वाघाळे (नंदुरबार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?वाघाळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर नंदुरबार
जिल्हा नंदुरबार जिल्हा
भाषा मराठी
उप सरपंच गणेश भाईदास चौरे
बोलीभाषा कोकणी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२५४१२
• +०२५६४
• एमएच/३९
संकेतस्थळ: https://nandurbar.gov.in/

वाघाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे

.

काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असे देखील संबोधले जाते.

भौगोलिक स्थान, जीवनशैली आणि कला संस्कृती[संपादन]

    महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला गुजरात राज्याच्या सीमेलगत नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातीलविरचक जलाशयाच्या दक्षिणेला स्थित आहे.
जवळ पास ३००० लोकसंख्या असलेल्या या गावात एक कनिष्ठ महाविद्यायात तसेच शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहे. जिल्ह्याच्या ठिकाणापासून १० किमी अंतरावर असल्याने या गावाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
   या गावात अनेक जाती धर्माचे लोक वास्तव्य करत आहेत. प्रामुख्याने या गावात कोकणी समाज मोठ्या प्रमणावर आहे त्या बरोबरच भिल्ल, महार, मुस्लिम, मारवाडी,मद्रासी हे समाज देखील व्यवसायाच्या दृष्टीने वास्तव्य करत आहेत.गावात प्रामुख्याने चार गल्ल्या आहेत त्या पुढीप्रमाणे:-
१. पवारगल्ली
२. बरडगल्ली 
३. पाटीलगल्ली
४. सावरगल्ली
   या गावातील अनेक लोक नोकरी निमित्तानं गावाबाहेर राहत आहेत. तसे असले तरी गावात एप्रिल-मे महिन्यात भरणाऱ्या भवानी मातेच्या यात्रे निमित्ताने ते सह कुटुंब गावाला येतात आणि आपल्या नाते वाईकाना भेटतात.३ दिवस चालणाऱ्या या यात्रेला शेजारील गावांतील लोक देखील येतात आणि त्यामुळे सलोखा आणि आपूलकी टिकून राहते.तसेच होळी, नवरात्र,दिवाळी हे सण देखील मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
    कोकणी समाजाचे कुलदैवत असलेले डोंगर्यादेव सण हा कार्तिक पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. कार्तिक पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या अमावसेनंतर दिसणाऱ्या नवीन चंद्र कोर तेव्हा पासून डोंगर्या देवा ची पूजा सुरू होते. दररोज शेतकरी बांधव दिवसभर काम करून संध्याकाळी ज्या व्यक्तीच्या घरी देवाची स्थापना केली असेल तेथे जमतात त्या नंतर देवाची पूजा प्रार्थना करून आपले पारंपरिक वाद्यांच्या तालावर पारंपरिक नृत्य करत ठेका धरतात रात्री जवळ पास १२ वाजे पर्यंत हा कार्यक्रम चालतो.असेच दररोज जवळपास १२-१३ दिवस हा कार्यक्रम चालतो.त्या नंतर गाव मागणे ,गडावर जाणे तिकडून आल्यावर घरभरणी आणि शेवटी भंडारा अशी कार्यक्रमाची रूपरेखा असते.

हवामान[संपादन]

येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे.तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate