Jump to content

वर्ग चर्चा:जपानचे प्रांत

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भाग म्हणजे तुकडे किंवा प्रदेश. विभाग म्हणजे विचारपूर्वक केलेले तुकडे. आणि प्रभाग म्हणजे कारभाराच्या सोयीसाठी केलेले शहराचे भाग; तुरुंगातील किंवा रुग्णालयातील खोल्या, मतदानासाठी मतदारसंघाचे केलेले तुकडे, वगैरे. इंग्रजीत वॉर्ड. जपानच्या वॉर्ड्‌सबद्दल आपण इथे माहिती का लिहितो आहोत?

प्रांत, परगणे, इलाखे, तालुके, जिल्हे, प्रादेशिक विभाग, भौगोलिक विभाग यांतला जो शब्द योग्य असेल तो वापरायला हरकत नव्हती. जर ते विभाग बर्‍याच अंशी स्वायत्त असतील तर त्यांना संस्थाने, राजकीय विभाग किंवा राज्ये म्हणता येईल. जपानमध्ये असे काही असेल असे वाटत नाही. ...J १८:३६, ७ जून २०११ (UTC)

Prefecture म्हणजे प्रभाग?

[संपादन]

A prefecture is a governmental administrative unit. Simply put, in the US you have states, in Canada you have provinces, in Japan they have prefectures. There are 47 (including some that Japanese insist are not prefectures because they don't use the word.) Prefecture in Japanese is Ken. Chiba-ken, for example, or Aomori-ken. There is also fu, as in Kyoto-fu and Osaka-fu. Plus to, as in Tokyo-to and Hokkaido. fu, to, ken are all administrative units. असे असताना प्रिफ़ेक्चरबद्दल प्रभाग हा शब्द वापरणे कितपत योग्य? प्रांत किंवा इलाखा जास्त योग्य.---J ०९:४६, ८ जून २०११ (UTC)

J, ह्या बाबत झालेल्या थोड्याफार चर्चेनंतर प्रांत हा शब्द प्रॉव्हिन्स साठी जास्त योग्य आहे असे वाटते. इलाका हा अधिकृत शब्द आहे की नाही ह्या बद्दल मला शंका आहे. संकल्प ह्यांनी प्रिफेक्चर साठी प्रभाग हा शब्द सुचवला व त्यानुसार सर्व लेखांमध्ये प्रभाग हा शब्द् वापरण्यात आला आहे.
अभिजीत साठे १३:०६, ८ जून २०११ (UTC)

प्रॉव्हिन्स

[संपादन]

कॅनडात ज्याला प्रॉव्हिन्स म्हणतात त्याला जपानमध्ये प्रिफ़ेक्चर म्हणतात हे वरती उद्‌धृत केलेल्या इंग्रजी उतार्‍यावरून स्पष्ट व्हावे. इलाखा म्हणजे ज्या प्रदेशाला गव्हर्नर असतो, परंतु मंत्रिमंडळ किंवा विधानसभा नसते. ब्रिटिशांच्या काळी भारतात मद्रास, मुंबई आणि कलकत्ता हे तीन इलाखे होते. जपानमध्ये असेच असेल तर इलाखा म्हटले तरी चालावे. प्रांत या शब्दाला तर हरकत असायचे काहीच कारण नाही......J १७:२७, ८ जून २०११ (UTC)