विकिपीडिया चर्चा:भाषांतर प्रकल्प/मशिन ट्रान्सलेशन/त्रुटी अभ्यास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अपरिष्कृत मशिन ट्रांसलेशन्स[संपादन]

मराठी विकिपीडियावर नवीन गूगल मराठी ट्रांसलेशनची सुविधा वापरून,पुढे कोणतेही भाषाशुद्धी चिकीत्सा/सुधारणा न करता एका अनामिक सदस्याकडून मराठी विकिपीडीयावर खैरलांजी हत्याकांड लेखात या संपादनान्वये एक इंग्रजी विकिवरील लेखाचा अनुवाद कॉपी पेस्ट केला आहे. काही संबंधीत मुद्दे आहेत.


अ)मशिन ट्रांसलेशनवर मेहनत घेण्याची जरूरी आहे या बाबीचा मी पूर्ण समर्थक आहे पण कोणत्याही सदस्याने अशा अनुवादास स्वत: परिष्कृत करावे आणि मगच मुख्य नामविश्वात जोडावे.

आ)मुख्यनाम विश्वात घेण्यापुर्वी अशा कामा करिता आवश्यकता पडल्यास वेगळ्या धूळपाट्या बनवाव्यात. किंवा अजून काही सूचना असल्या तर मांडाव्यात.

इ) पण सर्वात महत्वाच अपरिष्कृत मशिन ट्रांसलेशन्स सामाजिक आणि राजकिय संवेदनशील विषयातील लेखात चुकीनेही जोडू नयेत .खरेतर सामाजिक आणि राजकिय संवेदनशील विषयातील लेखांचे मशिनी अनुवाद करण्याचा मोह पुर्णत: टाळावा.व्याकरण आणि शब्दरचना चूकल्या तर अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता संभवते.

उ) अपरिष्कृत मशिन ट्रांसलेशन्स संपादन गाळण्यांना ओळखू यावीत म्हणून अशा अपरिष्कृत अनुवादांची व्याकरणीय आणि शाब्दीक वैशीष्ट्ये नमुद करून सहकार्य करावे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:१९, २६ मे २०१३ (IST)