विकिपीडिया:सोलापूर विद्यापीठ “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करणार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

.27 फेब्रुवारी हा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा करावयाचा आहे.

त्यानुसार सोलापूर विद्यापीठामध्ये मा. कुलगुरु महोदयांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे.

अ.क्र. नाव
मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण संचालनालय, सोलापूर विभाग, सोलापूर
मा. कुलसचिव
मा. संचालक, महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ
मा. वित्त व लेखा अधिकारी
मा. संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग
मा. समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना
डॉ. आर. बी. चिंचोलकर, सहायक प्राध्यापक, पत्रकारीता विभाग
डॉ. प्रभाकर कोळेकर, सहायक प्राध्यापक, सामाजिकशास्त्र संकुल
डॉ. सुहास पुजारी, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर
डॉ. राजशेखर शिंदे, डी. बी. एफ. दयानंद आर्टस ॲन्ड कॉमर्स कॉलेज, सोलापूर
विद्यापीठ अभियंता
प्रा. एन. एस. काटीकर, राज्य समन्वयक, विकिपीडीया, अभियांत्रिकी महाविद्यालये
श्री. पी. आर. चोरमले, सिस्टीम ॲनॅलिस्ट

सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांनी खाली दिलेल्या सूचनानुसार दि.20 ते 26 फेब्रुवारी, २०१७ दरम्यान आपल्या महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करावे व दि.27 फेब्रुवारी, 2017 रोजी सोलापूर विद्यापीठामार्फत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा.

अ.क्र. महाविद्यालयांची नावे महाविद्यालयांनी करावयाची कार्यवाही
1. सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांनी करावयाची कार्यवाही
  1. आपल्या महाविद्यालयात “मराठी भाषा व साहित्य मंडळ” स्थापन करुन मंडळाच्या सदस्यांची नावे विद्यापीठास कळवावीत.
  2. मराठी भाषेचा उगम, विकास, समृध्दी, भवितव्य तसेच सदरहू भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन महाविद्यालयातील शिक्षक/विद्यार्थी यांनी लेख लिहून तो मराठी विकीपिडीयावर उपलब्ध करावा. (आपल्या महाविद्यालयातील शिक्षक/विद्यार्थी यांच्याकडून सदर लेख लिहून ते विकीपिडीयावर उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठास सादर करावेत. याबाबत अधिकच्या माहितीसाठी प्रा. एन. एस. काटीकर, राज्य समन्वयक, विकिपीडीया, अभियांत्रिकी महाविद्यालये मो. नं. 9422644246 व श्री. पी. आर. चोरमले, सिस्टीम ॲनॅलिस्ट मो. नं. 7774011444 )
  3. सकस साहित्याची, नव्या माहितीची आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची मराठीतील पुस्तके वाचकांपर्यत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यभर ग्रंथप्रदर्शन / ग्रंथोत्सव / ग्रंथदिंडी आयोजित करणे (राष्ट्रीय सेवा योजना विभाग). अधिक माहितीसाठी डॉ. बी. एन. कांबळे, समन्वयक, रा.से.यो. मो. नं. 9420780072
  4. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीविषयक विविध प्रकारच्या स्पर्धा (निबंध, वक्तृत्व इ.) आयोजित करणे.
  5. कुसुमाग्रज व इतर सुप्रसिद्ध थोर मराठी साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करणे.
  6. मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाठी कार्य करणाऱ्या नि:स्पृह व्यक्ती व त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांना किंवा प्रकल्पांना भेट देणे.
2. सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व शिक्षणशास्त्र महाविद्यालये
  1. मातृभाषेची महती आणि माहिती, तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व समाज जीवनातील स्थान आणि मातृभाषेचे मानसशास्त्रीय व शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महत्व या विषयांवर विचारमंथनात्मक कार्यक्रम आयोजित करणे.
3. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर
  1. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाच्या विविध उपक्रमांना प्रसिद्धी देणे. (याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाचे सहकार्य घ्यावे).
4. i) वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर

ii) स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर

iii) एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगांव

  1. युनिकोडप्रणित मराठी आणि इन्स्क्रिप्ट मराठी कळफलक संबंधित विषयांवरील प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करणे.
  2. समाजप्रसार माध्यमांतील (सोशल मिडीया) मराठी, माहिती तंत्रज्ञान व मराठी, माहजालावरील (इंटरनेट) मराठी या क्षेत्रांतील तज्ञांची व्याख्याने व सादरीकरणे यांचे आयोजन करणे.
5. सांगोला महाविद्यालय, सांगोला
  1. युनिकोडप्रणित मराठी आणि इन्स्क्रिप्ट मराठी कळफलक संबंधित विषयांवरील प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करणे.
  2. समाजप्रसार माध्यमांतील (सोशल मिडीया) मराठी, माहिती तंत्रज्ञान व मराठी, माहजालावरील (इंटरनेट) मराठी या क्षेत्रांतील तज्ञांची व्याख्याने व सादरीकरणे यांचे आयोजन करणे.
  3. शब्दभांडार आणि नवीन पर्यायी शब्दनिर्मिती याबाबतच्या स्पर्धा आयोजित करणे.
  4. म्हणी, वाक्यप्रचार, प्राचीन शब्द यांची व्युत्पत्ती या विषयांवर रंजक व्याख्याने / सादरीकरणे करणे.
अ.क्र. महाविद्यालयांची नावे महाविद्यालयांनी करावयाची कार्यवाही
6. डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्टस् ॲन्ड सायन्स, सोलापूर
  1. मराठी वर्णमालेबाबत सादरीकरण किंवा व्याख्याने यांचे आयोजन करणे.
  2. बोली भाषंवरील कार्यक्रमांचे आयोजन (व्याख्याने, चर्चासत्रे, सादरीकरणे...इ.) करणे.
  3. मोडी लिपीचे प्रशिक्षण, व्याख्यान किंवा परिसंवादाचे आयोजन करणे.
7. i) संगमेश्वर कॉलेज, सोलापूर

