वज्रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वज्रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र हे भगवान बुद्धांनी निर्दोष ज्ञान अनुभूती (Perfection of wisdom) करून घेण्याबद्दल मार्गदर्शन केलेले एक आख्यान किंवा प्रवचन आहे. या ग्रंथाचे मूळ संस्कृतमधले संपूर्ण नाव 'वज्रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र,' असे आहे. परंतु लघु स्वरूपात वज्र सूत्र किंवा डायमंड सूत्र(Diamond Sutra) या नावाने ते ओळखले जाते.

संपूर्ण स्वरूपात उपलब्ध असलेला हा सर्वात प्राचीन छापील ग्रंथ आहे असे मानले जाते.

मुख्य तत्त्व[संपादन]

या सूत्राचे मुख्य तत्त्व असे आहे की हे सर्व लौकिक जग भ्रामक आणि मिथ्या आहे त्यामुळे या जगात कोणत्याच वस्तू किंवा व्यक्ती नाहीत. एक मूळ तत्त्व सोडले तर दुसरे काहीच नसल्याने सजीव, निर्जीव असे काहीच नाही व त्यामुळे सुख दुख: वगैरे प्रत्यक्षात काहीच नाही.


संदर्भ[संपादन]