वासुदेव वामन बापट गुरुजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: जाहिरातबाजी, वैध संदर्भांचा अभाव, नि:पक्षपाती दृष्टिकोनाचा अभाव, व्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनियता प्रश्नांकित

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

वासुदेव वामन बापट गुरुजी (जन्म : २९ ऑगस्ट, १९५३ - मृत्यू : १५ नोव्हेंबर, २०१५)[१]

 • यज्ञसंस्थेचे आधुनिक स्वरूपात पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करणारे तसेच आधुनिक विज्ञानाच्या निष्कर्षांच्या आधारे ह्या वैदिक उपासनेतील मूल्यांची शिकवण देत समाजप्रबोधनाचे कार्य करणारे सत्पुरुष[२],
 • दत्तावतारी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांच्या उपदेशाचे, स्तोत्र-मंत्रांचे तसेच तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, विवेचक आणि स्वामी महाराजांच्या विचारधारेचे प्रचारक. संपूर्ण मानवी समाज सुखी, समाधानी, संतुष्ट व्हावा ह्याकरिता तसेच साधकांची मानसिक आणि बौद्धिक बैठक घडविण्यासाठी समाज-धर्म साक्षरतेचे कार्य करणारे [३],
 • विवेचनांच्या माध्यमातून सर्वसामान्य साधकांसाठी विज्ञानाधिष्ठित अध्यात्माची बैठक निर्माण करणारे एक विचारवंत, मार्गदर्शक आणि प्रथितयश लेखक.[४],
 • समतेचा संस्कार शिकवणारे समाजसेवक[५]
 • अनेक आध्यात्मिक आणि वैचारिक विषयांवर लेखन करणाऱ्या बापट गुरुजींची संकलन आणि भाषांतरासहित ३० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.[६]


जन्म, शिक्षण आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी[संपादन]

बापट गुरुजी ह्यांचा जन्म सन १९५३ मध्ये पुणे येथे झाला. त्यांच्या घरात अकरा पिढ्या यज्ञपरंपरा होती. त्यांचे वडील वेदाचार्य होते व त्यांना दीक्षित ही पदवी होती. वडिलांकडून बापट गुरुजींना यज्ञ परंपरेचा लाभ झाला. तसेच वेदांचे शास्त्रोक्त अध्ययनही प्राप्त झाले. [७]

आध्यात्मिक ध्येयासक्ती आणि कार्य परिचय[संपादन]

सन १९८१ ते १९९३ अशी बारा वर्षे गुरुजींनी स्वामी विज्ञानानंद ह्यांच्या विज्ञानाधिष्ठित ज्ञानमार्गाचा अभ्यास केला. आधुनिक विज्ञान, शास्त्रज्ञांनी सप्रमाण सिद्ध केलेले शास्त्रीय शोध आणि प्राचीन ऋषीमुनी आणि तत्त्ववेत्त्यांनी मांडलेले भारतीय अध्यात्मज्ञान ह्यांची योग्य जुळवणूक केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर सुयोग्य आणि अपेक्षित शक्तिनिर्मिती होऊ शकते, हे जाणवल्यानंतर त्यांनी स्वामी विज्ञानानंद तसेच परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अर्थात टेंबे स्वामी महाराज ह्यांच्या प्रेरणेनुसार १९९४ साली जात, धर्म, पंथ, लिंग भेदरहित दरमहा एक अशी एकूण ७ वर्षे, अर्थात ८४ सामूहिक यज्ञांचा संकल्प केला आणि त्यानुसार सामुहिक यज्ञ साधना सुरू केली. त्याकरिता यज्ञातले मूळ तत्त्व अबाधित ठेवून, बदललेल्या समाजरचनेला अनुरूप आणि उचित अशी 'मंत्रशक्तीच्या सामर्थ्यासहित प्रकाशावर केलेली एकाग्रता’ ह्या साधनस्वरूपातील यज्ञसंकल्पना त्यांनी स्वीकारली आणि तिचा जनमानसात प्रचार केला. वैयक्तिक साधनेपेक्षा सामुदायिक साधनेवर त्यांचा भर होता. कुठलेही सत्कर्म समुदायाने एकत्र येऊन करावे, असे ते सांगत. राष्ट्र आणि सामाजिक बांधिलकीचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला. [८] [९]

कोणत्याही व्यक्तीने, साधकाने वा भक्ताने आयुष्यातील अडचणींना निर्भीडपणे, निर्भयतेने सामोरे गेले पाहिजे, साधना ही प्रेमाने आणि ज्ञानपूर्वक असावी, भीतीने किंवा धाकाने नसावी ही समाजमनाचा वेध घेणारी सूक्ष्मतम जाणीव त्यांच्या विचारसरणीचा मुलभूत पाया होती.[१०] [११]

यज्ञसाधना[संपादन]

भारतीय संस्कृतीने जगाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी यज्ञसाधना ही एक प्रमुख देणगी आहे. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असलेला प्रकाश ही एक शक्ती आहे. सृष्टिनिर्मितीपासून अस्तित्वात असलेल्या ह्या प्रकाशशक्तीचे सामर्थ्य ओळखून प्राचीन ऋषीमुनींनी यज्ञसंस्था आकाराला आणली. ज्ञानगुरु स्वामी विज्ञानानंद आणि बापट गुरुजी ह्यांनी अंगीकारलेली यज्ञाची व्याख्या म्हणजे 'सद्हेतूने प्रज्वलित केलेला प्रकाश म्हणजे यज्ञ होय !' [१२]

