feminist literature]. Varthabharati (Kannada भाषेत). 22 Oct 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ a b N. Gayatri (8 Mar 2018). "ಮಹಿಳಾ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ದಾರಿದೀವಿಗೆ" [Lamp for women movement]. Prajavani (Kannada भाषेत). 23 Oct 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)N. Gayatri (8 Mar 2018). "ಮಹಿಳಾ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ದಾರಿದೀವಿಗೆ" [Lamp for women movement]. Prajavani (in Kannada). Retrieved 23 Oct 2020.
- ^ "Writer Vijaya Dabbe dead". The Hindu. 24 Feb 2018. 23 Oct 2020 रोजी पाहिले.
- ^ "Vijaya Dabbe is no more". citytoday. 24 Feb 2018. 23 Oct 2020 रोजी पाहिले.[permanent dead link]
- मृत बाह्य दुवे असणारे लेख from November 2022
- कायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख
- कन्नड भाषेतील संदर्भ
- इ.स. १९५१ मधील जन्म
- इ.स. २०१८ मधील मृत्यू
- भारतीय स्त्रीवादी
- कन्नड लेखक
- कर्नाटकमधील व्यक्ती
- कन्नड कवी
- कन्नड लोक
- हसन जिल्ह्यातील लोक
- २१व्या शतकातील भारतीय लेखक
- कन्नड भाषेतील लेखक
- कर्नाटकातील महिला लेखिका
- भारतीय स्त्रीवादी लेखिका