विकिपीडिया:चावडी/उपचर्चा/असा वर्ग, खूनाचे आरोपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

असा वर्ग[संपादन]

भ्रष्टाचाराचे आरोपी असा एक वर्ग मराठी विकिपीडियावर अलिकडेच तयार केला गेल्याचे पाहिले.ज्ञानकोशाच्या स्वरुपात असा वर्ग सयुक्तिक नाही असे वाटते.याचा अर्थ ज्ञानकोशाने याप्रकरणी संपूर्णपणे मौन पाळावे असा नक्कीच नाही. विकीपीडियावरील लेखातही - अशाअशा भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या तपासासाठी यांना अमुकअमुक रोजी याया तपासयंत्रणेने ताब्यात घेतले, स्थानबद्ध केल, अटक केली.- असे प्रत्यक्ष लेखात लिहीता येईल,लिहिले जावे, लिहिले जातेही. आरोपी ही स्थिती काही काळापुरतीची असते, तिचा स्थायी असा वर्ग असू नये, एवढाच हा मुद्दा आहे. माहितगार आणि इतर जाणकारांनी यावर प्रकाश टाकला तर बरे.-Manoj ०५:४४, २१ मे २०११ (UTC)

विकिपीडिया किंवा कोणताच ज्ञानकोश हा जजमेंटल(अनुमानित) असता कामा नये. विकिपीडिया सारासारविवेकबुद्धी वापरणारा कोश नसून माहितीचा कोश आहे. त्यादृष्टीने भ्रष्टाचाराचे आरोपी हा वर्ग भ्रष्टाचारी व्यक्ती यापेक्षा नक्कीच उजवा आहे पण वर मनोजने म्हणल्याप्रमाणे हे आरोपी दोषी ठरतीलच असे नाही. हे आरोपही खरे असतीलच असे नाही त्यांची शहानिशा झाल्यावर अशा व्यक्तींना या वर्गातून वेळीच काढले नाही तर ते त्यांच्या चरित्रावर शिंतोडे असल्याचा दावा नाकारता येणार नाही. याकारणांस्तव माझा या वर्गाला विरोध आहे.
हा वर्ग असू नये. अभय नातू ०६:२६, २१ मे २०११ (UTC)

मनोज व अभय यांच्या मताशी अगदी सहमत. मराठी विकिपीडिया सदस्यांनी फुकाची न्यायाधीशगिरी करणे अपेक्षित नाही. आरोप असतील किंवा खटले चालू असतील, तर त्यासंबंधाने माहिती व संबंधित संदर्भ/ स्रोत बातम्या नोंदवाव्यात, मात्र स्थायी वर्ग नक्कीच असू नयेत.

हा वर्ग असू नये. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३६, २१ मे २०११ (UTC)
हा वर्ग असू दे. [१] -- . Shlok talk . ०७:०८, २१ मे २०११ (UTC)