ह्या दृश्य विश्वातील सर्वात जास्त गती लाभलेल्या ह्या प्रकाशाशी मित्रत्वाचे नाते जोडून, यज्ञाच्या माध्यमातून समाजकल्याणाबरोबरच स्व’कल्याण साधण्यासंबंधीचे मार्गदर्शन गुरुजींकडून सातत्याने साधकांना लाभले. जात, धर्म, पंथ, लिंग अशा सर्व भेदांना बाजूला सारून, समूहाला एकत्र आणणाऱ्या यज्ञांचे महत्त्व तसेच त्या पाठीमागचा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन त्यांनी समाजाला समजावून सांगितला. [१३]

यज्ञरहस्य पुस्तकाच्या सुरुवातीला छापलेल्या मनोगतात गुरुजी सांगतात की, 'विश्वाचे संचलन करणाऱ्या प्रकाशशक्तीचे साकार रूप म्हणजे अग्नी.हाच अग्नि जेव्हा उन्नतीच्या सद्हेतूने आणि मंत्रशक्तीच्या साहचर्याने प्रज्वलित केला जातो, तेव्हा तोच यज्ञ होतो.'[१४] मंत्र, तंत्र आणि यंत्र ह्यांचं प्रभावी एकत्रीकरण म्हणजे यज्ञ ! असे सांगत यज्ञप्रक्रियेतील वैज्ञानिक रहस्ये देखील त्यांनी विविध सिद्धांतान्द्वारे उलगडून दाखवले आहे.[१५]

'एकत्रित यज्ञसाधनेमध्ये निर्माण होणाऱ्या शक्तीची व्यक्तीसंख्येनुसार बेरीज न होता, तिचा गुणाकार होतो, म्हणून सामुहिक यज्ञसाधना महत्त्वाची आहे.मात्र तरीही वैयक्तिक साधना आणि सामुहिक साधना एकमेकांना पूरक असाव्यात, असा व्यापक आणि सर्वसमावेशक विचार बापट गुरुजी मांडतात. [१६]

यज्ञाच्या संकल्पनेमध्ये ज्ञान, भक्ती आणि कर्म मार्गांची यथोचित जुळवणूक कशी साधता येईल, ह्याचा अभ्यास करून बापट गुरुजींनी यज्ञ कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित केली. त्या रूपरेषेनुसार बदलापूर, (पूर्व) येथील गायत्री गार्डन परिसरात, आज त्यांच्या पश्चातही यज्ञसाधना सुरू असून साधक त्यात नियमित सहभागी होत असतात.[१७]

संकल्पित यज्ञांच्या परिपूर्तीदरम्यान प्राचीन भारतीय अध्यात्म व समाजधुरीणांनी अंगिकारलेल्या ह्या यज्ञसंस्थेचा प्रचार आणि प्रसार आजच्या आधुनिक काळात अधिक जोमाने होणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन बापट गुरुजींनी त्यांच्या संकल्पाच्या पूर्ततेनंतरही साधकांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी एक दिवसीय सामूहिक यज्ञ आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित केले. २००३ सालापासून बदलापूर परिसरात हा यज्ञ नियमितपणे आयोजित केला जाऊ लागला.[१८] ‘आमंत्रण सर्वांना, आग्रह कोणालाही नाही’ अशा निःस्पृह आणि निरपेक्ष तत्त्वावर बापट गुरुजींच्या प्रेरणेने यज्ञप्रचार राबविताना आतापर्यंत कित्येक गायत्री यज्ञ, श्रीयज्ञ,रुद्र स्वाहाकार, शतचंडी स्वाहाकार, महिम्न स्वाहाकार, गणेशयज्ञ, विष्णुयज्ञ, आरोग्यरक्षा यज्ञ, वास्तूशमन यज्ञ, रामरक्षा यज्ञ, दत्त यज्ञ, हरिहर यज्ञ, पितृ शांती यज्ञ संपन्न झाले आहेत. [१९] [२०]

विविध तीर्थस्थळी जाऊन यज्ञसाधना[संपादन]

बदलापूर येथे दरमहा होणाऱ्या एक दिवसीय यज्ञासह महाराष्ट्रातील आणि उर्वरित भारतातील विविध क्षेत्री एक, तीन आणि सात दिवसीय सामूहिक यज्ञांचे यशस्वी आयोजन देखील सद्गुरु बापट गुरुजींनी केले. [२१] ह्यामध्ये कल्याण, मुंबई, खोपोली, नागोठणे, भिवंडी, ठाणे, डहाणू, बडोदे, पेण, रत्‍नागिरी, गणपतीपुळे, मिरज, दिल्ली, अहमदाबाद (गुजरात), अकलूज, जळगाव, आंबेजोगाई, चित्रकूट (मध्यप्रदेश), हरिद्वार, नैमिषारण्य,पुष्कर, कुरुक्षेत्र ह्यांसोबतच हिमालयातील चारधाम - गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ तसेच पंचप्रयाग - रुद्रप्रयाग, विष्णुप्रयाग, कर्णप्रयाग, नंदप्रयाग आणि देवप्रयाग ह्याशिवाय नर्मदा मय्याच्या किनाऱ्यावरील ओंकारेश्वर, हुशंगाबाद, महेश्वर, बडवानी, भालोद, तिलकवाडा, प्रकाशा, अमरकंटक, नेमावर, मोतीकोरल अशा अनेक तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, माहूर, वणी आणि तुळजापूर अशा साडेतीन शक्तिपीठांसह, नरसोबाची वाडीकेडगाव, गरूडेश्वर अशी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक दतस्थाने येथेसुद्धा सामुहिक यज्ञ आयोजित करण्यात आले आहेत. [२२]


