वाल्मिक थापर
वाल्मिक थापर हे भारतीय व्याघ्रसंवर्धक व लेखक होते.
पार्श्वभूमी
[संपादन]त्यांचा जन्म नवी दिल्ली येथे इसवी सन १९५२ मध्ये देशातील प्रतिष्ठित, सधन, सैनिकी पेशा,पत्रकारिता, इतिहास, शिक्षण, कला, साहित्य इत्यादी क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या थापर परिवारात झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव रोमेश थापर होते.त्यांचे आजोबा भारतीय सशस्त्र सेनेच्या वैद्यकीय शाखेचे महासंचालक होते. त्यांचे नाव दयाराम थापर होते. आजोबांचे भाऊ भारतीय लष्कराचे चौथे लष्कर प्रमुख होते. त्यांचे नाव प्राणनाथ थापर होते.वडील हे पत्रकार आणि सेमिनार या मासिकाचे मालक व संपादक होते. वडिलांनी नाटक व चित्रपटाचे लेखन केले होते तसेच काही चित्रपटात कामही केले होते. वाल्मिक ह्यांचे काका करण थापर हे दूरचित्रवाणी निवेदक, सूत्र संचालक आणि पत्रकार आहेत. त्यांच्या आत्या रोमिला थापर ह्या इतिहास तज्ञ आहेत.[१] त्यांचे शिक्षण डून स्कूल येथे झाले होते. दिल्ली येथील सेंट स्टीफन कॉलेजमधून त्यांनी समाजशास्त्र ह्या विषयात पदवी प्राप्त केली होती. त्यांना सुवर्णपदक मिळाले होते.
त्यांनी इसवी सन १९८८ मध्ये रणथंभोर फाउंडेशन ची स्थापना केली होती. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य राजस्थान येथील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानातील वाघांचा अभ्यास आणि संरक्षण ह्यासाठी व्यतीत केले.त्यांचा पहिला रणथंभोर व्याघ्रप्रकल्प प्रवास इसवी सन १९७६ मध्ये झाला. त्यांना त्यावेळी असलेले व्याघ्रप्रकल्प वन्यजीव रक्षक तथा सहाय्यक क्षेत्र संचालक फतेहसिंह राठोड ह्यांची मदत झाली. ते दोघे आणि तेजबीरसिंग ३५ वर्षे ह्या प्रकल्पात संशोधन करीत होते.फतेहसिंह राठोड ह्यांचे १ मार्च २०११ रोजी निधन झाले तोपर्यंत त्यांची ह्या प्रकल्पाच्या संदर्भात मैत्री टिकून राहिली होती.त्यांनी एकूण २७ पुस्तकांचे लेखन केले.[२]
त्यांनी खालील पुस्तके लिहिली:-
- लँड ऑफ द टायगर
- टायगर फायर
- मालिका: लँड ऑफ द टायगर
- माहितीपट:माय टायगर फँमिली.
त्यांचे शनिवार दिनांक ३१ मे २०२५ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.[३]