वर्ग चर्चा:हुंड्याची उदाहरणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgSureshkhole: या पानाचा नेमका हेतू काय ? आणि या वर्गांतर्गत आलेले ४ लेख ते या वर्गात कसे मोडू शकतात, कृपया हे स्पष्ट करावे.

आणि मी इतर तीन वर्गांना (वर्ग:दर्शनशास्त्र, वर्ग:भारतातील हिंदूत्ववादी संस्था, वर्ग:नेहरुकाळातील प्रशासन) लावलेले पानकाढा व अशुद्धलेखन साचे तुम्ही परत काढू नका. इतर सदस्य, Gnome-edit-redo.svg:Gnome-edit-redo.svgअभय नातू: यांनी या ४ वर्गांची उल्लेखनियता व शुद्धलेखन तपासावे, ही विनंती. --संदेश हिवाळेचर्चा १०:२६, २३ एप्रिल २०१८ (IST)

1) माझ्यावर वैयक्तिक हल्ले केले जात आहेत हे मी परत एकदा नोंदवत आहे. मी केलेले वर्गच बरे तपासणीसाठी शोधले गेले आहेत.? Gnome-edit-redo.svgअभय नातू:Gnome-edit-redo.svgTiven2240: 2) दर्शनशास्त्र हा वेगळा वर्ग आहे कारण भारतीय तत्त्वज्ञानात दर्शन शास्त्रांना वेगळे महत्त्व आहे, आणि वेगवेगळी दर्शने आहेत. त्यामुळे तत्त्वज्ञान वर्गाबरोबरच दर्शनशास्त्र वर्ग असू शकतो. 3) भारतातील हिंदूत्त्ववादी संस्था हा वर्ग मराठी सोडून इतर विकीवरही उपलब्ध आहे, तो वर्ग का नसावा ह्याचेच कारण मला हिवाळे यांनी द्यावे. 4) नेहरुकाळातील प्रशासन हा ही वर्ग इतरठिकाणीही आहे, आणि इतिहासाचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की, नेहरु प्रशासनाने भारताच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा भाग वठवलेला आहे. शुध्दलेखनाबाबत, शंका असू शकते पण उल्लेखनीयतेबाबतची शंका असूच शकत नाही. तेव्हा, माझे संपादन उलटवणे थांबवावे. नाहीतर मला आपल्यावर कारवाईची मागणी करावी लागेल. आपण या आधी अनेकदा माझ्या कामात विघ्न आणणे आणि एकूणच विकीपिडीयाच्या कार्यात विघ्न आणण्याची कामे केली आहेत, अनेकदा समज देऊनही आपले वागणे आणि संपादने सुधारलेली नाहीत. त्यामुळे ही शेवटची विनंती मी करित आहे अश्याप्रकारचा उत्पात थांबवावा नाहीतर मला तशी तक्रार मराठीवर आणि वरच्या अधिकाऱ्यांकडेही नोंदवावी लागेल. WikiSuresh (चर्चा) १७:१७, २३ एप्रिल २०१८ (IST)

सुरेश खोले, मी चूकीच्या वर्गांना साचे लावले आहेत, मात्र तुम्ही परत परत संपादन युद्ध करीत आहात. Gnome-edit-redo.svg, सुबोध कुलकर्णी, प्रसाद साळवे, संतोष दहिवळ, अभय नातू: यांनी तपासायची कामे आपण करू नये, (कृपया, आपण सर्व सदस्यांनी माझी संपादने ज्यात मी लावलेले खोले निर्मित वर्गांना लावलेत साचे योग्य की अयोग्य ते तपासावेत) आणि वैयक्तिक हल्ले केल्याचा चूकीचा आरोप माझ्यावर ठेवू नये. वर्ग:भारतातील हिंदूत्ववादी संस्था या वर्गात अशुद्धलेखन चा साचा वापरला होता, पानकाढा चा नव्हे, हे लक्षात घ्या. Gnome-edit-redo.svg: यांनी या वर्गाचे वर्ग:भारतातील हिंदुत्ववादी संस्था असे शुद्धलेखन केल्यावर मी हा साचा या पानातून काढला, बहुतेक हे खोले सर पाहायचे विसरलेत. नेहरुकाळातील प्रशासन या वर्गाचे शीर्षकात अशुद्धलेखन आहे म्हणून तो साचा लावला आहे. पान काढा हा साचा वापरलेला नाही.


हुंड्याची उदाहरणे या वर्गाचा नेमका हेतू काय ? आणि या वर्गांतर्गत आलेले ४ लेख ते या वर्गात कसे मोडू शकतात, कृपया हे स्पष्ट करावे. याचे उत्तर आपण अद्याप दिलेले नाही.