विविध तीर्थक्षेत्री जाऊन यज्ञसाधना करण्यामागचा उद्देश विशद करताना ते म्हणत की, त्या पवित्र स्थळी असलेल्या तपोलहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा तिथे स्वकष्टाने निर्माण केली पाहिजे, त्यासाठी शक्तिनिर्मितीचा यथोचित प्रयत्‍न करणे हाच मुख्य हेतू जर प्रत्येक तीर्थयात्रेत असेल तर साधकांकडून उत्तम तप घडते. तपाने माणसाची पत सुधारते, प्रत उंचावते.[२३]

सामूहिक नर्मदा परिक्रमा[संपादन]

बापट गुरुजींनी २०११ साली प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुका, पालखी आणि रथासह ३२० आबालवृद्ध साधकांसहित सामूहिक नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प नोव्हें-डिसें २०११ मध्ये पूर्ण केला. ह्या परिक्रमेदरम्यान नर्मदातीरी ठिकठिकाणी सामूहिक यज्ञ घेण्यात आले. [२४]

'एकत्र या आणि एकत्र साधना करा. ह्या गुरुजींच्या तत्त्वानुसार प्रत्येक इच्छुक साधकाला सोबत घेऊन श्रीनर्मदा म्य्याची परिक्रमा करण्याचा त्यांचा मानस होता. ज्ञान, कर्म आणि भक्ती मार्गांचा यथोचित मेळ घालून प्रत्येक सहभागी साधकाला तप, सत्संग आणि सेवा करण्याची संधी निर्माण करणं, हा ह्या परिक्रमेचा मूळ उद्देश होता. नर्मदा किनारीच्या तीर्थक्षेत्रांवर यज्ञांचे आयोजन केल्यास त्याद्वारे प्रचंड शक्ती निर्मिती होईल. ही शक्ती केवळ परिक्रमा करणाऱ्या साधकांसाठीच नाही तर त्या क्षेत्राला आणि तेथील सर्व जीवांना उत्तम गती मिळवून देईल, प्रगती साधण्यासाठी त्याद्वारे त्यांना योग्य दिग्दर्शन लाभेल अशा उच्च विचारांनी प्रेरित होऊन ह्या सामुहुक नर्मदा परिक्रमेदरम्यान ठिकठिकाणी १२ यज्ञांचे आयोजन केले गेले आणि त्यात सोबत असलेल्या साधकांसह स्थानिकांनाही सहभागाची खुली संधी देण्यात आली. [२५]

ह्या परिक्रमेत सहभागी झालेले ख्यातनाम साहित्यिक आणि अनुवादक श्री. अविनाश बिनीवाले त्यांचा अनुभव पुढील शब्दांत व्यक्त करतात. 'आपल्या परंपरेत सांगितलेल्या यात्रा फार महत्त्वाच्या आहेत. अशा यात्रा म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा मार्ग होत. हे सूत्र नेमकं ओळखून दत्त संप्रदायातल्या बदलापूरच्या बापट गुरुजींनी गुरुमाउलीच्या भूमिकेतून आपल्या साधकांसाठी नर्मदा परिक्रमेचं एक आगळं-वेगळं आयोजन केलं. नि त्याचं फलित म्हणजे सुमारे चाळीस दिवसांची नर्मदा परिक्रमा. खरंतर ही परिक्रमा अनेक दृष्टीने खूप वेगळी होती. ह्यात सहा महिन्यांच्या मुलीपासून ते ऐंशी वर्षांच्या वयस्कांपर्यंत सर्व वयाच्या व्यक्ती होत्या. गुरुजींचा भर यज्ञावर असतो. म्हणून परिक्रमेत अनेक यज्ञ झाले. मला ह्या परिक्रमेत सामील होऊन डोळसपणे फिरता आलं, आणि रीतसरपणे ती पूर्ण करण्याचं भाग्य लाभलं.' आपल्या ह्या परिक्रमेचं श्रेय ते बापट गुरुजींना, त्यांच्या नियोजनाला आणि गुरुजींच्या वत्सलभावनेला देतात. गुरुजींसोबत काम करणाऱ्या, कुठल्याही कास्तासाठी आणि कोणाच्याही मदतीला सतत धावून जाण्यासाठी तयार असणाऱ्या शिस्तबद्ध तरुण स्वयंसेवकांच्या दलाचाही ते उल्लेख करतात. [२६]

