Jump to content

वासु प्रिमलानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Vasu Primlani (es); বাসু প্রিমলানি (bn); Vasu Primlani (fr); रितू वासू प्रिमलानी (mr); Vasu Primlani (it); Vasu Primlani (ast); Vasu Primlani (sq); वासु प्रिमलानी (hi); వాసు ప్రిమ్లాని (te); ਵਾਸੂ ਪ੍ਰਿਮਲਾਨੀ (pa); ঋতু বসু প্ৰিমলানী (as); Vasu Primlani (en); Vasu Primlani (de); வாசு பிரிம்லானி (ta) Indian stand-up comedian (en); Indian stand-up comedian (en); humoriste et environnementaliste indienne (fr); entertainer (nl)
रितू वासू प्रिमलानी 
Indian stand-up comedian
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • St. Thomas' School
व्यवसाय
  • entertainer
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रितू वासू प्रिमलानी ही एक भारतीय एकपात्री विनोदी कलाकार(स्टँड-अप कॉमेडियन) आणि पर्यावरणवादी आहे. तिच्या कामासाठी तिला भारत सरकारकडून २०१५ चा नारी शक्ती पुरस्कार मिळाला.[]

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

प्रिमलानीचे बालपण नवी दिल्ली येथे गेले. तिने युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलस येथून भूगोल, शहरी नियोजन आणि कायदा या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.[]

राष्ट्रपतींकडून नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना वासू प्रिमलानी

तिला फिटनेसची देखील आवड आहे. तिने पाच 'हाफ मॅरेथॉन', दोन 'ऑलिंपिक-डिस्टन्स ट्रायथलॉन', एक 'हाफ आयर्नमॅन' आणि एक 'स्प्रिंट ट्रायथलॉन' मध्ये सहभाग घेतलेला आहे.[] दिल्लीत ती एक सोमॅटिक थेरपिस्ट म्हणून देखील काम करते.[]

कारकिर्द

[संपादन]

प्रिमलानी ने अमेरिकेत 'थिम्माक्काज रिसोर्सेस फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन' ही ना-नफा संस्था स्थापन केली. या संस्थेने रेस्टॉरंट्ससाठी पर्यावरणीय सल्लागार सेवा पुरवल्या. याकरीता या संस्थेला २००३ मध्ये 'कॅलिफोर्निया गव्हर्नर्स एन्व्हायर्नमेंटल अँड इकॉनॉमिक लीडरशिप अवॉर्ड' मिळाला.[][][] तर रेस्टॉरंट्समधील तिच्या कामासाठी तिला 'अशोका फेलो' म्हणून नियुक्त करण्यात आले.[] २००३ मध्ये प्रिमलानीच्या संस्थेला 'यूएस ईपीए रीजन ९' पुरस्कार देखील मिळाला.[]

जुलै २०१४ मध्ये, बंगळूरस्थित पर्यावरणवादी सालुमरद थिम्माक्का यांनी प्रिमलानी यांच्यावर अमेरिकेतून पैसे जमा करण्यासाठी त्यांच्या नावाचा गैरवापर केल्याबद्दल फसवणूक केल्याचा आरोप केला होता.[१०][११] थिम्मक्का यांच्या मते, अमेरिकेत थिम्मक्काज रिसोर्सेस फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशनची स्थापना करताना प्रिमलानी तिच्या नावाचा गैरवापर केला. प्रिमलानीच्या मते, शंभर वर्षांची थिम्मक्का, "कदाचित" विसरली की तिने प्रिमलानीला तिचे नाव वापरण्यास संमती दिली होती.[१२]

कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरकडून पुरस्कार स्वीकारताना रितू वासू प्रिमलानी

प्रिमलानी यांनी न्यू यॉर्क सिटी, सॅन फ्रान्सिस्को, मुंबई, दुबई, बंगळूर, हैदराबाद, चंदीगड, पुणे आणि दिल्लीसह जगभरातील शेकडो कॉर्पोरेट आणि कॉमेडी क्लब शोची निर्मिती केली, त्यांचे शीर्षक दिले आणि त्यात सादरीकरण देखील केले आहे.[१३] ती तिच्या विनोदातून सामाजिक संदेश देत असते. यात पर्यावरण, मानवी हक्क[१४] आणि बलात्कार[१५] यासारख्या गंभीर मुद्द्यांचा समावेश असतो.

