विकिपीडिया:पीपल्स महाविद्यालय नांदेड येथे विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान या विषयावर आज दि. ३.४.२०२३ रोजी समाजशास्त्र विभाग, पीपल्स महाविद्यालय नांदेड येथे पीपल्स महाविद्यालय, नांदेड आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई ह्यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रा. स्वाती काटे या कार्यशाळेच्या समन्वयक होत्या.

कार्यशाळेतील मुद्दे[संपादन]

  1. विकिमिडिया प्रकल्पांची ओळख, मराठी विकिपीडियाची ओळख
  2. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  3. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

आयोजक संस्था[संपादन]

राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि समाजशास्त्र विभाग, पीपल्स कॉलेज, नांदेड स्वामी रामानंद तीर्थ ह्यांनी १९५० साली स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेश सोसायटीच्या पीपल्स कॉलेजमधील समाजशास्त्र विभाग अत्यंत यशस्वीपणे वाटचाल करत आहे. १९६७ साली समाजशास्त्र विभाग याठिकाणी सुरू करण्यात येऊन प्रा. अर्धापुरे हे प्रथम विभागप्रमुख होते. सद्या प्रा. स्वाती हरिभाऊ काटे ह्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सदर कार्यशाळा ही श्री. विकास कांबळे, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि श्रीमती स्वाती हरिभाऊ काटे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, पीपल्स कॉलेज नांदेड ह्यांच्या सहकार्यातून आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रातून यशस्वी झाली.

कार्यशाळेचा विषय[संपादन]

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान या विषयावर पीपल्स कॉलेज, नांदेड येथे मराठी विकिपीडिया नोंदलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळा मार्गदर्शक[संपादन]

श्री. विकास कांबळे, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई

सहभागी विद्यार्थी[संपादन]

Akanksha vitthalrao gajbhare (चर्चा) Vishal kishan khude (चर्चा) १४:०५, ३ एप्रिल २०२३ (IST)[reply]

Lajarus soreng (चर्चा) १४:०७, ३ एप्रिल २०२३ (IST)[reply]

Gudmalwar kishan laxman (चर्चा) Kandhare Arvind (चर्चा) Raju G Charole (चर्चा) Basuriwala (चर्चा)