नर्मदा परिक्रमा उचलण्यापूर्वी केलेल्या प्रसाविक विवेचनात बापट गुरुजी सांगतात की, 'नर्मदा मय्येची अट फक्त एवढीच आहे की, येणार्याने प्रेमाने यावं. तिच्या जलासोबत आत्मीयता साधावी, आणि तिच्या तीरावर निरपेक्ष होऊन जावं. हे एवढं साधलं तर मय्या आपलीच आहे. मय्याची परिक्रमा म्हणजे स्वताची आध्यात्मिक प्रगती जोखण्याचाच एक प्रकार आहे, हे समजून उमजूनच ही परिक्रमा करता आली पाहिजे. [२७]

सामूहिक चारधाम यात्रा[संपादन]

ऑक्टोबर- नोव्हेंबर २०१२मध्ये गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली, ३०० हून अधिक साधकांनी प प श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुका, पालखी आणि रथ घेऊन तसेच ११ सामूहिक यज्ञांच्या आयोजनासह हिमालयातील चारधाम - गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ तसेच पंचप्रयाग अर्थात रुद्रप्रयाग, विष्णूप्रयाग, कर्णप्रयाग, नंदप्रयाग आणि देवप्रयाग यात्रा अर्थात सामुहिक गंगा परिक्रमा संपन्न केली. [२८] [२९]

नर्मदा आणि गंगा ह्या दोन्ही नद्यांची परिक्रमा करतेवेळी तीर्थयात्रेचे, तेथील तीर्थाचे अर्थात पाण्याचे महत्त्व विशद करताना त्यातील संदेश ग्रहण आणि संदेश वहन क्षमता, शक्ती ग्रहण आणि स्मृती क्षमता अशा विविध विषयांवर त्यांनी सखोल वैज्ञानिक सिद्धान्तांसह विवेचनं केली. जलाचं महात्म्य त्यांनी विविध वैज्ञानिक संशोधनांच्या आधारे उलगडून सांगितलं. [३०]

सामाजिक बांधिलकी - कार्य परिचय[संपादन]

‘समाजाची धारणा करणारा तो धर्म’ अशी भारतीय तत्त्वज्ञानाने केलेली धर्माची व्याख्या गुरुजींनी अंगीकारली आणि सामाजिक विकासाला उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले.[३१] प्रत्येक साधकाने आपल्या वेळेचा , श्रमांचा, धनाचा, निरपेक्ष त्याग समाजोपयोगी कृत्यांसाठी करावा म्हणून त्यांनी मोफत वैद्यकीय शिबिरे, विद्यार्थी दत्तक योजना,आदिवासी शिक्षण संस्थेला मदत, रक्तदान शिबिरे, वैद्यकीय समुपदेशन असे उपक्रम सुरु केले. [३२] ह्याच जोडीने गणेश विसर्जन सोहळ्यानंतर होणारी अस्वच्छता नष्ट करण्यासाठी पुढील काळात विसर्जन घाट परिसर स्वच्छता मोहीम राबवण्यास स्वयंसेवकांना उद्युक्त केले. [३३]


प्रत्येक साधकाकडून ज्ञानपूर्वक तप घडावे, जेणेकरून त्यांची आध्यात्मिक पत वाढावी आणि त्यांच्या जीवनाची प्रत सुधारावी, ह्यासाठी समाजाच्या आध्यात्मिक कल्याणासाठी त्यांनी अनेक योजना सुरू केल्या. जन्मपूर्व संस्कार, बालसंस्कार वर्ग, सामूहिक विद्याव्रत संस्कार अर्थात मौंजीबंधन, सामूहिक सत्यदत्त पूजा, लक्षार्चना, नामजप आणि नामस्मरण संकल्प तसेच पालखी, पदयात्रा अशा अनेक विविधांगी उपक्रमांचा त्यात अंतर्भाव आहे.[३४]

ज्ञानोपासना - ग्रंथ परिचय[संपादन]

'अध्यात्मातला साधक जसा एक श्रेष्ठ भक्त असावा तसाच तो कर्मतत्पर आणि ज्ञानमार्गी असावा’ या भूमिकेतून बापट गुरुजी प्रत्येक यज्ञ कार्यक्रमाच्या प्रसंगी एखाद्या विशिष्ट आध्यात्मिक विषयावर आधारित विवेचन करित असत.[३५] साताऱ्याच्या दैनिक ऐक्य पुरवणीमध्ये असा उल्लेख केला गेला आहे की, '‘ह्या विवेचनांदरम्यान मूळ स्तोत्रातल्या साहित्यिक मूल्यांची चर्चा करतानाच त्यातले गुह्य आध्यात्मिक अर्थ साधकांसमोर अत्यंत सोप्या, रसाळ भाषेत मांडण्याची बापट गुरुजींची हातोटी लक्षणीय आहे. पुस्तकांत अधून मधून दिले गेलेले आधुनिक विज्ञानातले तसेच गणिती परिभाषेतले दाखले बापट गुरुजींची विज्ञाननिष्ठा दर्शवितानाच आजच्या सुशिक्षित साधकाला भक्तिमार्गाची गोडी लावण्याचं कार्यसुद्धा करतात.’' [३६] आणखी एका पुस्तक परीक्षणात श्री. नेवेवाणी म्हणतात की, “विवेचनं करताना सुयोग्य आणि सुलभ अर्थपूर्ण दृष्टांतांचा वापर हे बापट गुरुजींच्या विवेचनांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांचे विवेचन एवढे सहज सुंदर आणि उद्बोधक आहे की, पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते.” [३७]

