Jump to content

वांचो भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वांचो
𞋒𞋀𞋉𞋃𞋕
वांचो‎
स्थानिक वापर भारत
प्रदेश अरुणाचल प्रदेश
लोकसंख्या ५९,१५४
भाषाकुळ
लिपी वांचो लिपी
भाषा संकेत

वांचो (वांचो) ही ईशान्य भारतातील कोन्याक भाषा आहे. वांचो ही आग्नेय लाँगडिंग जिल्ह्यातील ३६ गावे, तिरप जिल्हा, अरुणाचल प्रदेश, तसेच आसाम आणि नागालँड ( एथनोलॉग प्रमाणे) मध्ये बोलली जाते. या भाषेला बनपारा नागा, जोबोका, जोकोबा देखील नाव आहेत.

प्रामुख्याने भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार ५६,८६६ लोकसंख्या असलेले वांचो लोक ही भाषा बोलतात . अल्पसंख्याक असूनही, या रहिवाशांची विधी, औपचारिक प्रथा, धर्म आणि वांचोच्या विविध बोलींसह समृद्ध संस्कृती अजुनही जिवंत आहे.

भारतीय रुपयासारखे(₹) वांचो ङुन चिन्ह,

पोटभाषा

[संपादन]

एथनोलॉग प्रमाणे वांचोच्या पुढील प्रमाणे पोटभाषा आहेत.

  • चांङनोई
  • बोर मुथुन (बोर मुटोनिया)
  • होरू मुथुन
  • कुलुंग मुथुन (मिथन)

या प्रदेशातील वरच्या आणि खालच्या भागात बोलल्या जाणाऱ्या बोलींमध्ये लक्षणीय फरक आहे.

लेखन

[संपादन]

वांचो भाषा साधारणपणे देवनागरी किंवा लॅटिन लिपीमध्ये लिहिले जाते. २००१ आणि २०१२ दरम्यान, शिक्षक बनवांग लोसू यांनी वांचो लिपी म्हणून एक अनन्य वर्णमाला तयार केली जी काही शाळांमध्ये शिकवली जाते. [१] २०१९ मध्ये, ही लिपी अधिकृतपणे युनिकोड १२.० मध्ये प्रकाशित करण्यात आली. [२]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Everson, Michael (2017-07-26). "L2/17-067R: Proposal to encode the Wancho script in the UCS" (PDF).
  2. ↑ Unicode, Inc. "Announcing The Unicode® Standard, Version 12.0".

साचा:Languages of Northeast India