वर्ग चर्चा:महाराष्ट्रतील जागा ज्यांना गुणकची गरज आहे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखाच्या मथळ्यामध्ये कृपया 'वर्ग चर्चा:महाराष्ट्रातील जागा ज्यांना गुणकाची गरज आहे' असे शुद्धलेखन करुन बदल करावे. वि. नरसीकर (चर्चा) १४:२९, ६ जानेवारी २०१० (UTC)

भलतीच सुधारणा करू नये.[संपादन]

मराठीतल्या संयु्क्त वाक्यरचनेत आधी दुय्यम वाक्यांश(subordinate clause) येतो आणि मग मुख्य(main clause). ’महाराष्ट्रातील...’ हा मु्ख्य वाक्यांश आहे आणि ‘ज्यांना..गरज आहे‘ हा दुय्यम. त्यामुळे वाक्य उलटे करायला हवे.

मराठीत `गुणक` म्हणजे ज्याने गुणतात तो multplier. बीजगणितात यालाच coefficient म्हणतात. आपल्याला शब्द हवा आहे तो co-ordinateसाठी. मराठी आणि गुजराथी या दोन्ही भाषात coordinateचे भाषांतर रसायनशास्त्रात सहबद्ध, गणितात सहनिर्देशक आणि भूगोलात अक्षांश-रेखांश असे करतात. एका इंग्रजी शब्दाला एकच मराठी शब्द आणि या उलट असे चालत नाही. उदा० theory या शब्दाला मराठीत, वाद, उपपत्ती आणि सिद्धान्त असे तीन शब्द आहेत. तिघांच्या अर्थच्छटा वेगळ्या आहेत. इंग्रजी theoryने या छटा दाखवता येत नाहीत. तोच प्रकार coordinateचा.

हा विचार केल्यावर साहजिकच योग्य मथळा ’ज्यांचे अक्षांश-रेखाश हवे आहेत अशी महाराष्ट्रातील स्थळे’ असा होईल. -- J १५:१४, २६ मार्च २०११ (UTC)

या वर्गाचा अर्थ उमगला नाही[संपादन]

ह्या वर्गाचा अर्थ व उद्देश्य काही उमजेनासा झाला आहे. त्या बद्दल खुलासा मिळावा ही अपेक्षा.

यातील गुनक कोणता? किंवा काय असते?


Dr.sachin23 १५:२६, २६ मार्च २०११ (UTC)

गुनक[संपादन]

आपण मराठीत ज्यांना अक्षांश-रेखांश म्हणतो त्याला हे लोक गुणक असा विचित्र शब्द वापरतात. महाराष्ट्रातील ज्या गावांच्या किंवा स्थळांच्या अक्षांश-रेखांशांची नोंद मराठी विकिपीडियावर नाही अशा स्थळांची नावे ह्या वर्गात आहेत. अक्षांश-रेखांश शोधून काढायला मदतरूप व्हावे असा ह्या वर्गाचा उद्देश आहे. ---J ०५:३२, २७ मार्च २०११ (UTC)

आपण मराठीत ज्यांना अक्षांश-रेखांश म्हणतो त्याला हे लोक गुणक असा विचित्र शब्द वापरतात
J,
हे लोक म्हणजे कोण हे स्पष्ट करावे. त्याच बरोबर तुमचा लिहिण्याचा रोख थोडासा बदलावा. येथे लिहीणारे लोक सगळेच व्याकरण, भाषापंडित असतील असे नाही, किंबहुना नाहीतच. पण त्याचवेळी येथील बहुतांश लोक आपापल्या क्षेत्रात सरासरीपेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेले आहेत हे लक्षात ठेवावे. तुम्ही येथे वेळोवेळी शुद्धलेखन, व्याकरण, इ. दुरुस्त करता याचा मला व सगळ्याच लेखकांना आदर आहे आणि आम्हाला ते पाहिजेच आहे. तुमचे पांडित्य जसे आदरणीय आहे तसेच इतरांचे ज्ञानही तितकेच महत्वाचे आहे हेही लक्षात ठेवावे. व्याकरण किंवा शुद्धलेखन थोडेफार चुकल्यास लिहिणार्‍याचे माप काढणे हे आपल्यासारख्या ज्ञानी पंडिताला शोभा देत नाही.
क.लो.अ.
अभय नातू ०७:०७, २७ मार्च २०११ (UTC)
"जे", मराठी विकिपीडिया लोकसहभागास खुला प्रकल्प असल्यामुळे यात काही वेळा चुका होतात, त्या निदर्शनास आणल्या जातात, त्या दुरुस्तही केल्या जातात. ही निरंतर चालू असणारी विकिप्रक्रिया आहे. शिवाय, मराठी विकिपीडियावर सक्रिय मनुष्यबळ मर्यादित असल्यामुळे काही चुका निदर्शनास येण्यास व दुरुस्त होण्यास अधिक काळ लागू शकतो, हा वास्तववादी मुद्दा नाकारता येत नाही. हे लोक असे शब्द योजायला इथे कुणीही शिवसेना-मनसे अश्या पक्षीय सीमा आखलेल्या नाहीत. आपण लिहीत असलेली प्रतिक्रिया इतरांना हिडीस-फिडीस केल्यासारखी वाटू नये, याची काळजी घेणे तुमच्यासारख्या काही वर्षांपासून नियमितपणे सहभाग घेणार्‍या सदस्यांकडून अपेक्षित आहे. ही बाब ध्यानात घेऊन आपण येथून पुढे आपल्या प्रतिक्रिया तोलून लिहाव्यात, अशी माझ्याकडून आपल्याला सूचना आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०७:४६, २७ मार्च २०११ (UTC)

माझा प्रश्न वादंग होण्याकरिता नव्हता[संपादन]

माझा प्रश्न वादंग होण्याकरिता नव्हता, या प्रश्नामुळे किंवा उत्तरामुळे कुणी दुखावले असेल तर माफी असावी. Dr.sachin23 ०८:१३, २७ मार्च २०११ (UTC)

नमस्कार डॉक्टर सचिन,
तुमच्या प्रश्नामुळे पुढे वादंग होऊ नये यासाठी मी J यांना (नम्र) सूचना केली. तुम्ही तुम्हाला असलेले प्रश्न खुशाल विचारावे.
अभय नातू १८:३४, २७ मार्च २०११ (UTC)