अध्यात्म, व्यवहार, आधुनिक विज्ञान आणि दैनंदिन जीवन ह्यांना सांधणाऱ्या ह्या विवेचनांच्या जोडीने त्यांनी श्रीमत्‌ आद्य शंकराचार्य आणि प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज ह्यांनी रचलेल्या विविध स्तोत्रांवर तसेच प्राचीन सूक्त, मंत्र आणि ऋचांवर देखील विवेचने केली आहेत आणि त्यांचे यज्ञसाक्षीने सामूहिक पठणसुद्धा करवून घेतले. अनेक साधकांना कुठलाही भेदाभेद न बाळगता त्यांनी ह्या स्तोत्र-मंत्रांची संथा देखील दिली.

ह्या मागे मंत्रांचा आणि स्तोत्र पठणाचा अधिकार सर्वांना असून त्यांचं सर्वसामान्यांनी सश्रद्ध पठण केल्यास अपेक्षित शक्तीनिर्मिती निश्चित होईलच, अशी बापट गुरुजींची धारणा होती. मंत्रपठण करण्याचा अधिकार केवळ कथित उच्चवर्णियांनाच नाही, तर सबंध समाजालाच आपल्या पूर्वसुरींनी दिला असून सामुदायिक स्तोत्र-मंत्र पठणात सगळी किल्मिषे दूर होतात. उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, धर्म, जाती, लिंग, पंथ आणि इतर अनेक भेदांवर आधारलेली आपल्या मनातली विषमता जर आपण दूर करू शकू, तरच आपला समतेच्या दिशेने खरा आध्यात्मिक प्रवास सुरू होईल, आणि खऱ्या अर्थाने सामाजिक आध्यात्मिक प्रगती साध्य करता येईल, असे त्यांचे निर्भीड मत होते. [३८]

कोणतेही स्तोत्र अथवा मंत्र पठण करताना त्यातला लक्ष्यार्थ, भावार्थ आणि गर्भितार्थ समजून घेऊन म्हटल्यास त्यातील अपेक्षित शक्तीनिर्मिती जलद गतीने होते, हे त्यांनी अनेकदा विज्ञानाच्या आधाराने समजावून सांगितले आहे. अर्थपूर्णता नसेल, तर ती केवळ शब्दांची निर्हेतुक बडबड राहते आणि त्या शक्तीचा म्हणावा तेवढा लाभ साधकाला होत नाही, हे ह्या मागचे कारण. - बापट गुरुजी

यज्ञसन्मुख होणाऱ्या ह्या विवेचनांच्या साथीने प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांच्या पादुकास्थानी दरवर्षी होणाऱ्या सामूहिक सत्यदत्तपूजेच्या निमित्ताने गुरुजी सलग तीन दिवसांचे ज्ञानसत्र घेत असत. त्यामध्ये, स्वामी महाराजांच्या एखाद्या स्तोत्ररचनेवर ते सार्थ विवरण करत असत. त्यामध्ये, स्वामी महाराजांच्या एखाद्या स्तोत्ररचनेवर ते सार्थ विवरण करत. [३९] टेंबे स्वामी महाराजांची साहित्यकृती, तिच्या निर्मितीमागची कथा व उद्देश तसेच तिच्यातील आध्यात्मिक संदेश, स्तोत्रपठणातील गांभीर्य आणि आस्था, स्तोत्रकर्त्याची पठणकर्त्याकडून असलेली अपेक्षा अशा सर्व गोष्टींवर ह्या विवेचनांदरम्यान विस्तृत विवरण करण्यात आले आहे. ह्या अनुषंगाने त्यांच्या प्रकाशित पुस्तकांचे परीक्षण नोंदवताना धनुर्धारी मासिकात असा उल्लेख केला गेला आहे की, बापट गुरुजींनी आजवर टेंबे स्वामी महाराजांच्या अघोरकष्टोद्धरण स्तोत्र, श्रीगुरुस्तुति, श्रीदत्तात्रेय स्तोत्र, करुणात्रिपदी, चित्तसद्‍बोधनक्षत्रमाला स्तोत्र, नवरत्‍नमाला स्तोत्र, मंत्रात्मक श्लोक आणि श्रीदत्तात्रेयापराधक्षमापन स्तोत्र अशा निवडक स्तोत्रांवर विस्तृत विवेचनं केली. अद्वैत भक्ती हा ह्या सर्व स्तोत्रांमधला समान धागा असून साधकांकडून ह्या अद्वैत ज्ञानाचे अवलोकन व्हावे आणि तो अध्यात्मामध्ये अग्रेसर व्हावा म्हणून त्यांनी ह्या स्तोत्रांची निवड केली. मुळात स्वयंसिद्ध अशा ह्या स्तोत्रांचे सिद्धहस्त लेखणीतून झालेले विवरण म्हणजे कालातीत असा स्वयंप्रकाशी ज्ञानदीप आहे. [४०]

