विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/६ मार्च २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Opened Qur'an.jpg

कुराण (अरबी: القرآن उच्चार: अल् कुरआन) हा इस्लाम धर्माचा प्रमुख व पायाभूत धर्मग्रंथ आहे. इस्लामधर्मीय लोक या ग्रंथाला प्रत्यक्ष परमेश्वराचा (अल्लाचा) शब्द मानतात. अल्लाने त्याचा प्रेषित मोहम्मद पैगंबरामार्फत हा ग्रंथ संपूर्ण मानवजातीसाठी बोधला, अशी इस्लामाची धारणा आहे. इस्लामी मतानुसार परमेश्वराने आपला दूत जिब्राईल याच्याकरवी मोहम्मद पैगंबराकडे कुराण पोहचवले. त्यांच्या मान्यतेनुसार कुराणाचे अवतरण सलग झाले नसून इ.स. ६१० ते इ.स. ६३२ सनांदरम्यान अधूनमधून ते अवतीर्ण होत गेले. आरंभीच्या काळात त्याचे जतन मौखिक रूपात केले गेले; परंतु पैगंबराच्या मृत्यूनंतर लवकरच खलिफा अबू बक्र याच्या आदेशावरून कुराणाच्या अधिकृत लिखाणाचे काम हाती घेण्यात आले. (पुढे वाचा...)