Jump to content

वर्षा गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वर्षा एकनाथ गायकवाड या पानावरून पुनर्निर्देशित)
वर्षा गायकवाड

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२००४
मतदारसंघ धारावी

महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र
कार्यकाळ
२०१० – २०१४

वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, पर्यटन व विशेष साहाय्य, राज्यमंत्री, महाराष्ट्र
कार्यकाळ
११ नोव्हेंबर २००९ – २६ सप्टेंबर २०१०

जन्म ३ फेब्रुवारी १९७५
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आई ललिता गायकवाड
वडील एकनाथ गायकवाड
पती राजू बाबू गोडसे
शिक्षण एमएससी (गणित), बीएड
व्यवसाय समाजकारण व राजकारण

वर्षा एकनाथ गायकवाड ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. २०१९ साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.[१][२]

प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत.[३] काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या असून त्यांना वडिलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.[४] ३ फेब्रुवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबात झाला होता.[२][५]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
  2. ^ a b "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "राज्याला पहिल्यांदाच मिळाल्या महिला शालेय शिक्षणमंत्री | eSakal". www.esakal.com.
  4. ^ "...म्हणून वर्षा गायकवाडांवर चिडले राज्यपाल". 30 डिसें, 2019. 2020-11-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-06 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात २३ मंत्री मराठा समाजाचे". Divya Marathi.