दै.सामनाच्या श्री. बोरीकर ह्यांनी (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र – संपूर्ण अर्थ आणि विवेचन ह्या पुस्तकाचे परीक्षण नोंदवताना म्हटले आहे की, ‘स्तोत्राचे महत्त्व आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ प्रत्येक श्लोकानुसार सविस्तरपणे मांडले आहे. त्यात कुठेही कृत्रिमता नाही. हिंदू धर्मात अशीबरीच स्तोत्रे आणि मंत्र आहेत, जे काळाच्या ओघात अर्थबोध न झाल्याने विस्मृतीत गेलेत. पणबदलत्या काळाच्या ओघात त्यांच्यावर अशाप्रकारे नव्याने प्रकाश पडणे जरुरीचे आहे. हा प्रकल्प लाखमोलाचा असून, ‘एका श्लोकाचे अर्थपूर्ण विश्लेषण कसे करावे, ह्याचा आदर्श म्हणजे हे पुस्तकं आहे.’ [४१]

श्री बापट गुरुजींच्या "यज्ञ रहस्य" ह्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करणारे डॉ श्रीपाद म्हणतात, "The way in which Poojya Bapat Guruji has connected the theories of modern science to the act of offering, is simply amazing! [४२]

बापट गुरुजींची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून गुरुजींची विवेचने ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात आली आहेत. ह्यांमध्ये अघोरकष्टोद्धरण स्तोत्र, श्रीगुरुस्तुति, श्रीदत्तात्रेय स्तोत्र, करुणात्रिपदी, चित्तसद्‍बोधनक्षत्रमाला स्तोत्र, नवरत्‍नमाला स्तोत्र, मंत्रात्मक श्लोक]आणि श्रीदत्तात्रेयापराधक्षमापन स्तोत्र ह्यांचा समावेश आहे. ह्यापैकी (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र - संपूर्ण अर्थ आणि विवेचन हे मूळ मराठी पुस्तक आजतागायत हिंदी, गुजराथी, इंग्रजी आणि कन्नड अशा अन्य चार भाषांमध्ये अनुवादित झाले असून, लवकरच ह्या पुस्तकाची तेलुगू आवृत्ती प्रकाशित होईल. ही सर्व विवेचने संतकृपा, अक्कलकोट स्वामीदर्शन, गुरुसेवा, विश्वपंढरी, धनुर्धारी अशा विविध मासिकांमधून प्रकाशित होत असतात. ह्यासोबतच गुरुजींच्या अन्य विवेचनांना आणि लेखांनासुद्धा विविध पुस्तकांद्वारे संग्रहित करून प्रकाशित करण्याचे काम साधकांमार्फत चालू आहे.


बापट गुरुजी लिखित / संकलित पुस्तके[संपादन]

बापट गुरुजी लिखित वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज विरचित स्तोत्रांवरील अर्थाची आणि विवरणाची पुस्तके

१) (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र : संपूर्ण अर्थ आणि विवेचन (मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी)

२) श्रीगुरुस्तुति : संपूर्ण अर्थ आणि विवेचन (मराठी, गुजराती)

३) श्रीदत्तात्रेय स्तोत्र : संपूर्ण अर्थ आणि विवेचन (मराठी)

४) करुणात्रिपदी : संपूर्ण अर्थ आणि विवेचन (मराठी)

५) चित्तसद‌्बोधनक्षत्रमाला : संपूर्ण अर्थ आणि विवेचन (मराठी)

६) नवरत्‍नमाला : संपूर्ण अर्थ आणि विवेचन (मराठी)

७) मंत्रात्मक श्लोक : संपूर्ण अर्थ आणि विवेचन (मराठी)

८) श्रीदत्तात्रेयापराधक्षमापन स्तोत्र : संपूर्ण अर्थ आणि विवेचन (मराठी)

इतर विषयांवरील पुस्तके -

९) यज्ञरहस्य (मराठी, हिंदी (यज्ञेश्वर प्रकाशन), इंग्रजी (ढवळे प्रकाशन)

१०) नमो गुरवे वासुदेवाय - मंत्र व यंत्र साधना (मराठी) (यज्ञेश्वर प्रकाशन)

११) नर्मदा परिक्रमा : एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा - (मराठी) (प्रथम आणि द्वितीय आवृत्ती - ढवळे प्रकाशन) (तृतीय आवृत्ती - यज्ञेश्वर प्रकाशन)

१२) विचारें मना तूंचि शोधूनि पाहें - (मराठी) (प्रथम आवृत्ती - ढवळे प्रकाशन) (द्वितीय आवृत्ती - यज्ञेश्वर प्रकाशन)

१३) संतोपदेश ( भाग १ ते ५) - (मराठी) (प्रथम आवृत्ती - यज्ञेश्वर प्रकाशन) :-

 • १. वर्तमान एक संधिकाल
 • २. ज्ञानदीप उजळू दे
 • ३. सुखाचा शोध
 • ४. गुरु तोचि देव
 • ५. साधना मार्ग प्रदीप

१४) ध्यानातून ध्येयाकडे - (मराठी) (प्रथम आवृत्ती - ढवळे प्रकाशन)

१५) श्रीकृष्ण नावाचं सावळं सामर्थ्य - (मराठी) (प्रथम आवृत्ती - ढवळे प्रकाशन)

