विकिपीडिया:धूळपाटी२८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माध्यम प्रसिद्धी मजकुर[संपादन]

विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा[संपादन]

आंतरजालावरील विश्वप्रसिद्ध मुक्तज्ञान कोश संकेतस्थळास,सुलभता उपक्रमा अंतर्गत नवा चेहरा-मोहरा प्राप्त झाला आहे.आमेरीकेतील स्टँटॉन फाऊंडेशनने दिलेल्या देणगीतून विकिपीडीयाचे वाचक आणि संपादकांना अधीक सुलभता प्राप्त व्हावी म्हणून राबविलेल्या उपक्रमा अंतर्गत व्हेक्टर नावाच्या नवीन यूजर इंटरफेसची अंमलबजावणी १ सप्टेंबर २०१० पासून मराठी विकिपीडिया आणि विकिपीडियाच्या सर्व भाषी सर्व सहप्रकल्पातून पूर्ण केली गेली.या नवीन यूजर इंटरफेसचे मराठीकरण मराठी विकिपीडिया सदस्यांनी अहोरात्र कामकरून पूर्ण केले आहे त्यामुळे केवळ मराठी विकिपीडियाच नाही तर इंग्रजी हिंदी अथवा जगातील कोणत्याही भाषिक विकिपीडियास भेट देताना विकिपीडियाचे वाचक मराठीतून नॅव्हीगेट (सुचालन) करू शकतील.

मराठी विकिपीडियातील (फोनेटीक) देवनागरी लेखनाची सुविधासुद्धा सुरळीत केली गेली आहे . हि व्यवस्था पुन्हा सुरळीत करून देण्याकरिता लागणार्‍या आज्ञावली लेखनात तमीळ,मल्याळम आणि हिंदी भाषी विकिपीडीया सदस्यांनीसुद्धा मोलाचे सहकार्य मराठी भाषी विकिपीडियास देऊ केले.एकमेकांना सहकार्यकरत एकत्रितपणे लेखन कार्य करणे हे विकिपीडिया संस्कृतीचे नेहमीच द्योतक ठरत आले आहे.

विकिपीडिया भारतातील तसेच जगातील सर्वाधिक भेट दिल्या जाणार्‍या पहील्या दहा संकेतस्थळाती स्थान अबाधीत केले आहे अशा विश्वाचे स्वप्न पहा, की ज्यात, प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत 'मुक्तपणे देवाणघेवाण' करू शकेल. अशी बांधीलकी सांगणारा विकिपीडिया हा विकिपीडिया वाचकांनीच एकत्रितपणे इंटरनेट वर संपादित केलेला मुक्‍त ज्ञानकोश म्हणून आंतरजालावर सुपरिचित आहे. .

नवीन वैशीष्ट्ये
विकिमिडिया फाउंडेशनची ’सदस्य अनुभव चमू (User Experience Team)’ ही आपणास काम करणे सोपे व्हावे म्हणुन विकिसमाजातील स्वयंसेवकासमवेत काम करीत आहे. आपल्यासमवेत, नविन चेहरामोहर्‍यासह व सोप्या संपादन तोंडवळ्यासह काही सुधारणा आदानप्रदान करण्यास आम्ही आतूर आहोत.नविन सदस्यास सुरुवात करण्यास अभिप्रेत हे बदल त्यांना सोपे पडतील व ते usability testing conducted over the last year यावर आधारीत आहेत. आमच्या प्रकल्पांचा वापर (कोणासही)सोप्या पद्धतीने करता यावा ही विकिमिडिया फाउंडेशनची प्राथमिकता आहे आणि भविष्यात आम्ही यात आणखी अद्ययावतता आणुन ती आपल्यासह आदानप्रदान करु.अधिक विस्तृत माहितीसाठी विकिमिडियासंबंधित blog post या संकेतस्थळास भेट द्या.


विकिपीडियात काय बदलले आहे
  • सुचालन: पाने वाचण्यास व संपादण्यास सोपे जावे म्हणुन आम्ही सुधारणा केल्या आहेत.सध्या, प्रत्येक पानाच्या वरील बाजूस असलेली ’टॅब’ ही जास्त स्पष्टपणे हे दर्शविते कि, आपण तेच पान पहात आहात की त्याचे चर्चापान आणि आपण ते पान वाचत आहात की संपादन करीत आहात.
  • संपादन साधनपट्टीतील सुधारणा: आम्ही वापरात अधीक सुलभता मिळावी म्हणून संपादन साधनपट्टी ची पुर्नरचना केली आहे . पानांछी रचना करणे अधीक सुगम आणि सोपे झाले आहे.
  • दुवे सहाय्यक: इतर विकिपानांना आणि बाह्य दुवे देण्याकरिता वापरास सोपे असे साधन तुम्हाला अधीक सुलभता उपलब्ध व्हावी म्हणून उपलब्ध केले आहे.
  • शोध सुधारणा: तुम्ही शोधत असलेले लेख/पान लवकर मिळण्याकरिता आम्ही शोध सुचवणीत सुधारणा केल्या आहेत.
  • इतर नवीन वैशिष्ट्ये:सारणी (टेबल) सोपीकरण्यासाठी आम्ही आता एक नवीन सारणी (टेबल) सहाय्यक उपलब्ध केला आहे आणि संपादनांअध्ये सुलभता आणण्याकरिता शोधा आणि बदला (find and replace)वैशिष्ट्यसुद्धा उपलब्ध केले आहे.
  • विकिपीडिया लोगो: आम्ही आमचा लोगो अद्ययावत केला आहे. Wikimedia blog येथे अधीक वाचा.
  • पहारा कळ (टॅब) आता तारा आहे.
  • स्थानांतरण कळ (टॅब) आता शोधपेटी पुढच्या अधोदर्शक बाणात ( ड्रॉपडाऊनमध्ये) आहे .