वाळूज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.
कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.वाळूज (देगाव) हे सोलापूर जिल्हातल्या मोहोळ तालुक्यातील सांस्कृतिक संचिते असेलेले गाव आहे.

हे गाव मोहोळपासून २२ किमी अंतरावर आह़े या गावात जाण्यासाठी सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या मोहोळ येथून वैरागला जाणाऱ्या मार्गाकडे वळावे लागत़े. काळ् यामातीच्या सुपीक जमिनी असेलेले हे गाव एके काळी अतिशय समृद्ध असल्याच्या खुणा गावाच्या परिसरात पहायला मिळतात़. गावात प्रवेश करताच टोलंजंग दगडी वाडे एका पंगतीत बसवल्याचा भास होतो़. प्रत्येक वाड्याला ढेळजा(?) कमानीचे उंच दरवाजे व जयविजय उभे असेलले शेंडे पाहायला मिळतात. वाड्यांमधून लोक एकत्र कुटुंब पद्धतीने राहतात. अनेक घरे दुमजली आहेत. शिवाय एक मजली धाब्याची घरेही गावभर दिसतात़.

वाळूज (देगाव) परिसरातील समृद्ध ऐतिहासिक स्थळे :-

महादेव मंदिर - वाळूज येथे महादेवाचे हेमाडपंथी प्राचीन मंदिर असून मंदिराच्या प्रवेशद्वारातच महाकाय दगडी गणपती व नंदी आह़े, वाळकेश्वर या नावाने हे मंदिर ओळखले जात़े. याच मंदिराशेजारी सिद्धपुरुष संत रामभाऊ महाराज यांची समाधी आह़े. वाळूज येथे भोगावती व नागझरी नद्यांचा संगम असून या संगमावर एक महादेवाचे प्राचीन मंदिर भग्नावस्थेत आह़े. देगाव रस्त्यावर वाळूजपासून दोन कि़मी़ अंतरावर श्रीहरीस्वामी व राघव स्वामी यांचे एकत्रित मंदिर आह़े. हे काशीक्षेत्रीचे ब्राह्मण तप करण्यासाठी या स्थळी आले होत़े. श्रीहरी हे गुरू तर राघव हे त्यांचे शिष्य होत. श्रीहरी स्वामी यांची समाधी येथे आह़े. दलित वस्तीत धर्मराज नावाच्या एका साधुपुरुषाची समाधी आह़े. तसेच आणखी एका साधुपुरुषाचीही समाधी या मंदिराशेजारीच आह़े

गावातल्या मारुती मंदिराजवळ वीरगळ तसेच सतीचे हात आहेत़. ग्रामदैवत खंडोबा असून गावात खंडोबाची दोन मंदिरे आहेत़. दत्त, विठ्ठल अंबाबाई, यडेश्वरी (येरमाळा ) आदी देव-देवतांची मंदिरेही गावात आहेत. वाळूज गावात नरसिंहाची सर्वात जास्त म्हणजे तीन लहान मंदिरे (घुमट्या) आहेत़.

सामाजिक / राजकीय व्यक्ती
  • कै़. ज्ञानोबा कादे - ज्ञानोबा मुरलीधर कादे तथा कादे दाजी हे या गावातले शेतकरी कामगार पक्षाचे जुने कार्यकर्ते होत़े. बाबुराव आण्णा पाटील अनगरकर यांचे खंदे समर्थक असलेल्या कादे दाजी यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दहा वर्षे अध्यक्षपद भूषविल़े, अनेक देशांचे दौरे केले. भूविकास बँकेचे ते अखेरपर्यंत संचालक होत़े. वाळूजच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आह़े सोलापुरातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ़ संदेश कादे हे त्यांचे चिरंजीव होत. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुशांत ज्ञानोबा कादे हे दाजीचे सुपुत्र सध्या दाजी यांचा राजकीय वारसा चालवत आहेत . तर सुदर्शन सुहास कादे हा दाजींचा नातू राष्ट्रवादी कॉंग्रसमधून उमलते नेतृत्व म्हणून पुढे येत आहे .
  • कै़ देशमुख - वाळूज येथीलच पण सोलापुरात स्थायिक झालेले कै. धैर्यशील दादा देशमुख हे महाराष्ट्रातील पहिल्या सहा बॅरिस्टरांपैकी एक होते. त्यांचा मुलगा पृथ्वीराज देशमुख सोलापुरात वकील आहे.
  • भगवान कुलकर्णी - वाळूज येथील भगवान कुलकर्णी यांनी 'तुफानी वादळ नियतीचे', 'प्रतीक्षा' आदी नाटके तसेच 'संत रामभाऊ महाराज चरित्र', 'सासुरे येथील श्री महांकाळेश्वर यांचे चरित्र' आदी धार्मिक लेखन केले आह़े
  • रजनीश जोशी - सकाळ च्या सोलापूर आवृत्तीचे पत्रकार रजनीश जोशी हे वाळूजचेच. पर्यावरण, कला व संस्कृतीक्षेत्राचे अभ्यासक आहेत. उजनी धरण व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेसंबंधीर त्यांचे एक पुस्तकही प्रकाशित झालेले आह़े
  • शिवाजी कादे - बार्शीचे शिवाजी कादे हे उत्तम छायाचित्रकार आहेत. त्यांचा श्रद्धा नावाचा स्टुडिओ आहे. कला प्रांतातही ते नावाजलेले आहेत़ काही मराठी चित्रपटात त्यांना सहअभिनेता म्हणून काम केले आह़े मराठी चित्रपटांची स्थिर चित्रीकरणेही त्यांनी केली आह़ेत.
  • अरविंद मोटे - लोकमतच्या गोवा आवृत्तीचे पत्रकार अरविंद मोटे हे वाळूजचेच. सोलापूर येथील सुराज्य या दैनिकातून त्यांनी पत्रकारितेस सुरुवात केली. साप्ताहिक लोकमंगल व लोकमंगल नावाचे शेतीविषयक मासिक यांसाठी त्यांनी काही काळ काम केले सध्या ते लोकमतच्या गोवा आवृतीत पत्रकार म्हणून कार्यरत आहेत

