लोणी काळभोर
Loni Kalbhor | |
---|---|
village | |
Country |
![]() |
State | Maharashtra |
District | Pune |
Taluka | Haveli |
• घनता | एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै) |
वेळ क्षेत्र | IST (यूटीसी+5:30) |
हे गाव सिंहगड - भुलेश्वर पर्वतरांगाच्या पायथ्याशी उत्तरेकडील बाजूला वसलेले आहे, ही पर्वत रांग सह्याद्रीच्या पश्चिमेस ते पूर्वेकडे आहे. मुळा-मुठा नदी गावाच्या उत्तरेकडील बाजूला वाहते. प्रशासकीयदृष्ट्या हे गाव पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहे. हे गाव सतत वाढत असलेल्या पुणे महानगराचा भाग आहे . पुणे शहराच्या जवळ असल्यामुळे, या गावातील काही भाग हे मागील काही वर्षांमध्ये शहराचे उपनगरे बनले आहेत.
भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या २२५१८ असून त्यातील ११७२७ पुरुष तर १०७९१ महिला आहेत. ६ वर्षांखालील मुले खेड्यातील एकूण लोकसंख्येपैकी १२.५९% आहेत. लोणी-काळभोर गावचे सरासरी लिंग प्रमाण ९२० आहे जे महाराष्ट्र राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. जनगणनेनुसार लोणी-काळभोरसाठी बाल लिंग प्रमाण ७८० आहे, जे महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा ८९४ च्या तुलनेत कमी आहे. २०११ मध्ये, महाराष्ट्राच्या ८२.३४% च्या तुलनेत गावाचा साक्षरता दर ८२.८२% होता. पुरुष साक्षरता ८९.१८% आहे तर महिला साक्षरता दर ७६.०७% आहे.
स्थानिक शासन[संपादन]
भारतीय संविधान आणि पंचायती राज अधिनियमानुसार, गावचे सरपंच (गावप्रमुख) प्रशासकीय काम करतात. सरपंचाची निवड गाव प्रतिनिधी करतात्.
वाहतूक[संपादन]
या गावाजवळून पुणे-सोलापूर महामार्ग तसेच पुणे-सिकंदराबाद रेल्वे मार्ग जातात. अनेक गाड्या लोणी काळभोर स्थानकावर थांबतात. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका चालविणाऱ्या जाणाऱ्या पीएमपीएमएल बस सेवेद्वारेही या गावाला सेवा दिली जाते.