विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखाचा उद्देश काय आहे? जगात हजारो, लाखो अशी स्थाने आहेत ज्यांना अनेक नावांनी ओळखले जाते. सगळी येथे देणे अशक्य आहे. त्यांची जंत्री देउन काय नक्की साध्य होईल?

येथे इतर नावांकडून मुख्य नावाकडे पुनर्निर्देशन असतेच, तरी शोध घेण्यास अडचण येत नाही - उदा. बॉम्बे कडे दुवा दिला असता तो आपोआप मुंबईकडे जातो.

हे पान तसेच इतरही नुसतीच जंत्री असलेली पाने असू नयेत हे माझे मत आहे.

अभय नातू ११:३८, ३ मे २०११ (UTC)

+१ दुजोरा - एक स्थान अनेक नावे या लेखात जरी बर्‍यापैकी माहिती असली, तरी या प्रकारचा लेख "विश्वकोशात" नसावा, किंबहुना "रिडायरेक्टस्" अधिक उचित आहेत असे मला वाटते. Kaajawa १९:५९, ८ सप्टेंबर २०११ (UTC)
+१ दुजोरा - पुनर्निर्देशनाने हे काम होऊ शकते. क्षितिज पाडळकर (चर्चा) १२:३७, २५ फेब्रुवारी २०१३ (IST)
या वर अजून काही सदस्यांशी चर्चा करून मग हे पण काढावे असे माझे मत आहे. सध्या तरी निदान .... ०... म्हणजे +१ पण नाही किंवा -१ ... पाहिजे तर ही चर्चा चावडीवर टाकावी....मंदार कुलकर्णी १५:४६, ९ सप्टेंबर २०११ (UTC)

दुहेरी नावे[संपादन]

दुहेरी नावे असलेली स्थाने जगात अनेक असतील, पण लाखो नसतील हे नक्की. बॉम्बे लिहिले की मराठी विकिपीडियावर कदाचित मुंबई हे पान उघडेल. पण मराठीत शुद्ध समजले जाणारे ’ट्यूनिशिया’, गुजराथ, कोचीन, पतियाळा लिहिले तर अनुक्रमे ट्युनिशिया, गुजरात, कोच्चि, पटियाला ही मराठीतल्या अप्रचलित अनोळखी नावांची पाने उघडतील? मी स्वत: नव्याने उघडलेले ’महाराष्ट्रातील घाटरस्ते’ हे पान मलाच सहजासहजी सापडत नाही. अशा वेळी असल्या यादीचा उपयोग होईल. यादीतल्या शब्दांना दुवे दिले की त्या विषयाचेच पण वेगळे नाव असलेले पान शोधायला मदत होईल, असे मला वाटते..J १८:२८, ४ मे २०११ (UTC)

पण मराठीत शुद्ध समजले जाणारे ’ट्यूनिशिया’, गुजराथ, कोचीन, पतियाळा लिहिले तर अनुक्रमे ट्युनिशिया, गुजरात, कोच्चि, पटियाला ही मराठीतल्या अप्रचलित अनोळखी नावांची पाने उघडतील?
हो, उघडतील. नसली उघडत तर ती पुनर्निर्देशने तयार करावी. नुसत्या यादीने फारसे काही साध्य होत नाही असे मला वाटते.
अभय नातू १८:४०, ४ मे २०११ (UTC)

पान शोधणे?[संपादन]

केवळ पान शोधणे हा संकुचित उद्देश असता कामा नये. नावांची माहिती हा उद्देश असला पाहिजे. भारतातील किती गावांची नावे १९४७ नंतर बदलली असा जर प्रश्न एखाद्याला पडला तर त्याचे अंशतः समाधान ह्या पानावरील माहिती वाचून होऊ शकेल. समजा मला चंद्रभागा हे कोणकोणत्या नद्यांचे नाव आहे हे हवे आहे. किंवा बंबई हे कोणत्या शहराचे दुसरे नाव आहे हे हवे आहे. या नावाची पाने मराठी विकिपीडियावर असण्याची शक्यता नाही. शार्मण्य, विलायत, कॉन्स्टॅन्टिनोपल ही नावे आता वापरात नाहीत, पण कोणत्यातरी शहरा-देशाची जुनी नावे आहेत एवढे माहीत असलेल्या माणसाने नवी नावे कशी शोधायची? या जुन्या नावांची पाने मराठी विकिपीडियावर असतीलच असे नाही. जुने नाव समजले की जिज्ञासा पूर्ण झाली, कुठलेही पान शोधण्याचा विचार करायचे कारणच नाही....J १७:५३, ९ सप्टेंबर २०११ (UTC)


कल आज और कल[संपादन]

जे, आपण म्हणता ते काही औंशी बरोबर आहे, पण अभय ह्याच्या म्हणण्या प्रमाणे पुनर्निर्देशने हि पद्धत आपण आजवर वापरत आलो आहे आणि त्यामुळे काही अंशी अश्या आशयाच्या समस्या उत्तम रित्या हाताळता येतात. विश्वकोशिय लेखनात आपण विपी वर याद्या देण्याचे टाळतो (वर्गाद्वारे त्या काही प्रमाणात तयार होतात) म्हणून त्यास विरोध असणे स्वाभाविक आहे. आता अश्या आशयाची संकलित माहिती मोठ्या प्रमाणात बहुतेक पहिल्यांदीच पुढे आल्याने त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे असे वाटते.