भ्रष्टाचाराचे आरोपी असा एक वर्ग मराठी विकिपीडियावर तयार करणे म्हणजे " फुकाची न्यायाधीशगिरी करणे " हे कसे? जाणकार सदस्यांनी यावर प्रकाश टाकला तर बरे होइल तसेच भ्रष्टाचाराचे आरोपी हा वादग्रस्त मुद्दा कसा ? ह्या व्यक्ती आरोपी आहेत गुन्हेगार नाहीत. . Shlok talk . १२:२८, २३ मे २०११ (UTC)
हा वर्ग असू नये. User:Sachinvenga यांनी दाखवलेला दुवा ज्यांना तुरूंगात डांबलेले आहे किंवा होते त्या संबधी आहे. आरोपींविषयी न्यायदान होत नाही तो पर्यंत हा वादग्रस्त मुद्दा टाळावा.
Dr.sachin23 १८:०८, २१ मे २०११ (UTC)
अभयचे मुद्दे पटतात खरे; पण या विषयावर प्रदिर्घ सखोल चर्चेस वाव आहे अस वाटते. अर्थात असा वर्ग बनवणे/नबनवणेचा निर्णय लेखात ससंदर्भ वस्तुनिष्ठ माहितीची नोंद घेण्याच्या आडही येऊ नये.सध्या तरी तटस्थ. माहितगार १६:५९, २२ मे २०११ (UTC)
माहितीच्या कोशात "भ्रष्टाचाराचे आरोपी "अशा माहितीची वा विषयांची खरच गरज आहे का याचा शांतपणे आपण सारेजण विचार करू या. त्या पेक्षा असे असंख्य विषय आहेत ज्यावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी काम करायला हवे. आपण काही वार्ताहर नाही आणि त्यामुळे अशा बातम्या वजा घटना वा माहिती मराठी विकिपीडिया मध्ये का भरत राहावी?
हा वर्ग असू नये. मंदार कुलकर्णी
ह्या मुद्द्याची विश्वकोशीय उल्लेखनीयतेच्या अंगाने चर्चा व्हावयास हवी, चोरीच्या सर्व आरोपींची किंवा आरोप सिद्ध झालेल्या सर्व चोरांची यादी तयार करणे हा विश्वकोशाचा उद्देश असू शकत नाही पण जी व्यक्ती/संस्था इतर मुद्दांद्वारे उल्लेखनीय ठरते त्या व्यक्तीच यश हे जस उल्लेखनीय आहे तसेच त्याच्यावर झालेल्या आरोपांची ससंदर्भ वस्तुनीष्ठ दखल घेण्यात वस्तुतः काही वावगे आढळत नाही. पण यात इतर संबधीत मुद्द्यांचा साकल्याने विचार व्हावयास हवा
जे घडेल त्याची त्या-त्या लेखात संदर्भानुसार दखल तर घेतली गेली पाहिजे. मुद्दा दखल घेण्याचा किंवा न घेण्याचा नाही, हंगामी बाबीच्या नावाने स्थायी वर्ग तयार करण्याबद्दलचा आहे. -मनोज २२:२२, २४ मे २०११ (UTC)
  1. सर्वच माध्यमांची एक उणीव असते आरोप होताना मोठी प्रसिद्धी दिली जाते पण आरोप सिद्ध न होता व्यक्ती निर्दोष ठरल्यास त्याची उचीत दखल माध्यमे घेतातच असे नाही. विकिपीडिया हे सुद्धा एक माध्यम आहे. आरोप सिद्ध न झालेल्यांना अशा वर्गवारीतून वगळण्याबद्दल आपण पुरेसे सजग आहोत का , असलो तरी त्यासाठी पुरेसा वेळ देतो का ? हा फार महत्वाचा मुद्दा आहे. प्रताधिकार उल्लंघनाबद्दल मी मराठी विकिपीडिय्न्समध्ये सार्वत्रीक उदासिनता पहातो. हिच उदासिनता अशा यादीतून नाव वगळले न जाण्याबाबत राहणे हा एक निश्चित चिंतेचा मुद्दा असणार आहे आणि या अनुषंगाने "त्यांची शहानिशा झाल्यावर अशा व्यक्तींना या वर्गातून वेळीच काढले नाही तर ते त्यांच्या चरित्रावर शिंतोडे असल्याचा दावा नाकारता येणार नाही. " अभय नातूंचे मत महत्वाचे ठरते. माहितगार ०६:१५, २४ मे २०११ (UTC)
  • " भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न झालेल्या व्यक्तीं " असा वर्ग त्यासाठी बनवता येइल. -- . Shlok talk . ०४:१०, २५ मे २०११ (UTC)
श्लोक प्रश्न प्रॅक्टिकॅलीटीचा आहे,एक कॅटेगरी मॅनेज करण्याची मारामार असताना तीन तीन कॅटेगरी मॅनेज करायच्या त्यात पून्हा बर्‍याच कोर्टकेसेस वृत्तमाध्यमे कालौघात विसरून जातात तुम्ही डोळ्यात तेल घालून कॅटेगरी मधून नावे वगळण्या आणि बदलतो म्हणाल पण तुमच्या पर्यंत बातमीच पोहोचली नाही तर कोर्टात निकाल लागलेला आसेल आणि कायदेशीर दृष्ट्या तुम्ही दिलेली माहिती चुकीची म्हणून निर्दोष ठरलेली व्यक्ती मात्र तुमच्यावर उलटेल.सत्यमच्या राजूचे काय झाले आता तो बातम्यातून सध्यातरी गायब दिसतोय त्याची केस मोठीतरी आहे छोटे बाजारबुणगे तर हजारोंनी असतात त्यांच्या बातम्या नंतर वृत्तमाध्यमे देतच नाहीत.
एक कॅटेगरी मॅनेज करण्याची मारामार म्हणण्याचे दुसरेही कारण आहे आज भरपूर काम करणारा सदस्य पुन्हा विकिपीडियावर वापस येऊन काम करून जाण्याची गॅरंटी नाही.अजून एक साधे उदाहरण द्यायचे झालेतर "कामचालू" नावाच्या साचात स्पष्ट लिहिले आहे कि तुमचा तुम्हाला साचा काढणे होत नसेल तर लावूही नका पण काम झाल्यानंतर साचा काढण्याची कुणीही तसदी घेतनाही दुसरे इंग्रजी विकिपीडियाच्या तुलनेत आपल्याकडे स्वयंसेवकाच्या सख्येचा आकडा किती व्यस्त आहे उपलब्ध लोकांचा वेळ फालतू गुन्हेगारांच्या कॅटेगर्‍या बदलण्यात वाया घालवायचा का ?
त्या पेक्षा अगदी केस चालू असतानाही " भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न झालेल्या व्यक्तीं " हि एकच कॅटेगरी हबेतर वापरावी कायदेशीर त्रास नाही, कारण अप्रत्यक्षरीत्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता असेही कळते, आणि सिद्ध न झालेला म्हटल्यामुळे तुमच्यावर कायद्दाचे किटाळही नाही.
अगदी सर्वोच्चन्यायालयाने अंतीम निकालात आरोपीस गुन्हेगार म्हणून जाहीर केल्याचे संदर्भासहीत कळाले त्यावेळी तुम्हाला वेळ असला तर सर्वोच्च न्यायालयातून आरोप सिद्ध झालेले अशा कॅटेगरीत टाकावे. म्हणजे सदस्यांच्या कामाचा फापटपसारा वाढणार नाही.

