वजराई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धबधबा

वजराई हे सातारा जिल्ह्यातल्या भांबवली गावाचे जागृत देवस्थान आहे. वजराई येथे ८०० फूट उंचीवरून पडणारा पाण्याचा धबधबा आहे. धबधब्यावर तीन टप्पे आहेत. समर्थ रामदास स्वामी यांनी हा वजराई माथा तीन पावलात गाठला, त्यामुळे तेथे तीन पायर्‍या आहेत अशी एक दंतकथा आहे. उरमोडी नदीचा उगम या धबधब्यापासून होतो. या नदीवर पुढे उरमोडी धरण आहे. हा संपूर्ण परिसर खूपच सुंदर असून हा भाग कास पठाराच्या जवळ आहे. येथील निसर्गरम्य परिसर हे पावसाळ्यातले मुख्य आकर्षण आहे. ट्रेकर्ससाठी हा भाग नंदनवन समजला जातो. वजराई धबधब्याच्या पायथ्यापर्यंतचा मार्ग उत्कंठापूर्ण आहे, पण पावसाळ्यामध्ये तो धोकादायक असू शकतो. या भागात मोठ्या प्रमाणात जळवा आहेत.

भांबवली हे गाव सातारा शहरापासून २७ कि.मी.वर आहे. सातारा शहरातून बामणोली, येरणे किंवा तेठलीला जाणार्‍या प्रवासी वाहनाने कास या गावी उतरल्यानंतर १५ ते २० मिनिटे चालून भांबवलीला पोचता येते. संपूर्ण हिरव्या वनराईत थाटलेले गाव खूपच सुंदर आहे. गावतील सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे तेथील धबधबा, भोवतालची दाट झाडी, मधून जाणार्‍या पाऊलवाटा आणि शुद्ध आणि स्वच्छ हवा.

बाह्यदुवे[संपादन]