१६) श्रीनर्मदा नित्यपाठ (संस्कृत - हिंदी / मराठी)

१७) श्रीगंगा गीतावली (संस्कृत - हिंदी / मराठी)

१८) श्रेष्ठ मंत्रशक्ती (मराठी - संस्कृत)

१९) आद्य शंकराचार्य स्तोत्रमाला (मराठी - संस्कृत)

२०) स्तोत्रसुधा (श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित निवडक स्तोत्रांचे संकलन) (मराठी - संस्कृत)

संदर्भ[संपादन]

 1. ^ [www.yadnya.in "संक्षिप्त परिचय"] Check |url= scheme (सहाय्य). 8 sept 2018 रोजी पाहिले. 
 2. ^ नामजोशी ललिता (संपादिका गुरुसेवा त्रैमासिक) प्रस्तावना, यज्ञरहस्य, पृष्ठ क्र. ११-१२, यज्ञेश्वर प्रकाशन]
 3. ^ खरे भारवि, (संपादक, संतकृपा मासिक, पुणे), प्रस्तावना, संतोपदेश पुस्तिका मालिका, भाग १ – वर्तमान एक संधिकाल
 4. ^ कारुण्यस्पर्शी, पुस्तक परीक्षण, ‘अपेक्षा’ मासिक, ऑगस्ट २०१२, पृष्ठ क्र. २७-२८
 5. ^ पेडणेकर अमोल, भक्तोंका कायापालट करनेवाली कार्यशाला !, विवेक, हिंदी, जुलै २०१०, पृष्ठ३६-३८]
 6. ^ (लेखक परिचय - पृष्ठ क्र. १९, श्रीकृष्ण नावाचं सावळं सामर्थ्य, लेखक – वासुदेव बापट गुरुजी, केशव भिकाजी ढवळे प्रकाशन)
 7. ^ (लेखक परिचय - गुरुस्तुति, पृष्ठ क्रमांक ५, लेखक – वासुदेव बापट गुरुजी, प्रकाशक - ओम सद्गुरु प्रतिष्ठान, प्रथम आवृत्ती, दि. २६-०१-२०१०
 8. ^ श्री. वासुदेव वामन बापट गुरुजी ह्यांचा परिचय, (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र – संपूर्ण अर्थ आणि विवेचन, लेखक – बापट गुरुजी, पृष्ठ क्र. ६-८, यज्ञेश्वर प्रकाशन
 9. ^ (Annexure II, PARAM POOJYA SADGURU SHRI VASUDEO VAMAN BAPAT GURUJI – Brief Introduction, page no. 111, Book- Shri Vasudev Yati by Swami Virajananda, Publication – Keshav Bhikaji Dhawale, ISBN no.9789383804436)
 10. ^ श्री. वासुदेव वामन बापट गुरुजी ह्यांचा परिचय, (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र – संपूर्ण अर्थ आणि विवेचन, लेखक – बापट गुरुजी, पृष्ठ क्र. ६-८, यज्ञेश्वर प्रकाशन
 11. ^ (Annexure II, PARAM POOJYA SADGURU SHRI VASUDEO VAMAN BAPAT GURUJI – Brief Introduction, page no. 111, Book- Shri Vasudev Yati by Swami Virajananda, Publication – Keshav Bhikaji Dhawale, ISBN no.9789383804436)
 12. ^ यज्ञरहस्य, पृष्ठ क्र.१८-२१, विवेचक : वासुदेव वामन बापट गुरुजी (यज्ञेश्वर प्रकाशन)
 13. ^ लेखक परिचय, यज्ञरहस्य, पृष्ठ क्रमांक ७, विवेचक : वासुदेव वामन बापट गुरुजी (यज्ञेश्वर प्रकाशन)
 14. ^ मनोगत, यज्ञरहस्य, पृष्ठ क्र.९, विवेचक : वासुदेव वामन बापट गुरुजी (यज्ञेश्वर प्रकाशन)
 15. ^ यज्ञरहस्य, पृष्ठ क्र.२२-३१, विवेचक : वासुदेव वामन बापट गुरुजी (यज्ञेश्वर प्रकाशन)
 16. ^ दाभाडे प्रिया, ‘यज्ञविज्ञानाचे रहस्य’ – यज्ञरहस्य - पुस्तक परिचय’ – दिनांक ५ जुलै २००९, दैनिक ऐक्य, सातारा
 17. ^ लेखक परिचय- प्रकाशक, यज्ञरहस्य, पृष्ठ क्र.७, विवेचक : वासुदेव वामन बापट गुरुजी (यज्ञेश्वर प्रकाशन)
 18. ^ "बापट गुरुजी यांचे निधन". Thane Vaibhav. 2015-11-19. 2018-09-04 रोजी पाहिले. 
 19. ^ वासुदेव बापट गुरुजी ह्यांचा परिचय, (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र – संपूर्ण अर्थ आणि विवेचन, लेखक – बापट गुरुजी, पृष्ठ क्र. ६-८, ओम सद्गुरु प्रतिष्ठान, प्रथम आवृत्ती, २००८
 20. ^ परिशिष्ट, यज्ञरहस्य, पृष्ठ क्र. ८४, विवेचक : वासुदेव वामन बापट गुरुजी (यज्ञेश्वर प्रकाशन)
 21. ^ (Annexure II, PARAM POOJYA SADGURU SHRI VASUDEO VAMAN BAPAT GURUJI – Brief Introduction, page no. 111, Book- Shri Vasudev Yati by Swami Virajananda, Publication – Keshav Bhikaji Dhawale, ISBN no.9789383804436)
