विकिपीडिया:सांगकाम्या/धोरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:Bot policy या पानावरून पुनर्निर्देशित)

सांगकाम्या चालक[संपादन]

संपादकाला सांगकाम्या चालवण्याचा विशेषाधिकार मिळण्यासाठी पुढील अपेक्षा आहेत:

  • सांगकाम्या चालक हा विश्वासार्ह्य असावा.
    • Bot flag (सांगकाम्या विशेषाधिकार) असल्यास संपादनांचा वेग झपाट्याने वाढतो. क्षुल्लक चुकीमुळेसुद्धा भरपूर विध्वंस होऊ शकतो.
  • चालकाने भरपूर दिवस/वर्षे मराठी विकिपीडियावर संपादने केलेलीच असावी अशी अट नाही, पण चालकाला मराठी व्याकरण व शब्द लेखनशैलीचा, व त्यातील खाचखळग्यांचा अनुभव आहे एवढं सिद्ध होण्यापुरता संपादनांचा इतिहास असावा.
    • विश्वासार्ह्यता सिद्ध होण्यासाठी मराठी विकिपीडियावरील कार्यकाळ कमी असला तरी विकीमीडियाच्या इतर विकीवरील अनुभव ग्राह्य धरला जाऊ शकतो.
  • सांगकाम्या चालक उत्तरदायी असावा.
    • इतर संपादकांनी सांगकाम्याच्या संपादन संदर्भात सर्वसाधारण प्रश्न/शंका विचारल्यास चालकाने त्याचे निरसन करायला हवे.

सांगकाम्या खाते[संपादन]

  • सांगकाम्या खात्याच्या नावात "सांगकाम्या", "काम्या", किंवा "bot" हे शब्द असावे. (उदा: "क्रिकाम्या" - क्रिकेट संदर्भात संपादन करणारा सांगकाम्या, "KiranBOT" - usernamekiran द्वारे चालवण्यात येणारा सांगकाम्या.)
  • सांगकाम्याच्या नावात चालकाचे, किंवा कार्याचे नाव असावे. (वरील उदाहरण बघा.)
  • सांगकाम्याच्या सदस्य पानावर चालकाच्या खात्याचा स्पष्टपणे उल्लेख असावा.
    • तसे नसल्यास कोणत्याही संपादकास सांगकाम्याच्या सदस्य पानावर {{सांगकाम्या|चालकाचे नाव}} असा साचा टाकण्यास मुभा आहे.