वांचो नागा
Tribe in Arunachal Pradesh, India | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान |
| ||||
| |||||
वांचो लोक, ज्यांना वांचो नागा असेही म्हणतात, हा तिबेट-ब्रम्ही स्थानिक वांशिक गट आहे जो ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील लोंगडिंग जिल्ह्यातील पाटकाई टेकड्यांवर राहतो. वांचो ही भाषा उत्तरी नागा भाषेतील तिबेट-ब्रम्ही कुटुंबातील आहे.
मूळस्थळ
[संपादन]वांचो नागा वांशिकदृष्ट्या अरुणाचल प्रदेशच्या नोक्टे आणि नागालँडच्या कोन्याक लोकांशी संबंधित आहेत.
धर्म
[संपादन]इतर नागांप्रमाणे, वांचो, नोक्टे आणि कोन्याकच्या लहान अल्पसंख्याकांसह, अजूनही जीवात्मवादात विश्वास ठेवतात. हे जीवात्मवादी वांचो लोकांचा रंग आणि बौरंग या दोन शक्तिशाली देवतांच्या अस्तित्वावर विश्वास असतो. [ <span title="This claim needs references to reliable sources. (May 2024)">उद्धरण आवश्यक</span> ]
वांचो लोकांमध्येमध्ये ख्रिस्ती धर्माने काही अनुयायी मिळवले आहेत, त्यापैकी बरेच बॅप्टिस्ट किंवा कॅथलिक संप्रदायाचे आहेत. ख्रिश्चन धर्माचा स्वीकार मुख्यत्वे नागालँडच्या नागांच्या प्रभावामुळे, तसेच शिरशिकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यामुळेअसल्याचे कळते. तथापि, याचा परिणाम म्हणून वांचो लोकांच्या पारंपारिक संस्कृतीच्या धर्म संबंधी अनेक पैलूंमध्ये घाट झालेला दिसतो. [१]
२००१ च्या जनगणनेनुसार, वांचोपैकी १० % हिंदू आणि १६ % जीवात्मवादी असल्याचा दावा केला. २०११ च्या जनगणनेपर्यंत, वांचोपैकी फक्त २.५५ % हिंदू आणि ०.५५ % जीवात्मवादी असल्याचा दावा केला होता.
संस्कृती
[संपादन]वांचो संस्कृतीत गोंदणे हा महत्त्वाचा भाग आहे. परंपरेनुसार, डोळे आणि ओठांच्या सभोवतालच्या काही भागांचा अपवाद वगळता, पुरुषाने त्याच्या चार अंगांवर आणि संपूर्ण चेहऱ्यावर गोंदवलेले असते. स्त्रिया स्वतःला हार आणि बांगड्यांनी सजवतात, तसेच काही हलके गोंदण देखील करतात.
वांचोचा मुख्य सण ओरिया हा आहे, हा वसंतोत्सव मार्च किंवा एप्रिलमध्ये सहा ते बारा दिवसांच्या असतो. ही कालावधी प्रार्थना, गाणी आणि नृत्यांनी भरलेली असते. शुभेच्छा आणि सदिच्छा म्हणून गावकरी तांदळाच्या बिअरने भरलेल्या बांबूच्या नळ्यांची देवाणघेवाण करतात. नंतर गावाच्या प्रमुखाला, डुकराचे कातडे आदराचे चिन्ह म्हणून अर्पण केले जाते. हा सण अनेक दिवस झुम भात पेरणी, डुक्कर, म्हशी आणि गयाल यांचे बळी देणे आणि प्रत्येक मुरुंग (वसतिगृह) मध्ये मेजवानीची व्यवस्था करत साजरा केला जातो. ओरिया सणात मुले आणि मुली, समारंभविशेष पोशाख घालून गातात आणि नृत्य करतात. ओरिया दरम्यान लावलेल्या "जंगबान" भोवती लोक नाचतात. [२] ओरिया साजरा करण्यासाठी एक समाईक दिवस १९७५ मध्ये सुरू झाला, जेंव्हा अरुणाचल प्रदेश सरकारने १६ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली. [३]
जीवनशैली
[संपादन]वांचो हे पारंपारिकपणे वृद्ध सरदारांच्या परिषदेद्वारे नियंत्रित केले जातात, ज्यांना वाङ्हाम किंवा वांगसा म्हणून ओळखले जाते. [४]
संदर्भ
[संपादन]- ↑ Tanka Bahadur Subba, Sujit Som, K. C. Baral, North Eastern Hill University Dept. of Anthropology (2005). Between Ethnography and Fiction: Verrier Elwin and the Tribal Question in India. Orient Longman. pp. 6, 173–8. ISBN 8125028129.CS1 maint: multiple names: authors list (link)
- ↑ Govt. of Arunachal Pradesh (1980). Arunachal Pradesh District Gazetteers. Govt. of Arunachal Pradesh. pp. 83–5.
- ↑ "Oriah: The festival of Wanchos". 14 February 2022. 2 May 2024 रोजी पाहिले.
- ↑ Verrier Elwin (1965). Democracy in NEFA. North-East Frontier Agency. p. 177.