तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हे इ.स. १८१७-१८मध्ये मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.
या आधी झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली. त्या दरम्यान ब्रिटिशांनी भारतातील स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटिशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले. अशा पार्श्वभूमीवर गव्हर्नर जनरललॉर्ड हेस्टिंग्सची नियुक्ती झाली.. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला. नेपाळ युद्धाच्या समाप्तीनंतर पेंढारी लोकांशी संघर्ष सुरू करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले. या व इतर अनेक कारणांमुळे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडली. अखेर पेशव्याने अंतिम युद्ध करण्याचा निर्णय घेतला.त्याला अप्पासाहेब भोसले आणि मल्हारराव होळकर (यशवंतराव होळकरांचा पुत्र) यांनी साथ दिली.पण युद्धात पेशवा,भोसले आणि होळकरांना एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले. सीताबर्डीच्या लढाईतभोसल्यांचा, महिदपुरच्या लढाईत होळकरांचा आणि खडकी, कोरेगाव व आष्टा येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. अशा प्रकारे एक एक करीत मराठे इंग्रजांसमोर हरले व सर्वांनी शरणागती पत्करली. हेस्टिंग्सने भोसले, पेशवाबाजीराव दुसरा आणि शिंदे यांना अपमानजनक तह स्वीकारण्यास भाग पडले. बाजीरावाला पेशवेपद सोडावे लागले आणि त्याचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला. छत्रपतींचे सातारा राज्य व इतर मराठा सरदारांच्या प्रदेशावर ब्रिटिश नियंत्रण प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थाने मराठा सत्तेची समाप्ती झाली.
...की, मराठी २६ जानेवारी, २०२० रोजी मराठी विकिपीडियावर एकूण ८,०२३ चरित्रलेख होते. यांपैकी २,३२६ म्हणजेच २८% लेख स्त्री चरित्रलेख तर उर्वरित पुरुष चरित्रलेख होते? इंग्लिश विकिपीडियावर हे प्रमाण १८% आहे.
मराठी विकिपीडियाचीप्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
"अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात. यासाठी प्रत्येक महिन्याकरता एक विषय निवडला जातो व त्या विषयावरील लेख मासिक सदर म्हणून प्रकाशित केला जातो. येत्या महिन्याच्या मासिक सदरासाठी येथे नामनिर्देशन करा.
विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.