वंदना शिवा
वंदना शिवा | |||
---|---|---|---|
जन्म |
५ नोव्हेंबर, १९५२ देहरादून, उत्तराखंड, भारत | ||
नागरिकत्व | भारतीय | ||
शिक्षण |
पंजाब युनिव्हर्सिटी, चंडीगड युनिव्हर्सिटी ऑफ गुएल्फ युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ओंटारियो | ||
पेशा | तत्वज्ञानी, पर्यावरणविज्ञानी, लेखक, व्यावसायिक वक्ता, सामाजिक कार्यकर्ते | ||
पुरस्कार |
राइट आजीविका पुरस्कार (१९९३) सिडनी शांती पुरस्कार (२०१०) मिरोडी पुरस्कार (२०१६) फुकुओका आशियाई संस्कृती पुरस्कार (२०१२) | ||
संकेतस्थळ vandanashiva | |||
|
वंदना शिवा ( ५ नोव्हेंबर १९५२; देहरादून, उत्तराखंड, भारत) या भारतीय तत्त्वज्ञ, पर्यावरणवादी कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्यांनी २०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे भौतिकशास्त्रात शिक्षण झाले आहे आणि कॅनडातील ओंटॅरिओ येथील विद्यापीठातून इ.स. १९७८ मध्ये त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्या इंटरनॅशनल फोरम ऑन ग्लोबलायझेशन संघटनेच्या संचालक मंडळावर आहेत. इ.स. १९९३ मध्ये त्यांना राईट लाईव्हलीहूड पुरस्काराने आणि २०१० मध्ये त्यांना सिडनी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७० च्या दशकात वंदना शिवा यांनी अहिंसात्मक चिपको आंदोलनात भाग घेतला. झाडांची तोड थांबवण्यासाठी झाडांना मिठी मारून महिला उभ्या रहात व झाडाचे संरक्षण करीत. वंदना शिवा ह्या जेरी मँडर, एडवर्ड गोल्डस्मिथ, राल्फ नॅडर, जेरेमी रिफकिन इत्यादींसोबत जागतिकीकरणासंबंधित आंतरराष्ट्रीय फोरमच्या नेत्यांमधील एक आहेत. जागतिकीकरणामध्ये परिवर्तन घडवा (आल्टर-ग्लोबलाइझेशन मूव्हमेंट) हे एका जागतिक एकात्मता आंदोलनाचे नाव आहे. त्यांनी अनेक परंपरागत पद्धती वैज्ञानिक स्वरूपात सादर केल्या आहेत.
सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण
[संपादन]वंदना शिवा यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९५२ रोजी देहरादून (उत्तराखंड) येथे झाला. त्यांचे वडील वनरक्षक व आई शेतीवर नितांत प्रेम करणारी. त्यांचे शिक्षण नैनिताल मधील सेंट मेरी स्कूलमध्ये व देहरादूनमध्ये झाले. त्यानंतर त्या चंदीगडच्या पंजाब विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेल्या. पुढे कॅनडाला जाऊन त्यांनी तेथे पीएच.डी. केली. भौतिकशास्त्रात संशोधन केले आणि बंगलोरमध्ये भारतीय विज्ञान संस्था आणि भारतीय व्यवस्थापन संस्था यांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरणविषयक धोरणांच्या परस्पर संबंधांवर संशोधन केले.
कारकीर्द
[संपादन]वंदना शिवा यांनी कृषी आणि अन्नधान्य व्यवहारामध्ये बदल घडविण्यासाठी संघर्ष केला आहे. बौद्धिक संपदा अधिकार, जैव विविधता, बायो-टेक्नॉलॉजी, जैविक-शास्त्र, अभियांत्रिकी त्या क्षेत्रांत वंदना शिवा यांनी बौद्धिक स्वरूपात आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून योगदान दिले आहे आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका, आयर्लंड, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियातील ग्रीन चळवळीतील तळागाळातल्या संघटनांना त्यांनी अनुवांशिक अभियांत्रिकीद्वारे कृषी विकासामधील प्रगतीविरोधात मोहीम चालू केली आहे. १९८२ मध्ये त्यांनी रिसर्च फाऊंडेशन फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इकोलॉजीची स्थापना केली. १९९१ मध्ये त्यांनी नवज्ञानाची निर्मिती केली; जीवनावश्यक संसाधनांचा विशेषतः देशी जाती, जैविक शेती यांचा सुयोग्य व्यापार वाढवण्यासाठी विविधता आणि एकात्मतेचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय चळवळ केली. विविध प्रकारच्या शेतीतील प्रादेशिक वाणांना संधी देण्यासाठी भारतभरातील ४० बियाण्यांच्या ब्रँड्सची स्थापना केली. २००४ मध्ये शिव शूमाकर कॉलेज, यूके यांच्या सहकार्याने डून व्हॅली मध्ये शाश्वत जीवन जगण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यालयाच्या बीज बिझनेसची स्थापना केली.
चित्रपट
[संपादन]- -वंदना शिवा यांनी सॅम बाॅज्झो यांच्या ब्ल्यू गोल्ड : वर्ल्ड वॉटर वार्स या माहितीपटात काम केले आहे.
- वंदना शिवा यांनी आइरिना सलीनांच्या फ्लो : फॉर लव्ह ऑफ वॉटर या माहितीपटात अभिनय केला आहे.
- वंदना शिवा यांचा डर्ट हा चित्रपट २००९ मध्ये सँडस चित्रपट महोत्सव स्पर्धेत होता.
- त्यांनी फ्रान्सची मुक्त पत्रकार मेरी-माॅनरिक रॉबिन हिची निरमिती असलेल्या 'द वर्ल्ड अकॉर्डिंग टु मॉन्सेटो' या चित्रपटात काम केले आहे.
- वंदना शिवा यांनी 'द दलाई लामा रिनेसेन्स' नावाच्या माहितीपटात अभिनय केला आहे.
- वंदना शिवाने 'थिन आईस' नावाच्या पीबीएस नाऊ चलचित्रात काम केले आहे.
पुरस्कार
[संपादन]- १९९३मध्ये त्यांना राईट लाईव्हलीहूड पुरस्काराने आणि २०१० मध्ये त्यांना सिडनी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- १९९ मध्ये "प्राइड ऑफ द दून" पुरस्कार
- १९९७ : डेन्मार्कचा गोल्डन प्लांट सन्मान (पारिस्थितिकीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार); भारतातील पारिजात (?) आणि स्त्रियांच्या आंदोलनासाठी प्रति विज्ञान (?)आणि वैयक्तिक दोन्ही दृष्टिकोनातून मोलाचे योगदान देणे, स्पेनचा अल्फान्सो कॉमिन पुरस्कार.
- २००० : इटलीचा पेलेग्रिनो अर्टूसी पुरस्कार.
- २००१ : ऑस्ट्रियाचा होरायझन ३००० पुरस्कार.
- २००९ : सेव्ह द वर्ल्ड पुरस्कार.
- २०१० : सिडनीचा शांतिपुरस्कार.
संदर्भ
[संपादन]- https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/dr-vandana-shiva/articleshow/61311314.cms[permanent dead link]