देगाव[संपादन]

वाळूज गावाच्या शेजारीच ४ किमी अंतराव देगाव हे गाव आहे. ते मोहोळपासून १८ किमी दूर असून येथे नागनाथाचे प्रसिद्ध मंदिर व महंत श्री शिपलागिरीजी महाराज यांचा मठ आह़े. या गावाला चांगला सामाजिक व सांस्कृतिक वारसा आह़े. विजयादशमीला होणाऱ्या यात्रेसाठी प्रतिवर्षी गावकरी नाटक आयोजित करतात़. गावात गुणी व हौशी कलावंत आहेत़. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष व संघटनाच्या शाखा या गावात आहेत. कुठेही नवी संघटना अथवा पक्ष स्थापन होताच या गावात त्याची शाखा निघत़े, असे क्रियाशील लोक येथे आहेत़

नागनाथ मंदिर[संपादन]

मोहोळ व वडवळ येथील सिद्ध नागेशांच्या तथा नागेश संप्रदायाचे एक महत्त्वाचे मंदिर देगाव येथे आह़े यात्रेच्या वेळी गण (खर्गे ) निघतो़ भाकणूक होत़े. (नागेश संप्रदायाच्या अधिक माहितीसाठी यू.म. पठाण यांच्या साहित्याचा आधार घ्यावा़. सोलापूर जिल्ह्यात वडवळ व मोहोळ याशिवाय खैराव ता़ माढा, गौडगाव ता़ बार्शी, साखरेवाडी,कळमण, मार्डी ता़ उत्तर सोलापूर, आदी ठिकाणी नागनाथाची मंदिरे आहेत़).

शिपलागिरी मठ[संपादन]

याशिवाय देगाव येथे कुंभमेळ्याच्या आखाड्यातील प्रसिद्ध शिपलागिरी महाराजांचा मठ आह़े. शिपलागिरी महाराज अलीकडेच समाधिस्त झाले असून निलकंठ महाराज नावाचे त्यांचे उत्तराधिकारी तेथे आहेत़. संपूर्ण देगाव परिसरात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत़ यावरुनच या देवभूमीस देवगाव असे नाव पडले असावे. पुढे अपभ्रंश होवून देगाव झाले असावे. देगाव व वाळूज यांच्या मध्यभागी बुद्रुकवाडी येथील महादेव माळ या नावाने प्रसिद्ध असलेल्या माळावर महादेवाची स्वंयभू पिंड आह़े. श्रावणात येथे भाविक जमतात़. देगाव येथे प्राचीन बारव (पाण्याची मोठी विहीर) आह़े

सामाजिक[संपादन]

उत्तरेश्वर दादा आतकरे - उत्तरेश्वर दादा आतकरे हे काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत़.
गोविंद पाटील - ॲड. गोविंद पाटील हे काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत़.
विजयकुमार पाटील -विजयकुमार पाटील हे राजकीय व्यक्तिमत्त्व देगाव येथील आहे.
देगाव हे अभिनेत्री स्मिता पाटील यांचे माहेर आह़े.

इतर[संपादन]

मोहोळ नरखेड परिसरात नागेश संप्रदायाच्या अनेक पाऊलखुणा आहेत़. या परिसरातल्या आष्टी येथे पेशवाईची लढाई झालेली आह़े. या ठिकाणी पेशव्याचे शेवटचे सेनापती बापू गोखले यांची समाधी आह़े. करमाळा येथे एक प्राचीन विहीर असून तिच्या संबंधात जगाच्या केंद्र बिंदूबद्दल अनेक काल्पनिक कथा सांगितल्या जातात़. बार्शी येथ उत्तरेश्वर मंदिराशेजारी संत नामदेवांना विसोबा खेचरांनी गुरु-उपदेश केल्याचे स्थळ आह़े नान्नज (ता़. उत्तर सोलापूर) येथील प्रसिद्ध माळढोक अभयारण्य वाळूज गावापासून जवळच आह़े.
अधिक माहितीसाठी कृष्णा इंगोले यांचे सोलापुरी साहित्य वाचावे. यू.म. पठाण यांच्या अनेक पुस्तकांत जिल्हातील विविध स्थळांची माहिती आह़े