वर्ग चर्चा:मराठी पत्रकार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

◆दत्ता निवृत्ती कोळी (उदयोन्मुख पत्रकार)

   जन्म -शनिवार १३ जुलै १९९१
दत्ता कोळी यांचा जन्म मायणी ता- खटाव,जि - सातारा याठिकाणी झाला. त्यांनी आपले आयुष्य अथक कष्टमय परस्थितीत उभा केले.पहिली ते पदवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी आपल्या जन्मगावी मायणी येथे पूर्ण केले. 
   शिक्षण घेण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी आपले व्यावसायिक शिक्षणाची आवड सोडून कला शाखेतून पदवी मिळवली. काही काळ त्यांनी महाबळेश्वर येथील तळदेव याठिकाणीही शिक्षण पूर्ण केले.
   पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी "ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद"चे पत्रकारितेचे शिक्षणही घेतले. या बळावर त्यांनी २०१४ पासून पत्रकार क्षेत्रात काम करून आजवर .दैनिक ऐक्य,तरुण भारत,मुक्तागिरी,सत्य सह्याद्री,लोकमंथन या दैनिकाना काम केले असून सध्याच्या सोशल मीडिया न्यूज च्या जाळ्यातही ते प्रसिद्धी मिळवत आहेत.
   पत्रकारिते सोबत त्यांना पर्यटन,बाईक रायडिंग,वाचन,भाषण या इतर बाबीची आवड आहे. बाईक रायडिंग व प्रवासात त्यांनी देशभरात बरीच भटकंती केली आहे. याची माहिती त्यांच्या फेसबुक खात्यावर उपलब्ध आहे. 
   बाईक वरून कमी कालावधीत २०१७ तिरुपती बालाजी,२०१८ कन्याकुमारी,२०१९ गुजरात अशी भ्रमंती केली आहे.गडकिल्ले भेट हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून छ शिवरायांच्या ३५० किल्याना भेट देण्याचा त्यांचा संकल्प आहे. 
  पत्रकारितेत त्यांनी चिपळूण,कराड,शिर्डी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात खटाव तालुक्यातून सहभागी होताना याभागातील प्रशांची त्याठिकाणी मांडणी केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 'महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे' संस्थापक राज्य संघटक संजय भोकरे यांनी सातारा जिल्ह्यातील पत्रकार संघटनेची सातारा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
   नवीन पत्रकारांना पत्रकारिता हे क्षेत्र कठीण बनत चालले असताना पत्रकारितेचा मूळ विषय,त्याचे महत्व आणि त्याची समाजातील विश्वासहर्ता जपण्याचे काम सध्या दत्ता कोळी करीत आहेत.