ल्युबिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ल्युबिन (जर्मन: Lüben) हे नैऋत्य पोलंडमध्ये झिम्निका नदीतीरावर वसलेले एक शहर आहे. २००४ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ७७,६२५ एवढी आहे.

ल्युबिन १९९९पासून डॉल्नोश्लोंस्का प्रांतात मोडत असले तरी त्यापूर्वी १९७५-१९९८ दरम्यान ते लेग्निका वोइवोददारीमध्ये होते. पोलंडमधील आर्थिकदृष्ट्या वेगाने विकसणाऱ्या शहरांमधील ते एक असून पोलंडमधील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या 'के.जी.एच.एम. पोल्स्का मिएड्झ' कंपनीचे मुख्यालय तेथेच आहे.

बाह्य दुवे[संपादन]