 22. ^ श्री. वासुदेव वामन बापट गुरुजी ह्यांचा परिचय, (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र – संपूर्ण अर्थ आणि विवेचन, पृष्ठ क्र. ६-८, लेखक – बापट गुरुजी, यज्ञेश्वर प्रकाशन
 23. ^ नर्मदा परिक्रमा : एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा, सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी ह्यांच्या सहवासात घडलेल्या अनुपमेय अशा पालखीसह परिक्रमेचा अभ्यासात्मक आढावा , पृष्ठ २२-२६ (केशव भिकाजी ढवळे प्रकाशन)
 24. ^ Naidunia. "नर्मदा की महिमा अपार" (en मजकूर). 2018-10-26 रोजी पाहिले. 
 25. ^ डॉ. केळकर मेघना, नर्मदा परिक्रमा : एक आनंदयात्रा, केल्याने तीर्थाटन, संतकृपा मासिक, मार्च २०१२, पृष्ठ ९-१६, संतकृपा प्रतिष्ठान, पुणे
 26. ^ बिनीवाले अविनाश, राजस परिक्रमा, नर्मदेची भटकंती, लोकप्रभा, लोकसत्ता, दि. २० जानेवारी २०१२ - http://www.lokprabha.com/20120120/naramadechi-bhatkanti.htm
 27. ^ आशीर्वचन, बापट गुरुजी, नर्मदा परिक्रमा : एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा, सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी ह्यांच्या सहवासात घडलेल्या अनुपमेय अशा पालखीसह परिक्रमेचा अभ्यासात्मक आढावा, पृष्ठ ५-६ (केशव भिकाजी ढवळे प्रकाशन)
 28. ^ (दोन शब्द, पृष्ठ क्र. ३, ‘श्रीकृष्ण नावाचं सावळं सामर्थ्य’, लेखक – वासुदेव बापट गुरुजी, प्रकाशक - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन)
 29. ^ (केळकर मेघना, धर्मयात्रेतील आध्यात्मिक आनंद, पृष्ठ क्र. ९, संतकृपा मासिक, जानेवारी २०१३)
 30. ^ बापट गुरुजी, गंगा महात्म्य, तीर्थ महात्म्य, गुरुसेवा त्रैमासिक, १ फेब्रुवारी २०१३ – ३० एप्रिल २०१३, पृष्ठ क्र. ३४-३५
 31. ^ लेखक परिचय, श्रीदत्तात्रेय स्तोत्र – संपूर्ण अर्थ आणि विवेचन : लेखक – बापट गुरुजी, पृष्ठ क्र. ५ ते ७
 32. ^ मानवसेवा हीच ईश्वरसेवा, मुलाखत, विवेक साप्ताहिक, दि. २० जुलै २००८, पृष्ठ क्र. ४२-४४
 33. ^ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरच्या संस्थेची स्वच्छता मोहीम - https://www.loksatta.com/thane-news/kalyan-ganesh-ghat-premises-clean-by-badlapur-social-organization-1145383/
 34. ^ सुखी जीवनाचा मार्ग, नियमित उपक्रम, साप्ताहिक विवेक, ०५ जुलै २००९, पृष्ठ क्र. २५
 35. ^ लेखक परिचय, नवरत्नमाला स्तोत्र : संपूर्ण अर्थ आणि विवेचन, लेखक – बापट गुरुजी, पृष्ठ क्र. ५ ते ७, प्रकाशक- केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
 36. ^ ‘साधकांना मार्गदर्शक स्तोत्र’-(अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र, पुस्तक परिचय, दिनांक ५ जुलै २००९, झुंबर पुरवणी, दैनिक ऐक्य, सातारा
 37. ^ नेवेवाणी प्रभाकर, श्रीगुरुस्तुति- पुस्तक परीक्षण, अनुराग कल्याण टाईम्स मार्च २०१०, पृष्ठ क्र. ५
 38. ^ वार्ताहर, , विवेक, हिंदी, जुलै २०१०, पृष्ठ ३८,३९
 39. ^ लेखक परिचय, नवरत्नमाला स्तोत्र – संपूर्ण अर्थ आणि विवेचन, लेखक – बापट गुरुजी, पृष्ठ क्र. १०, केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
 40. ^ दाभाडे प्रिया, क्षमायाचना : अंतर्मुख करणारा प्रवास, धनुर्धारी, एप्रिल २०१७, पृष्ठ क्र. २२-२३
 41. ^ बोरीकर संजय,एका श्लोकाचे विश्लेषण, ग्रंथ परीक्षण, रविवारसामना, १२ एप्रिल २००९
 42. ^ डॉ. एच. आर. श्रीपाद, अनुवादक, (MSc, PhD. Associate professor, PG department of Physics, Government college, Mandya, Karnataka), Note From The Translators Heart, Yajnarahasya, (इंग्रजी आवृत्ती)


अधिकृत संकेतस्थळ - [www.yadnya.in]