वनपिंगळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Madagascar torotoroka scops owl otus madagascariensis

वनपिंगळा हे भारतातील दुर्मिळ घुबड आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वर्णन[संपादन]

वनपिंगळा हा पक्षी साधारणतः मध्यम आकाराचा असतो. त्याचे डोळे पिवळ्या रंगाचे असतात, याची चोच बाकदार, शिकार पकडण्यासाठी आणि मांस फाडण्यासाठी उपयुक्त, तर पाठीचा रंग राखाडी व पोटाचा भाग पांढऱ्या रंगाचा असतो. सर्व घुबडांप्रमाणेच वनपिंगळा सुद्धा आपली मान दोन्ही बाजूंनी १८० अंश फिरवू शकतो, यामुळे एकाच जागी बसला असतांनाही तो क्षणात त्याच्या मागे काय घडत आहे ते पाहू शकतो. अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकूल झाले असल्याने लहानात लहान आवाजाच्या दिशेनेही पिंगळा पक्षी रोखून पाहतो.नर-मादी दिसायला सारखेच असतात.

वास्तव्य[संपादन]

वनपिंगळा हा पक्षी जगात फक्त मध्य भारतातील सातपुडा पर्वत रांगातील पानगळीच्या विरळ जंगलात सापडतो. वनपिंगळा हा निशाचर पक्षी आहे. दिवसा जुन्या आमरायांमध्ये, झाडांच्या ढोलीत तसेच संधी असल्यास, जुन्या मोठाल्या घरातील छताच्या आश्रयाने राहणे पसंत करतो. घनदाट वृक्षांच्या परिसरात पिंगळा कमी आढळतो.

श्रद्धा-अंधश्रद्धा[संपादन]

भारतामध्ये वनपिंगळाला अशुभ समजले जाते. त्यांचा कर्कश ओरडण्याने या पक्षाला अशुभ मानले जाते. पूर्व भारतात व पश्चिम बंगालमध्ये वनपिंगळाला लक्ष्मीचे वाहन समजतात.

संत एकनाथ[संपादन]

एकनाथांनी जी अनेक भारुडे केली आहेत, त्यांत 'पिंगळा' नावाचे भारूडही आहे. त्या भारुडातील काही ओळी -

पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा । शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका ॥ १ ॥ डुग डुग ऐका डुग डुग ऐका ॥ध्रु०॥ पिंगळा बैसोनि कळसावरी । तेथोनि गर्जतो नानापरी । बोल बोलति अति कुसरी । सावध ऐका ॥ २ ॥ किलबिल किलबिल । चिलबिल चिलबिल । तुलमिल तुलमिल । तुलबिल तुलबिल ॥ ३ ॥ वगैरे.

हेही पहा[संपादन]

https://www.youtube.com/watch?v=hNwFmxCiAn0

संदर्भ[संपादन]

https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-15-bird-caste-collapse-in-india-4447283-NOR.html

https://www.loksatta.com/balmaifalya-news/birds-in-danger-vanapingla-349888/