विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/कक्षा(परीघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वॉट विश्लेषण ओळख चित्र
  • विकिपीडियावरील घ्येय धोरणे ठरवताना मुलभूत गाभा तत्वांना धक्का लागणे अपेक्षीत नाही.पहा: विकिपीडिया:पाच आधारस्तंभ, विकिपीडिया काय नव्हे
  • विकिपीडिया:गुप्तता निती आणि टर्म्स ऑफ यूज मेटा अनुसार अधोरेखीत होतात; इतर गोष्टीत प्रत्येक भाषा प्रकल्पास स्थानिक निर्णय स्वतंत्रता असते.इतर भाषा प्रकल्पातील नियम संकेत केवळ चर्चेत संदर्भा पुरते वापरले जातात ते जसेच्या तसे लागू होत नाहीत.
  • अशा विश्वाचे स्वप्न पहा, की ज्यात, प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत 'मुक्तपणे देवाणघेवाण' करू शकेल. तशी आमची बांधिलकी आहे. ध्येय धोरणे आखताना हि बांधिलकी प्राधान्याने विचारात घेतली जावयास हवी.
  • विकिपीडियावरील सहमती प्रक्रीया सावकाश चर्चेतून घडते, चर्चापानांवरील माहिती लगोलग साहाय्य पानांमध्ये स्थानांतरीत होते(होऊ शकतेच) असे नाही,त्यामुळे काही अंशी संकेत अलिखीत स्वरूपात परंपरेने पाळले जाताना सुद्धा दिसतात.
  • विकिपीडियाची मुलभूत तत्वे ठरवताना विकिपीडिया ज्ञानकोश एक ज्ञानकोश आहे.विकिपीडिया ज्ञानक्षेत्र निष्पक्ष रहाण्याच्या दृष्टीने येथील निर्णय प्रक्रीयेत सदस्यांची मते अजमावली जातात,संवादातून सहमती घेतली जाते. या मत अजमावण्याचा/सहमती तयार करण्याचा उद्देश तर्कसंगत भूमिका स्विकारली जाणे अभिप्रेत असते.इथे निर्णय तर्कावर अवलंबून असतील हे सुनिश्चीत करताना विकिपीडिया लोकशाही नाही हे नक्की सांगितले जाते.आणि ध्येय धोरणे आखताना स्विकारताना तिच लोकशाहीत परावर्तन होणार नाही हेही पाहीले जाते.
    • येथे सहमती शब्दाचा अर्थ प्रत्येक विचारातील तर्कसुसंगत भाग स्विकारणे तर्कसुसंगत नसलेला भाग वगळणे होय.इथे सहमती शब्दाचा अर्थ बहुमत नव्हे.सर्व साधारणत: सर्व सदस्यांनी चर्चेत सहभागी व्हावे उहापोह करावा आणि जरूर तेथे जाणत्या सदस्यांनी त्यातील तर्कसुसंगत नसलेला भाग वगळत तर्कसुसंगत भाग स्विकारावा. एखाद्या निती स्वीकृती/अंमलबजावणीत प्रचालक,स्वीकृती अधिकारी (प्रशासक) यांची भूमीका असल्यास त्यांची मदत घ्यावी.
  • एखादा नवीन धोरण प्रस्ताव मांडताना त्यातील कोणत्याही घटकाने मुलभूत तत्वांना धक्का लागत नाही ना हे पहावे.
    • अपेक्षीत धोरण/निती त्या सोबत नवीन नितीमुळे शक्य सामर्थ्य,दुर्बलता,संधी आणि जोखीम याची सुस्पष्ट कल्पना मांडावी.
    • विरोधी आणि तटस्थ दृष्टीकोणांची आधी चर्चा करून त्यातील कोणता तर्क सुसंगत भाग स्विकारता येतो ते पहावे नंतर समर्थनात्मक दृष्टीकोण मांडावेत.
    • चावडी ध्येयधोरण पान केवळ धोरणात्मक चर्चेकरता आहे हे लक्षात घ्यावे.चर्चा संपल्या नंतर कौल स्वतंत्रपणे कौल पानावर घ्यावेत. चावडी ध्येय धोरणेवर कौल घेण्याचा अथवा पुरेशी चर्चा होण्यापुर्वी ध्येय धोरण विषयावरील कौल घेण्याचा आग्रह धरू नये.

संचार - व्यवस्था[संपादन]

  • गोपनीयता निकषांचे पालन,संपादन गाळणीस आवश्यक गोपनीयता,गंभीर वादनिवारणाकरता अत्यावश्यक असे सोडून इतर सर्व ध्येय धोरणे मराठी विकिपीडियाच्या चौकटीत चर्चा पानांवर सादर व्हावीत आणि निती विषयक धोरण विषयक चर्चा मुख्यत्वे चावडी/धोरण वर होऊन मग कौल पानावर जाव्यात.जिथे सदस्य मतांचा अदमास येणे कठीण जाते तेव्हाच कौल घ्यावा इतरवेळी सहसा वर व्याख्या केल्या प्रमाणे तर्कसुसंगत सहमती पुरेशी असते.

हे सुद्धा पहा[संपादन]