विकिपीडिया चर्चा:आय.आर.सी. चॅनेल
साशंकता
[संपादन]मराठी आय.आर.सी. चॅनेल बद्दल साहाय्यपाने आणि प्रकल्प पान असण्यास आणि त्यात आय.आर.सी. गप्पांचा दुवा (लिंक) देण्यास हरकत नाही. साहाय्य आणि प्रकल्प पानांवर उदाहरण म्हणून चॅटच्या भागाचा स्क्रीनशॉट चित्र देण्यास हरकत नसावी. आय.आर.सी चॅट बऱ्यापैकी इनफॉर्मल प्लॅट फॉर्म आहे त्यामुळे सबंध चॅट विकिपीडियावर प्रकाशित करण्या बद्दल मी साशंकीत आहे. आय.आर.सी चॅट आवश्यकता नसताना पूर्ण प्रकाशित करणे आय.आर.सी चॅट मधील व्यक्तीगत हेवेदावे विकिपीडियावर अनावश्यक स्वरुपात स्पीलओव्ह होण्याचा धोका असू शकेल किंवा कसे. किमानपक्षी अंकपत्ता (आयपी ॲड्रेस) जिथे इंडीव्हिज्यूअल नावाशी लिंक होतो आहे ती माहिती विशीष्ट गरज नसताना प्रकाशित करु नये असे माझे व्यक्तीगत मत आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३७, १० डिसेंबर २०१५ (IST)