वनस्त्री
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | संस्था | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
| |||
![]() |
वनस्त्री हा एक २००८ पासून कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड येथे कार्यरत असलेला शेती आणि संवर्धन प्रकल्प आहे.[१][२] ही एक महिलांद्वारे चालवली जाणारी गैर सरकारी सामाजिक संस्था असून, येथे वनस्त्री या शब्दाचा अर्थ "जंगलातील महिला" असा होतो. अर्थात या संस्थेद्वारे एक प्रकारे निसर्गाचे संवर्धन केले जाते.[१] २०१३ पर्यंत, वनस्त्रीमध्ये शाश्वत शेती करणाऱ्या १५० महिला होत्या. या महिला सदरील प्रकल्पाच्या सहाय्याने आपापसात विविध प्रकारचे पारंपरिक बियाणे आणि कंदमुळे यांची देवाणघेवाण करत असतात.[३][४] २०१७ पर्यंत, कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये वनस्त्रीच्या माध्यमातून विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली.[४] त्याच वर्षी, वनस्त्रीला त्यांच्या कामगिरीबद्दल नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[५]

सिर्सि येथील वनस्त्री बागेत १०० हून अधिक प्रकारच्या भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे.[६] माला धवन आणि सोनिया धवन या बहिणींनी वनस्त्रीसोबत काम केले आणि नंतर 'अ हंड्रेड हँड्स' ही हस्तकला संस्था स्थापन केली.[७]
संदर्भ
[संपादन]- ^ a b Pailoor, Anitha (6 July 2009). "Vanastree: Empowering women". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 25 June 2022 रोजी पाहिले.
- ^ "Malnad Home Garden & Seed Exchange Collective". Kalpavriksh. 1 August 2020. 25 June 2022 रोजी पाहिले.
- ^ Achanta, Pushpa (14 March 2013). "Realities of the landless woman farmer". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 25 June 2022 रोजी पाहिले.
- ^ a b V, Nirupama (19 January 2017). "Closing time! Malnad Mela in Bengaluru comes to an end after 16 years". The Economic Times. ET Bureau. 25 June 2022 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra's Sindhutai Sapkal, Urmila Apte to be honoured with Naari Shakti 2017 awards". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 7 March 2018. 25 June 2022 रोजी पाहिले.
- ^ Gandhi, Maneka (11 March 2018). "For an organic world". The Statesman. 25 June 2022 रोजी पाहिले.
- ^ Sebastian, Shevlin (19 December 2019). "A hundred hands on deck". The New Indian Express. 25 June 2022 रोजी पाहिले.