माहितगार ०५:४७, २ जून २०११ (UTC)

सुरेश कलमाडी , ए. राजा etc. हे फालतू गुन्हेगार आहेत का? बर गुन्हेगार असेही आपण म्हटले नाही आहे.-- . Shlok talk . ०६:५७, २ जून २०११ (UTC)
श्लोक मी सुरेश कलमाडी , ए. राजा यांच्याबद्दल कुठेही तुम्ही म्हणता तसा उल्लेख केलेला नाही.विश्वकोशीय दृष्ट्या त्या उल्लेखनीय व्यक्ती आहेत,या महनीय व्यक्तींबद्दल लोक काय बोलतात त्याची मला साधी कल्पनाही नाही त्यांच्या विरूद्ध सर्वोच्च न्यायालयात काही सिद्ध झाल्याचे अद्याप तरी माझ्या ऐकीवात नाही. मी राजांबद्दल अलिकडे काही वाचण्यात नाही एवढेच म्हणालो. कुणालाही गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार माननीय न्यायालयाचा आहे माझा नव्हे.
गुन्हेगार फालतू नसूही शकतात ,उगाच त्यांचा राग का बा ओढवून घ्या, पण एकुणच संशयीत, आरोपी, सिद्ध झालेले न झालेले अथवा गुन्हेगारीविश्वाची बाकीच्या मराठी विकिपीडियाच्या इतर ज्ञान साधनांच्या दृष्टीने महत्ता किती ? आपण पुजा-अर्चा मंत्र-श्लोक म्हणतो त्यात समाजातील नकारात्मक गोष्टींना महत्व देतो काय ? नाही ना तसेच, यावरही मत-मतांतरे असू शकतात मी माझे मत व्यक्त केले एवढेच माहितगार १९:०१, २ जून २०११ (UTC)
  • सर्वोच्च न्यायालयाच्या देख्ररीखी खाली सुरु आसलेल्या चौकशीत सदर व्यक्तीना आरोपी केले आसताना व अटक करुन तुरुंगात घातले आसताना माराठी वीकीपिडीकात त्यांना भ्रष्टाचाराचे आरोपी या वर्गात घालण्येवरुन वाद व्हावा हे फार खेदजनक वाटते.-- . Shlok talk . १९:५०, २ जून २०११ (UTC)
श्लोक खेद नका करू, वाद कुणालाही आत घालण्याबद्दल नाही न्यायालयाने तथाकथीत सदरांनाबाहेर काढल्यानंतर विकिपीड्यावर्गाच्या पिंजर्‍यातून बाहेर काढण्याची प्रक्रीया राबवली जाईल याची शाश्वती कुणासही वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे.माहितगार २०:००, २ जून २०११ (UTC)

खेद[संपादन]

वर असलेल्या दोन्ही मतांत थोडेथोडे तथ्य आहेच आहे. माझेही मत वर मी नोंदवले आहेच परंतु --

सर्वोच्च न्यायालयाच्या देख्ररीखी खाली सुरु आसलेल्या चौकशीत सदर व्यक्तीना आरोपी केले आसताना व अटक करुन तुरुंगात घातले आसताना माराठी वीकीपिडीकात त्यांना भ्रष्टाचाराचे आरोपी या वर्गात घालण्येवरुन वाद व्हावा हे फार खेदजनक वाटते.