२०२४ मध्ये, तिने नवी दिल्ली, भारत येथे तिची पहिली ग्राफिक कादंबरी, जुता प्रकाशित केली[१६] आणि नॉक्सव्हिलच्या नवीन शाश्वतता संचालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.[१७]

पुरस्कार

[संपादन]
  • भारत सरकारकडून २०१५ मध्ये नारी शक्ती पुरस्कार [१८]
  • सार्वजनिक सामाजिक उद्योजक फेलोशिप २००४ साठी ग्लोबल अशोका इनोव्हेटर्स []
  • यूएस ईपीए रीजन ९ पर्यावरणीय कामगिरी पुरस्कार २००३.[१९]
  • कॅलिफोर्निया गव्हर्नरचा पर्यावरण आणि आर्थिक नेतृत्व पुरस्कार २००३.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "A famous Punjabi stand-up comic once took his pants off in my hotel room and lay on my bed... I sent him packing!". The Times of India. 21 March 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Indias first openly gay comic, Vasu Primlani relives her memories of being raped as a child and serving time in jail". India Today. 27 January 2016. 2016-03-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 March 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Stand-up comedian, environmentalist, triathlete and somatic therapist: Meet Vasu Primlani, the woman who does it all". dna. 22 May 2016. 21 March 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "A mode of healing that goes bone-deep to repair". dna. 22 January 2017. 21 March 2018 रोजी पाहिले.
  5. ^ a b "2003 Governor's Environmental and Economic Leadership Awards". 27 October 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 October 2014 रोजी पाहिले.
  6. ^ "Ms. Vasu Primlani - India - WEF". WEF (इंग्रजी भाषेत). 21 March 2018 रोजी पाहिले.
  7. ^ "Vasu Primlani | I Inspire 2018". i-inspire.in (इंग्रजी भाषेत). 21 March 2018 रोजी पाहिले.
  8. ^ a b "Home | Ashoka | Everyone a Changemaker".
  9. ^ "U.S. EPA Awards Thimmakka's Resources for Environmental Education" (PDF). 10 June 2003. 30 June 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  10. ^ "Cops to Question Comic Ritu in Thimmakka Case". The New Indian Express. 10 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  11. ^ "NRI accused of misusing Thimmakka's name". The Hindu. 14 May 2014. 10 March 2016 रोजी पाहिले.
  12. ^ Bureau, Bangalore Mirror (19 July 2014). "Stand-up comedian accused of cheating activist detained on her way to the US". Bangalore Mirror.
  13. ^ FUNNY GIRLS. 12 August 2012. 6 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  14. ^ "Indian Men hahaha". The Mint.
  15. ^ "Rape: What We Don't Know About It". Live Mint.
  16. ^ "Celebrated stand up comedian, Vasu Primlani's released her Book, "Juta" - Saachi Baat" (इंग्रजी भाषेत). 2024-03-25. 2024-07-08 रोजी पाहिले.
  17. ^ Arora, Areena. "How the city's new sustainability director plans to make Knoxville greener". Knoxville News Sentinel (इंग्रजी भाषेत). 2024-07-08 रोजी पाहिले.
  18. ^ "Playwright, social worker, journalist among winners of Nari Shakti award". The Times of India. 9 March 2016. 3 July 2017 रोजी पाहिले.
  19. ^ "EPA to Honor 19 Northern California Environmental Heros [sic]". 21 April 2003. 3 July 2017 रोजी पाहिले.