विंडोज लाइव वनकेर
विंडोज लाइb वनकेर तथा विंडोज वनकेर लाइव ही मायक्रोसॉफ्टद्वारे विंडोजसाठी विकसित केलेली संगणक सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवणारी सेवा होती. मल्टी-प्लॅटफॉर्म आरएव्ही (रिलायबल अँटी-व्हायरस) हे वनकेरचे एक प्रमुख तंत्रज्ञान होते,[१] जे मायक्रोसॉफ्टने २००३ मध्ये जीईसीएडी सॉफ्टवेर कडून विकत घेतले होते.[२] परंतु नंतर ते बंद करण्यात आले.[३] हे सॉफ्टवेर वार्षिक सशुल्क वर्गणीवर उपलब्ध होते. प्रत्येक वर्गणीचाचा वापर कमाल तीन संगणकांवर केला जाऊ शकत होता.
१८ नोव्हेंबर २००८ रोजी मायक्रोसॉफ्टने जाहीर केले की विंडोज लाइव वनकेर ३० जून २००९ रोजी बंद केले जाईल आणि त्याऐवजी वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट सिक्युरिटी एसेन्शियल्स नावाची एक नवीन मोफत अँटी-मालवेर प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल.[४] सेवेच्या समाप्तीच्या घोषणेमध्ये मायक्रोसॉफ्टने नमूद केले की विंडोज लाइव वनकेर विंडोज ७ वर चालण्यासाठी अद्ययावत केले जाणार नाही आणि ते विंडोज एक्सपी मोड मध्येही काम करणार नाही.[५]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ इस्पिनर, टॉम (१६ मार्च २००७). "मायक्रोसॉफ्ट: वनकेर रोल आउट करायला नको होते". झेडडीनेट. सीबीएस इंटरॲक्टिव्ह. १९ मार्च २००७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ जानेवारी २०१० रोजी पाहिले.
- ↑ "मायक्रोसॉफ्ट जीईसीएडी सॉफ्टवेरकडून अँटीव्हायरस तंत्रज्ञान हस्तगत करणार". न्यूज सेंटर. मायक्रोसॉफ्ट. ३ जून २००३. १० जुलै २०१७ रोजी पाहिले.
- ↑ रॉबर्ट्स, पॉल; इव्हर्स, जोरीस (११ जून २००३). "मायक्रोसॉफ्ट लोकप्रिय लिनक्स अँटीव्हायरस उत्पादन बंद करणार". इन्फोवर्ल्ड. आयडीजी. २९ जानेवारी २०१० रोजी पाहिले.
- ↑ "मायक्रोसॉफ्टकडून मोफत ग्राहक सुरक्षा सेवा देण्याची योजना जाहीर". न्यूज सेंटर. मायक्रोसॉफ्ट. १८ नोव्हेंबर २००९. १० जुलै २०१७ रोजी पाहिले.
- ↑ "विंडोज लाइव वनकेर विक्री समाप्ती मार्गदर्शन पृष्ठ". विंडोज लाइव. मायक्रोसॉफ्ट. १० जुलै २००९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० जुलै २०१७ रोजी पाहिले.