विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/५ ऑगस्ट २०१२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धाची व्याप्ती दर्शवणारा नकाशा

तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध (मराठी नामभेद: तिसरे ब्रिटिश-म्हैसूर युद्ध ; इंग्रजी: Third Anglo-Mysore War, थर्ड अँग्लो-मायसोर वॉर) हे म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व त्यांचे मित्रसैन्य (मराठा साम्राज्य आणि हैदराबादचा निजाम) यांच्यामध्ये इ.स. १७८९ ते इ.स. १७९२ या कालखंडात झडलेले युद्ध होते. हे युद्ध म्हणजे इंग्रज-म्हैसूर युद्धे मालिकेतील तिसरे युद्ध होते.

(पुढे वाचा...)