ii) वालचंद आर्टस् ॲन्ड सायन्स कॉलेज, सोलापूर

  1. मराठी वर्णमालेबाबत सादरीकरण किंवा व्याख्याने यांचे आयोजन करणे.
  2. बोली भाषंवरील कार्यक्रमांचे आयोजन (व्याख्याने, चर्चासत्रे, सादरीकरणे...इ.) करणे.
  3. मराठी भाषा / साहित्य कोष वाङमय या विषयांवर व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन तसेच तज्ञ, विचारवंत व साहित्यिकांच्या मुलाखतींचे आयोजन करणे.
8. i) विज्ञान महाविद्यालय, सांगोला

ii)शिवाजी महाविद्यालय, बार्शी

iii)शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज

iv) सी. बी. खेडगीज महाविद्यालय, अक्कलकोट

vi) मारुतीराव हरिराव महाडिक महाविद्यालय, मोडनिंब

  1. शब्दभांडार आणि नवीन पर्यायी शब्दनिर्मिती याबाबतच्या स्पर्धा आयोजित करणे.
  2. म्हणी, वाक्यप्रचार, प्राचीन शब्द यांची व्युत्पत्ती या विषयांवर रंजक व्याख्याने / सादरीकरणे आयोजित करणे.
9. i) श्री. संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा

ii) सुवर्णलता गांधी महाविद्यालय, वैराग

iii) माऊली महाविद्यालय, वडाळा

iv) संतोष भिमराव पाटील आर्टस्, सायन्स ॲन्ड कॉमर्स  कॉलेज, मंद्रुप

  1. मराठी सुलेखन, सुंदर मराठी हस्ताक्षर स्पर्धा व संबंधीत कार्यशाळांचे आयोजन करणे.
  2. मराठी कविता, प्रसिद्ध उतारे, मराठी भाषा विषयक घोषवाक्ये यांचे भित्तीचित्र प्रदर्शन किंवा स्पर्धेचे आयोजन करणे.
10. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
  1. शब्दभांडार आणि नवीन पर्यायी शब्दनिर्मिती याबाबतच्या स्पर्धा आयोजित करणे.
  2. म्हणी, वाक्यप्रचार, प्राचीन शब्द यांची व्युत्पत्ती या विषयांवर रंजक व्याख्याने / सादरीकरणे आयोजित करणे.
  3. मोडी लिपीचे प्रशिक्षण, व्याख्यान किंवा परिसंवादाचे आयोजन करणे.
१1. पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
  1. प्रचारमाध्यमे तसेच प्रशासनात मराठी भाषेचा वापर याबाबत व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, सादरीकरणे यांचे आयोजन करणे.
  2. दि.२७/०२/२०१७ रोजी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात योग्यवेळी (शक्यतो समारोपाच्या गाण्याआधी) ४ पुरस्कार विजेत्यांवरील AVs (२०-२५ मि.) दाखविण्याची व्यवस्था करणे.

उपरोक्त कार्यक्रमांचे यशस्वी नियोजन करण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील शक्यतो मराठी विषयांच्या शिक्षकांची समन्वयक म्हणून नियुक्ती करुन त्यांची नावे विद्यापीठास तसेच डॉ. सुहास पुजारी, डॉ. राजशेखर शिंदे व प्रा. हनुमंत मते यांच्याकडे कळवावीत.

अधिक माहितीसाठी 1. डॉ. सुहास पुजारी, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर मो. नं. 9960272031,

2. डॉ. राजशेखर शिंदे, डी. बी. एफ. दयानंद आर्टस ॲन्ड कॉमर्स कॉलेज, सोलापूर

मो. नं. 9146576904

3. प्रा. हनुमंत मते, मा. संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग मो. नं. 9822172285

यांच्याशी संपर्क साधावा.

तरी वरीलप्रमाणे सर्व कार्यक्रमाचा अहवाल शासनास सादर करावयाचा असल्याने याबाबत कार्यवाही करुन त्याचा कार्यपूर्ती अहवाल छायाचित्रासह सोलापूर विद्यापीठास सादर करावा.

(बी. पी. पाटील)

प्र. कुलसचिव

सोलापूर विद्यापीठ, सोलापू