यावरुन मला येथे एक बाब आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते - विकिपीडिया हे समाजप्रबोधनाचे उपकरण नसून समाजउद्बोधनाचे आहे. विकिपीडिया म्हणजे ब्लॉग नव्हे. भ्रष्टाचारविरोध, नीतीमत्ता, सद्गुण, चालीरीती, इ. बाबत विकिपीडिया निष्पक्षपाती आहे/असायला हवा. असलेली तथ्ये जगासमोर आणणे हा विकिपीडियाचा मुख्य उद्देश आहे. त्याद्वारे समाजसेवा होत असेल (नव्हे, होतेच) तर उत्तम पण त्यामागे धावणे हे आपले (येथे) काम नव्हे. याचा अर्थ विकिपीडिया भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे असे नव्हे तर तो भ्रष्टाचार, इ.च्या बाबतीत पूर्णपणे agnostic[मराठी शब्द सुचवा] आहे इतकेच.

येथे हा वर्ग असू नये असे म्हणणार्‍यांपैकी अनेक लेखक स्वतःची अनुदिनी, सोशल मीडिया संपर्कस्थळे राखून आहेत आणि त्यावरुन भ्रष्टाचाराविरुद्ध कंठशोष (किंवा कळपटशोष :-}) होईपर्यंत त्याबद्दल लिहीत असतात, तरी त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणे हे बरोबर नव्हे.

येथे चर्चा थांबवण्याचा उद्देश नाही.....फक्त व्यक्तिगत इशारे होण्याआधीच थोडासा हस्तक्षेप करावासा वाटला. असो. इंग्लिश विकिपीडियावरही याबद्दल चर्चा सुरू आहे. त्यातून काही इतर मुद्दे निघतात का ते ही बघूयात.

अभय नातू २२:१८, २ जून २०११ (UTC)

agnostic =अज्ञेयवादी (नाम): एखाद्या गोष्टीच (उदाहरणार्थ देवाच) अस्तीत्व आहे का ? माहित नाही, स्विकारतही नाहीत किंवा नाकारतही नाहीत अशी तटस्थ भूमिका [१]
उद्बोधन - शिकवण देण्याची क्रिया "समाजाचे उद्बोधन करण्यासाठी संस्थेने चर्चासत्राचे आयोजन केले.[२]
प्रबोधन - उपदेश, शिकवण इत्यादींच्या माध्यमातून विशिष्ट गोष्टीचे भान आणून देण्याची क्रिया[३]

" खुनाच्या खट्ल्यातील आरोपी "[संपादन]

" खुनाच्या खट्ल्यातील आरोपी " असा वर्ग बनवावा का.? -- . Shlok talk . १२:५१, ४ जून २०११ (UTC)