Gnome-edit-redo.svgअभय नातू: कृपया, खोलेंना चूकीचे/अशुद्ध वर्ग बनवण्यापासून व साचे हटवण्याचे संपादन युद्ध करण्यापासून रोका व ज्याबाबद शंका उपस्थित केल्या आहेत त्यांचे निरसण करण्याचे सांगावे. तसेच खोलेंच्या त्यांनी माझे संपादन उलटवणे थांबवावे. नाहीतर मला आपल्यावर कारवाईची मागणी करावी लागेल. आपण या आधी अनेकदा माझ्या कामात विघ्न आणणे आणि एकूणच विकीपिडीयाच्या कार्यात विघ्न आणण्याची कामे केली आहेत, अनेकदा समज देऊनही आपले वागणे आणि संपादने सुधारलेली नाहीत. त्यामुळे ही शेवटची विनंती मी करित आहे अश्याप्रकारचा उत्पात थांबवावा नाहीतर मला तशी तक्रार मराठीवर आणि वरच्या अधिकाऱ्यांकडेही नोंदवावी लागेल. अशा धमक्यांना थांबवावे, विनंती.--संदेश हिवाळेचर्चा १८:४१, २३ एप्रिल २०१८ (IST)


सुरेश खोले यांचे वर्तन खुनशी व आकसपूर्ण असून ते स्वतः वाद उत्पन्न करतात. व भाषा भांडखोर वापरतात. तसेच जे त्यांच्या स्व वर्तनात असते तोच आरोप ते दुसऱ्यावर करून प्रचालकांना साद देत आकंड तांडव(आकंड तांडव ग्रामीण मराठी शब्द;शहरी अर्थ खाजयुक्त(नाच) नृत्य) करतात.

प्रथमतः खोले यांनी त्यांची भाषा सुधरावी. म्हणजे तशी भाषा इतरांना वापरावी लागणार नाही. दुसरे म्हणजे हेतूपुरस्कर कुरापती काढणे थांबवावे.Gnome-edit-redo.svgअभय नातू, Tiven2240: यांनी खोले यांच्या कुरापतीकडे लक्ष द्यावे ही विनंती.

विकिपीडियावर संपादन युद्ध व विनाकारणची भांडणे थांबवण्यासाठी खोले यांनी किमान वर्षभर मराठी विकिपीडिया वर प्रतिबंधीत करावे. ही विनंती. प्रसाद साळवे (चर्चा) २१:२२, २३ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgSureshkhole: हुंड्याची उदाहरणे ?? हे काय आहे कृपा याचे उद्देश सांगा. या वर्गाचे महत्व काय आहे? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २३:३२, २३ एप्रिल २०१८ (IST)

सुरुवातीच्या काळात केलेला हा वर्ग आहे जेव्हा मी विकीच्या नियमांची फारशी माहिती नसताना हा वर्ग केला होता इतरांनी हे लक्षात आणून दिल्याबावत त्यांचे आभार हा वर्ग काढून टाकावा अशी मी प्रचालकांना विनंती करतो. त्यावेळी मी वर्ग करताना हुंड्याची माहिती देण्याचा उद्देश होता परंतु आता मला लक्षात आले की हा वर्ग काढायला हरकत नसावी. WikiSuresh (चर्चा) २३:५१, २३ एप्रिल २०१८ (IST)

वरील चर्चेचा आढावा[संपादन]

 1. हिवाळे यांनी या वर्गपानाची उल्लेखनीयता काय? असा प्रश्न उपस्थित केला.
 2. हिवाळे यांनी या इतर तीन वर्गांची उल्लेखनीयता काय'? असाही प्रश्न उपस्थित केला.
 3. खोले यांना #२चे उत्तर दिले परंतु #१चे उत्तर येथे दिसत नाही.
 4. खोले यांनी त्यांच्यावर पुन्हा व्यक्तिगत हल्ले करीत असल्याचे म्हणले.
 5. हिवाळे यांनी मी चूकीच्या वर्गांना साचे लावले आहेत, मात्र तुम्ही परत परत संपादन युद्ध करीत आहात असे म्हणले. यात कोणत्या चुकीच्या वर्गांना साचे लावले हे स्पष्ट होत नाही आहे.
 6. हिवाळे यांनी अशुद्धलेखन साचे लावल्याचे म्हणले आहे.
 7. हिवाळे यांनी खोले प्रश्नांना उत्तर देत नसल्याचे म्हणले (पहा १,२,३)
 8. हिवाळे यांनी प्रचालकांना खोले यांना चूकीचे/अशुद्ध वर्ग बनविणे व साचे हटविण्यापासून थांबविण्याचे प्रचालकांकडे मागणी केली.
 9. साळवे यांनी खोले यांची भाषा खुनशी, आकसपूर्ण, भांडखोर असल्याचे आणि आकंडतांडव (शुद्धलेखन?) करीत असल्याचा आरोप केला आणि खोले यांना मराठी विकिपीडियावरुन एक वर्ष तडीपार करण्याची मागणी केली.
 10. टायवीन यांनी #१ बद्दल आठवण करुन दिली.
 11. खोले यांनी वर्ग काढण्यास हरकत नाही असे सांगितले

उत्तर[संपादन]

काही सूचना आणि मते[संपादन]

दिलेल्या प्रश्नांचे मुद्देसूद उत्तर द्यावे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर घाईघाईत राहिल्यास नंतर ते द्यावे (लक्षात आल्यावर/आणून दिल्यावर.)

