वर्णाश्रम धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू धर्मातील जातीव्यवस्था.

मुख्य विचार[संपादन]

ब्राह्मणाची वर्ण लक्षणे[संपादन]

शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत्परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत.

क्षत्रियांची वर्ण लक्षणे[संपादन]

युद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, ब्राह्मणांबद्दल भक्ती, कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत.

वैश्याची वर्ण लक्षणे[संपादन]

देव, गुरू आणि भगवंतांबद्दल भक्ती, धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणे होत.

शूद्राची लक्षणे[संपादन]

वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्राशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, तसेच गाय व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत.

संदर्भ:[संपादन]

  • श्रीमद् भागवत महापुराण
  • स्कंध-७ वा-अध्याय ११ वा(२१-२४)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.