लोणी खुर्द, वाशिम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोणी खुर्द हे महाराष्ट्राच्या वाशीम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. पश्चिम विदर्भातील हे गाव मराठवाड्याच्या सीमेवर आहे.

लोणी गाडे गांवाचा इतिहास [संपादन]

लोणी खुर्द हे गांव रिसोड तालुक्याच्या ठिकाणाहून २४ किमी. पश्चिमेला असून गांवाच्या आजूबाजूला डोंगर व सरकारी वन जमीन आहे.

या गावाला लोणी गाडे असेसुद्धा म्हणतात, कारण या गावात गाडे आडनावाचे लोक राहतात. मूळ पुणे जिल्ह्यातील सासवड गावचे असणारे गाडे कूळ (१६ व्या शतकाच्या शेवटी केव्हातरी स्थायिक झाले.

शाळा[संपादन]

गावात एक सरकारी अंगणवाडी असून, जिल्हा परिषदेची एक प्राथमिक मराठी शाळा आहे. तिच्यात इयत्ता ५ वी पर्यंतचे वर्ग आहेत.

मंदिरे[संपादन]

हनुमान मंदिर[संपादन]

गांवातील सर्वात जुने मंदिर हनुमंताचे असून ते गांवाच्या पश्चिमेला आहे. सदर मंदिर गांवाच्या स्थापनेबरोबरच स्थापन झालेले आहे असे स्थानिक लोक सांगतात. मंदिरातील मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची उंची ४ फुटाच्या आसपास अाहे. मारुतीच्या हातात गदा आहे. या मंदिरामध्ये दर एकादशीला गांवातील स्थानिक वारकरी भजनी मंडळाच्या वतीने भजन म्हणतात. तसेच श्रावण महिन्यात तर महिनाभर धार्मिक ग्रंथांचे सामूहिक वाचन होते.

दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी सर्व गांवकरी मोठ्या संख्येने उत्सव साजरा करतात. शेवटी महाप्रसाद वाटतात. या मंदिरात अन्य धार्मिक कार्यक्रमसुद्धा होतात.

संत गजानन महाराज            [संपादन]

गांवात संत गजानन महाराजांची दोन मंदिरे असून, त्यांपैकी एका मंदिरात दि. ९ मार्च २०१७ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानिमित्ताने २ मार्च २०१७ ते ८ मार्च २०१७ या दरम्यान गांवकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहभागवत कथा महोत्सव आयोजित केला होता. त्यावेळी ह.भ.प.चांगदेव महाराज गवंदे यांच्या मुखातून गांवकऱ्यांनी भागवतकथा श्रवण केली. ह्या अखंड हरीनाम सप्ताहात खालील कीर्तनकारांची कीर्तने झाली.

दि. २ मार्च २०१७ : खामगावच्या वर्षाताई टिकार

दि. ३ मार्च २०१७ :  वेलतुऱ्याचे राधेश्याम महाराज खरबळ

दि. ४ मार्च २०१७ : पिंपळनेरचे आसाराम महाराज आघाव

दि. ५ मार्च २०१७ : महागांवचे गणेश महाराज हुंबाड

दि. ६ मार्च २०१७  : बोरखेडीच्या जनाताई डोंगरे

दि. ७ मार्च २०१७  : वेलतुऱ्याचे दत्ता महाराज खरबळ

दि. ८ मार्च २०१७  : मांगवाडी (मंगलवाडी)चे धनंजय महाराज मोरे

दि. ९ मार्च २०१७  : माउलीचे चांगदेव महाराज गवंदे (काल्याचे कीर्तन)