वर्ग चर्चा:भारतीय नास्तिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या वर्गात बाबासाहेब आंबेडकर हा लेख आहे. हाच लेख भारतीय बौद्ध या वर्गातही समाविष्ट केलेला आहे. नेमका कोणता वर्ग बरोबर आहे?

अभय नातू (चर्चा) ०३:०२, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू:
दोन्हीही वर्ग बरोबर आहेत. नास्तिक म्हणजे निधर्मी नव्हे. नास्तिक चा साधारण अर्थ 'जो ईश्वर आहे असे मानत नाही/ईश्वराचे अस्तित्व मान्य करत नाही असा व्यक्ती'. आणि बाबासाहेब आंबेडकर हे धर्माला मानणारे (धार्मिक) होते पण ईश्वरावर त्यांच्या विश्वास नव्हता. असेच वि. दा. सावरकर यांच्या बाबतीतही आहे, ते पण हिंदू होते आणि नास्तिक सुद्धा.
बहुतेक नास्तिक हे निधर्मी असतात म्हणून असा गोंधळ अनेकांना होत असतो.
धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ०७:३२, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)

असे वर्ग ज्ञानकोशात असावेत का? एखाद्या व्यक्तीला अशा वर्गात टाकण्याला आधार/संदर्भ काय देणार? आस्तिक,धार्मिक,निधर्मी,पुरोगामी,प्रतिगामी,विवेकनिष्ठ असे वर्ग आपण तयार करत त्यांत सर्वांना विभागत जाणार आहोत का? असे करण्याने तटस्थता, पूर्वग्रह विरहितता या तत्वांना धक्का लागतो असे माझे मत आहे.इंग्रजीत असा वर्ग आहे म्हणून ही पद्धत किंवा विचार योग्य आहे असे होत नाही.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:३९, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)

या वर्गात असे व्यक्ती आहेत ज्यांनी जाहिरपणे स्वत:स नास्तिक म्हटलेले आहे. नास्तिक ची तुलना पुरोगामी, प्रतिगामी, विवेकनिष्ठ इ. शी करणे योग्य नाही. हा व्यापक व जागतिक विचार आहे. हा एक सामान्य वर्ग आहे, आस्तिकांपासून भिन्न विचारधारा असलेल्या लोकांचा, पण म्हणून त्यास अज्ञानकोशीय ठरवणे योग्य ठरणार नाही, असे मला वाटते. --संदेश हिवाळेचर्चा १२:५७, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)

तुलना करणे हे अवघड आहे आणि अनेकांना गैरसोयीचे आहे. कारण हा व्यक्तीच्या खाजगी आचाराचा मुद्दा आहे. रूढार्थाने एखादी व्यक्ती पुरोगामी असेल तरीही आस्तिक असेल,धार्मिक असेल तरीही पुरोगामी असेल, नास्तिक असेल तरीही प्रतिगामी असेल. आणि हे कोण, कसे ठरवणार. जाहीर केल्याचे पडताळणीसाठी संदर्भ/पुरावे असतील तर ते द्यायला हवेत. मगच वर्ग ठरवणे योग्य आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:११, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)

हा लेख नास्तिकांचा आहे, आणि प्रत्येकाला संदर्भही आहेत. कारण हे सर्व लेख इंग्रजी लेखांपासून घेतलेले आहे. पण पुरोगामी आणि प्रतिगामी याची येथे चर्चा कशाला? पुरोगामी आणि प्रतिगामी हे गट/व्यक्ती प्रामुख्याने महाराष्ट्रा पुरते आहे आणि मी व्यक्तीश यात डोकं घालित नाही. म्हणून यावर कृपया, मला प्रश्न विचारू नये कारण मला ते माहिती नाही. लेखात संदर्भ द्या हे समजू शकतो पण लेखाला अज्ञानकोशीय ठरवत असाल तर इतर सदस्यांचीही मते विचारात घ्यायला हवीत, असे वाटते.--संदेश हिवाळेचर्चा १३:२९, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)
आणि धार्मिक व्यक्तींचे वर्ग उपलब्ध आहेतच. --संदेश हिवाळेचर्चा १६:१५, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)
नास्तिकची तुमची व्याख्या व्यक्तिगत वाटते. तुम्ही Deist/Non-deist आणि आस्तिक/नास्तिकमध्ये गोंधळ करीत आहात.
तरीही जाहीरपणे स्वतःला नास्तिक म्हणले, आणि नंतर ते बदलले नाही किंवा त्याविरोधी आचार दिसला नाही, तर नास्तिक वर्गात समावेश करणे योग्य राहील.
पुरोगामी/प्रतिगामी हे समांतर आहेत. एखाद्याने स्वतःला पुरोगामी म्हणले तर त्याला पुरोगामी समजायचे का? आणि असे गट महाराष्ट्रापुरते मुळीच नाहीत.
तुम्ही म्हणलात - मी व्यक्तीश यात डोकं घालित नाही. म्हणून यावर कृपया, मला प्रश्न विचारू नये कारण मला ते माहिती नाही. तुमच्या प्रामाणिकतेची मी कदर करतो परंतु असे असल्यास इतर जाणत्यांच्या मताचा आदर करावा ही विनंती.
तूर्तास आंबेडकरांनी स्वतःला नास्तिक म्हणविले कि नाही याची शहानिशा करून असा संदर्भ नसल्यास (ब्लॉग व तत्सम व्यक्तिगत मतांचे संदर्भ ग्राह्य धरू नयेत) वर्ग काढावा. तोपर्यंत राहू द्यावा
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:५४, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)
आंबेडकर नास्तिक (ईश्वर न मानणारे) होते याचे अनेक संदर्भ मी देईल. मला जाणत्यांच्या मताचा आदर आहे, आणि तिसऱ्यांदा मला पुरोगामी/प्रतिगामी बद्दल प्रश्न विचारू नये यासाठी त्यांना मी मला प्रश्न न विचारण्याची विनंती केलेली आहे. --संदेश हिवाळेचर्चा २२:००, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)