यात मदनलाल धिंग्रा, भगतसिंग, इ.चा समावेश होईल?
अभय नातू १७:५२, ४ जून २०११ (UTC)
नाही. स्वतंत्र्य भारतातील, भारतीय दंड संहिता कलम ३०२ आणि १२० ब नुसार खून-खूनाचा कट रचल्याचे आरोपी आपेक्षीत आहेत तसेच या वर्गा साठी योग्य नाव काय असावे.?-- . Shlok talk . १८:२४, ४ जून २०११ (UTC)
का नको व्हायला ? एखाद्या देशात क्रांतिकारक म्हणून मानले गेलेले लोक अन्य देशात हत्येच्या खटल्यातले आरोपी असण्याची उदाहरणे जगभर आढळतात. या वस्तुनिष्ठतेला डावलून मराठी विकिपीडियावरील वर्गांची व्याख्या एखाद्या राष्ट्राच्या दंडसंहितेनुसार करणे हा ढळढळीत पक्षपातीपणा ठरेल. मराठी विकिपीडियासारख्या मुक्त ज्ञानकोशाकडून विशिष्ट देशाच्याच दंडसंहितेला झुकते माप देणे अपेक्षित नाही. मुळात मराठी विकिपीडिया भारतकेंद्रित दृष्टिकोनातून घडवला जाऊ नये, ही गोष्ट ध्यानात राखायला हवी.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५३, ५ जून २०११ (UTC)
म्हणजे " खुनाच्या खट्ल्यातील आरोपी " आसा वर्ग तयार करुन त्यात मदनलाल धिंग्रा, भगतसिंग, राज ठाकरे इ.चा समावेश करावा असे आपल्याला सुचवायाचे आहे कां?- . Shlok talk . १८:२१, ५ जून २०११ (UTC)
http://www.indialawjournal.com/volume1/issue_3/bhagat_singh.html नुसार भगतसिंग यांना ही Indian Penal Code ३०७ नुसार शिक्षा झाली होती.
Dr.sachin23 १६:२१, ५ जून २०११ (UTC)
Sachinvenga,
मूळात तुम्हाला या वर्गां कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना घालायचे आहे हे मला कळेलेले नाही.
म्हणजे " खुनाच्या खट्ल्यातील आरोपी " आसा वर्ग तयार करुन त्यात मदनलाल धिंग्रा, भगतसिंग, राज ठाकरे इ.चा समावेश करावा असे आपल्याला सुचवायाचे आहे कां?
जर मदनलाल धिंग्रा, भगतसिंग, राज ठाकरे यांच्यावर खूनाच्या खटल्यात आरोप केला गेला असेत तर त्यांचा समावेश वर लिहिलेल्या वर्गात नक्की होईल.
मग आता थोडी वर्गनावाची चिकित्सा करुयात आणि जर वरील व्यक्ती त्याच्या निकषांस उतरल्या तर त्यांचा समावेश करता येईल असे १००% म्हणता येईल.
खून - एका मनुष्याने दुसर्‍या मनुष्याचा जीव घेण्याची प्रक्रिया. मग यात सदोष मनुष्यवध किंवा अदोष मनुष्यवध (निर्दोष नव्हे) धरायचे का? एखाद्याच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्याने त्याने कोणाला उडवले तर तो खून (murder) सहसा म्हणले जात नाही. पण ती झाली कायद्याची भाषा. तुम्हाला खून म्हणजे नेमके कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे कळल्यास तसा शब्द योजता येईल.
खूनाचा खटला - खटला कोणी चालवला, कोठे चालवला, कोणाच्या अधिकाराने चालवला? भारतातील न्यायालयांनी? स्वातंत्र्यपूर्वकाळात? नंतर? एखाद्या विशिष्ट दंडसंहिताकलमाखाली? अनेकदा राजकीय उलथापालथीच्या काळात न्यायालय, न्यायाधीश यांना काही अर्थ उरत नाही व जिसकी लाठी उसकी भैंस प्रकारात अनेक "खटले" चालून "आरोपींची" वासलात लावली जाते - उदा. झुल्फिकारअली भुट्टो, फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यानचे शेकडो, हजारो खटले, इदी अमीनने चालवलेले भारतीयांचे शिरकाण, इ. पण जर लावलेल्या निकषांत एखादी व्यक्ती बसली तर त्या लेखाचा समावेश त्या वर्गात होणार. त्याचप्रकारे कितीही उघडउघड गुन्हेगार असला तरीही निकषांत नसलेल्या व्यक्तीबद्दलच्या लेखाचा समावेश होणार नाही.
आरोपी - म्हणजे एखाद्याने पोलिसचौकीत जाउन फिर्यादीत अमक्यावर आळ घेतला तर तो आरोपी कि न्यायालयाकडून आरोपपत्र दाखल केले गेले असलेला आरोपी (फिर्याद/FIR वि. indictment).
तर वरच्या काथ्याकूटीचा मथितार्थ असा की वर्गाचे निकष उघड करावे आणि मग ते काटेकोरपणे पाळावे.
अभय नातू २०:२०, ६ जून २०११ (UTC)
  1. ^ http://www.google.com.ng/search?hl=en&client=firefox-a&hs=ppN&rls=org.mozilla:en-US:official&q=agnostic&tbs=dfn:1&tbo=u&sa=X&ei=2nDoTYyMDsaLhQfI15i3AQ&ved=0CBcQkQ4&biw=1366&bih=629
  2. ^ http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php
  3. ^ http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php