अभय, माहितीचा मोह असे आपण यास म्हणू शकता पण सदर माहिती आपण कुठे आणि कशा तर्हेने सामाऊन घेऊ शकू यावर आपण सुचवावे जसे

  1. विक्शनरी कडे वळती करता येईल का ?
  2. यासठी वेगळे दालन अथवा तत्सम प्रकल्प द्वारे ती संकलित करावी का ? (संकल्प, प्रकल्प भूगोल वैगरे वापरता येईल का ? )
  3. माहितीच्या लेखात सुरुवातीस अथवा शेवटी विशेष मथळा निर्माण करण्यात यावा आणि तिथे हि संबंधित माहिती वळती करावी जेणे करून शोध यंत्रास ती सापडेल.
  4. तक्ते हा प्रकार विश्वकोशिय लेखनात सामाऊन घेण्याचे काही उत्तम पर्याय असतील तर त्यावरही विचार व्हावा कारण भविष्यात आपणास तक्ते प्रकारच्या माहितीची समस्या येणारच.

राहुल देशमुख ०८:००, १३ सप्टेंबर २०११ (UTC)

विश्वकोशीय लेखांच स्वरूप निव्वळ याद्यांच बनू नये म्हणून संकेत आहे. परंतु ऐतिहासिक स्वरूपाच्या माहितीच जतन या लेखातून होत असल्यास तो विश्वकोशीय उल्लेखनीयतेत बसतो असे माझे व्यक्तिगत मत आहे. पण निर्णय शक्यतो भविष्यात इथे जे इतिहास,व्युत्पत्तीशास्त्र,भूगोल या विषयातील जाणकारांवर निर्णय सोडावा असे माझे मत आहे. लेखास व्यवस्थीत विश्वकोशीय रूप मिळण्याची संधी मिळावी म्हणून धूळपाटीवर स्थानांतरीत केला.
in any case इतिहास,व्युत्पत्तीशास्त्र,भूगोल प्रकल्पांशी संलग्न यादी म्हणून हे पान जतन करता येऊ शकेल असे माझे मत आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:१६, २५ फेब्रुवारी २०१३ (IST)

पुनर्निर्देशने हा मार्ग सोईचा असेलच असे नाही[संपादन]

लेखातल्या भारत किंवा ब्रह्मपुत्रा या नावाची अनेकानेक रूपांतरे पहा. त्यासाठी पुनर्निदेशाने किती पाने उघडावी लागतील याचा विचार करावा.

इतिहास, व्युत्पत्तिशास्त्र, भूगोल या विषयातील जाणकारांची किती वर्षे वाट पहाणार? त्यापेक्षा आपल्यापैकी कोणीतरी ’ते’ व्हावे....J (चर्चा) २१:५२, १ जून २०१३ (IST)

भारतातील गावाची ओळख - जनगणनेतील विशिष्ठ (युनिक) स्थळ निर्देशांक[संपादन]

मला राज्यातील (आणि मग देशातीलही) प्रत्येक गावावर प्रथम भारत सरकारने केलेली जनगणना २०११ मधील माहिती वापरून एक लेख तयार करायचा आहे . स्थानिक नागरिक या लेखात वास्तव परिस्थिती, इतर आशय नंतर जोडू शकतील. एकाच नावाची गावे अनेक असल्याने बराच गोंधळ होतो. एका तालुक्यात एकाच नावाची अनेक गावे आहेत, तशीच ती जिल्ह्यात व राज्यात/देशात आहेत. म्हणून जनगणनेत प्रत्येक गावाला विशिष्ठ स्थळ निर्देशांक (village/town code)निश्चित केला आहे. हि यादी आपण तालुकावार, जिल्हावार, राज्यवार उपलब्ध करून देवू शकतो. गावाच्या नावासोबत हा कोड कंसात टाकल्यास विशिष्ठ गाव शोधणे शक्य/सोपे होईल. आपण या संदर्भाचा आधार घेवून भारतासाठी धोरण ठरवू शकू.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:१६, १२ डिसेंबर २०१५ (IST)


लेखातील मजकूर चुकून कापला गेला[संपादन]

या लेखातील 'असीरिया'नंतरचा सुमारे ५०ॅ,००० बाईट्स अकारमानाचा मजकूर चुकून कापला गेला आहे, कुणी तो परत आणू शकेल? ... (चर्चा) ११:४२, १३ मार्च २०१६ (IST)