इतर वर्ग/पानांबद्दलची चर्चा शक्यतो त्या-त्या पानावर करावी.

मराठी विकिपीडियावर अशुद्धलेखनामुळे बंदी घातली जात नाही. असे केल्यास वरील चर्चेतील तिघांनाही तडीपार करावे लागेल. याचबरोबर मराठी विकिपीडियावरील ९०+% संपादकांवर बंदी येईल. अशुद्धलेखन सापडल्यास ते शक्य तेथे बदलावे. शंका असल्यास त्याबद्दल नम्रपणे प्रश्न विचारावे. उघडउघड आणि सर्वथैव अशुद्धलेखन असल्यास तसा साचा लावावा. येथे आपण एकमेकांच्या चुका दाखविण्यास नाही सुधारण्यास आलो आहोत हे कायम लक्षात ठेवावे. आपल्या चुका सुधारल्याबद्दल इतरांची दखल घ्यावी, धन्यवाद द्यावेत. प्रसंगी बार्नस्टारही द्यावा.

एकंदर[संपादन]

येथे स्पष्ट दिसते आहे की हिवाळे/साळवे आणि खोले यांच्यात वितुष्ट असून ते एकमेकांच्या संपादनातील चुका काढून त्यांवर संपादनयुद्ध आणि शाब्दिक युद्ध करीत आहेत. यात त्यांच्या स्वतःबरोबरच प्रचालकांचाही वेळ वाया जात आहे.

या तिन्ही सदस्यांचे इतर सदस्यांशीही असे खटके उडालेले आहेत.

असे असताही तिघांनाही प्रचालक या नात्याने एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करु नये व व्यक्तिगत आरोप मुळीच करू नयेत अशी चेतावणी देत आहे. असे पुन्हा झाल्यास प्रतिबंधासह इतर कार्रवाई केली जाईल.

माझ्या पाहण्यानुसार हिवाळे यांचे अनेक सदस्यांशी पटत नाही. याचबरोबर आम्ही असे करू, आम्हाला सांगू नये, इ. वाक्प्रयोगांनी ते आपण एखाद्या कंपूचे सदस्य असल्याचेही सूचित करतात. (असे कंपू करणे त्वरित थांबवावे.) इंग्लिश विकिपीडियावरही त्यांचे याचप्रमाणे वाद झालेले होते. असे असता त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

अभय नातू (चर्चा) २३:५७, २३ एप्रिल २०१८ (IST) - प्रचालक, प्रशासक


आपण हस्तक्षेप केल्याबद्दल धन्यवाद, आपल्या सूचना मी लक्षात घेऊन ह्यापुढे उपरोल्लेखित सदस्यांच्या कामात लक्ष घालणार नाही. शिवाय जुन्या संपादनाचा आढावा घेऊन अश्या चुका जर मी भूतकाळात केल्या असतील तर त्या सर्व सुधारण्याचे काम मी हाती घेऊन मी केलेले सर्व वर्ग तपासात आहे. WikiSuresh (चर्चा) ००:१४, २४ एप्रिल २०१८


Gnome-edit-redo.svgअभय नातू: मी अनेक चूकीच्या वर्गांना साचे लावलेले आहेत, हे आपण माझ्या संपादन इतिहासात पाहू शकता, आणि अशा वर्गांत खोलेंचे वर्गही समाविष्ठ आहेत. म्हणून मी मुद्दामहून केवळ खोलेंच्याच वर्गांना साचे लावले असा अर्थ काढू नये. माझे अनेक नव्हे तर केवळ तीन सदस्यांशीच वाद झालेले आहेत. मराठी विकि मध्येच नव्हे तर बहुतेक सर्वच विकिंमध्ये असे अनेक सदस्य असतील ज्यांचे इतर काही सदस्यांशी पटत नाही, आणि याला स्वत: तुम्हीही अपवाद नाहीत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढे मी खोलेंच्या कामात हस्तक्षेप करणार नाही. आणि 'आम्ही' व 'आम्हाला' हे शब्दप्रयोग भविष्यात टाळेन.--संदेश हिवाळेचर्चा ११:४९, २४ एप्रिल २०१८ (IST)