वर्ग चर्चा:पोप

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखांचे मथळे पोप-पहिला अर्बन , पोप-चौथा अर्बन, पोप-सातवा-आठवा अर्बन असे(क्रमाने) असावेत. शिवाय पोप नावाचे एक वेगळे पान असून या पानावर सर्व पोपांसाठी दुवे असावेत. शोध करताना पोप अर्बन पहिला असा शोध कुणी करील असे वाटत नाही.-J-J १८:२९, १४ मे २००७ (UTC)

या व्यक्तींची नावे पोप अर्बन पहिला, दुसरा अशीच आहेत. अर्बन पहिला, अर्बन दुसरा, तिसरा, इ. हे नेहमी कालक्रमानुसार याच क्रमाने आहेत. पोप नावाचे पान पाहिजे पण त्यावर पोप या पदाबद्दल माहिती पाहिजे. सगळ्या पोपची यादी पोपची यादी येथे आहेच. तेथे क्रम अर्बन पहिला, दुसरा, तिसरा, इ. असा आहे.
लेख शोधताना पोप अर्बन पहिला असाच तार्किक आहे (शोधकाला अर्बन नावाच्या पहिल्या पोपबद्दल माहिती हवी आहे हे अभिप्रेत आहे). अर्बन पहिला असे शोधताही पोप अर्बन पहिला हा शोधोत्तर पानात येईल. पोप अर्बन असे शोधता अर्बन नावाचे सगळे पोप शोधात सापडतील (सापडले पाहिजेत).
आपण सुचवलेल्या क्रमाची तार्किकता लक्षात आली नाही.
अभय नातू १९:१३, १४ मे २००७ (UTC)

दुसरा बाजीराव, पानिपतची तिसरी लढाई, पंचम जॉर्ज, आठवा एडवर्ड असे लिहायची पद्धत मराठीत आहे. बाजीराव दुसरा, लढाई तिसरी अशी नाही. आमच्यासारख्या सामान्य माणसांना आत्तापर्यन्त होऊन गेलेल्या शंकराचार्यांची, दलाई लामांची, फार काय तीर्थंकरांची नावे माहीत नाहीत तर पोपांची कशी माहीत असणार? जर एखाद्या पोपची माहिती शोधायची असेल तर कोणीही ती पोप नावाखालीच शोधायचा प्रयत्‍न करणार. अर्बन, अलेक्झांडर, इनोसेन्ट अशी नावे माहीत असायचे कारण नाही. लवंग, कापूस किंवा हिरवा चाफा यांची माहिती जर अनुक्रमे Eugenia Caryophyllata, Gossypium Herbaceum किंवा Artabotrys Odoratissimus या मथळ्यांच्या पानावर ठेवली तर ती कशी सापडेल? --J--J १८:४५, १६ मे २००७ (UTC)

आमच्यासारख्या सामान्य माणसांना आत्तापर्यन्त होऊन गेलेल्या शंकराचार्यांची, दलाई लामांची, फार काय तीर्थंकरांची नावे माहीत नाहीत तर पोपांची कशी माहीत असणार?
प्रथमतः, तुमच्या या वाक्याचा अर्थ कळला नाही. सामान्य माणसांच्या माहितीत भर पडण्यासाठीच हा उद्योग आहे. आज तुम्हाला माहिती नसली तर उद्या होईलच की.
पोपबद्दलची माहिती शोधण्यासाठी वर्गःपोप हे पान शोधावे. एखाद्या पोपबद्दल माहिती हवी असेल तर त्यासाठी नावाचा एखादा तुकडा तरी पाहिजेच पाहिजे. (नावही माहिती नसताना लगेच पान शोधून मिळण्याची अपेक्षा असणार्‍या शोधकाच्या बुद्धिमत्तेची धन्य आहे.) पोप हे पद आहे आणि या पदाबद्दलची माहिती फक्त तेथे असावी. नाहीतर छत्रपती या पानावर शिवाजी महाराजांपासून सातारा, कोल्हापूर व इतर असतील तिथल्या छत्रपतींची नावे आणि मग छ्त्रपती दुसरे राजाराम महाराज, छत्रपती दुसरे शिवाजी महाराज अशी पाने करावी लागतील. दस्तुरखुद्द शिवाजी महाराजांचे पान मग छत्रपती-पहिले शिवाजी असे करावे लागेल.
दुसर्‍याचे विशेष नाम आपल्या सोयीनुसार बदलणे हे उद्धटपणाचे लक्षण आहे. जसे मुंबईचे बॉम्बे चूक, पुणेचे पूना चूक व शिवाजीचे सिवाजी चूक, तसेच पोप अर्बन दुसर्‍याला पोप दुसरा अर्बन म्हणणे चूक. थोरले माधवराव, पहिला बाजीराव इ बोलीभाषेत बरोबर आहेत. शास्त्रशुद्ध वर्गवारी करताना ते बाजीराव पहिला व माधवराव, थोरले असेच होणार. शिवाय, शोध घेताना जगातील सध्या उपलब्ध असलेली यच्चयावत शोधयंत्रे पहिल्या शब्दांना विशेष महत्त्व देतात. तरी नउव्या बाजीरावाबद्दल माहिती शोधत असता बाजीराव नउवा हे शोध-वाक्य जास्त उपयुक्त दुवे शोधेल. नउवा बाजीराव शोधले असता नउव्या बाजीरावाबरोबरच नउवा अर्बन, नउवा महमदनउवारी हे दुवेही येतील.
लवंग, कापूस किंवा हिरवा चाफा यांची माहिती जर अनुक्रमे Eugenia Caryophyllata, Gossypium Herbaceum किंवा Artabotrys Odoratissimus या मथळ्यांच्या पानावर ठेवली तर ती कशी सापडेल
विशेष नामाच्या मूळ रुपासाठी पान (Entry) तयार करुन इतर नावांकडून या पानाकडे पुनर्निर्देशन करणे हा विकिपीडियाचा (व इतर अनेक ज्ञानकोशांचा) शिरस्ता आहे. तरी पोप अर्बन दुसर्‍यासाठी पोप दुसरा अर्बन, पोप-दुसरा अर्बन अशी इतर हवी तितकी तर्कसंगत पुनर्निर्देशने आपण तयार करावी.
अभय नातू १९:२६, १६ मे २००७ (UTC)

ता.क. नववा बाजीराव बरोबर कि नउवा बाजीराव?