Jump to content

विकिपीडिया:चर्चा पान मार्गदर्शक तत्त्वे

लघुपथ: विपी:चर्चा, विपी:चप
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चर्चा पान मार्गदर्शक तत्त्वे (Talk Page Guidelines) हे विकिपीडियावरील चर्चा पानांचा योग्य वापर आणि व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी तयार केलेले नियम आहेत. सदस्यांच्या चर्चा पानांचे नियम इतरत्र आहेत.

विकिपीडियावरील प्रत्येल लेखाला एक चर्चा पान असते. या पानांचा मुख्य उद्देश लेखाचा दर्जा वाढवणे आणि सहमती निर्माण करणे होय. अशी चर्चा पाने संपादकांना लेखातील मजकूराबद्दल किंवा त्यातील बदलांबद्दल (झालेले किंवा प्रस्तावित) विचारविनिमय करण्यासाठी, लेख सुधारण्यासाठी, प्रस्तुत लेखातील मतभेद सोडवण्यासाठी असतात.

चर्चा पाने वैयक्तिक भांडणे किंवा असंबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी नाहीत.

या मार्गदर्शक तत्त्वांनुसार येथे चर्चा करताना संपादकांनी --

  • आपल्या संदेशासाठी शक्य तेथे योग्य शीर्षके वापरावी
  • इतर संदेशांना उत्तर देताना योग्य रचना (indentation) करावे
  • आपली मते स्पष्टपणे मांडावीत
  • तर्क आणि पुराव्यांचा आधार द्यावा
  • इतरांचा दृष्टिकोन ऐकून घ्यावा

चर्चा ही नेहमी लेखाच्या सुधारणांवर केंद्रित असावी. वैयक्तिक टीका, आक्षेपार्ह भाषा किंवा विषयाबाहेरील गप्पा येथे करू नयेत.

पूर्वी दिलेला (स्वतःचा) संदेश संपादित करताना त्याचा मूळ अर्थ बदलू नये. इतरांचे संदेश बदलू नयेत. आणि प्रत्येक संदेशानंतर स्वाक्षरी करावी.

या पानांचा उपयोग जाहिरातींसाठी किंवा नियमभंगासाठी करू नये.